ज्याचं डोकं जास्त चालायचं त्याचा मेंदू काढून घेणारा सिरीयल किलर….

आजचा किस्सा जरा खतरनाकचं आहे कारण यातल्या सिरीयल किलरने केलेलं कांड जेव्हा उघडकीस आलं तेव्हा देश हादरला होता. इतक्या विकृत पद्धतीने या सिरीयल किलरने हत्याकांड घडवून आणले होते.

केलेल्या कांडाची एकदम डिटेल माहिती त्याने त्याच्या डायरीमध्ये लिहिलेली असायची आणि ज्यावेळी त्याला पोलिसांनी पकडलं तेव्हा तो खोटं बोलू लागला मात्र डायरीने घोळ केला आणि त्याला तुरुंगवास झाला.

तर हा सिरीयल किलर होता अलाहाबादचा.

राम निरंजन हे त्याच नाव पण त्याने राजा कलंदर हे नाव धारण केलं. एका ऑर्डीनन्स फॅक्टरी मध्ये तो कामाला होता. तिथं कर्मचारी म्हणून जरी तो काम करत असला तरी तो स्वतःला तिथला राजाच समजायचा. त्याला जो माणूस आवडत नसे तो त्याला स्वतःच्या न्यायालयात शिक्षा देत असे.

अशाच विचित्र सवयीमुळे त्याने त्याच्या बायकोच मूळ नाव बदलून फुलनदेवी ठेवलं, मुलांचं नाव अदालत आणि जमानत ठेवलं. राजा कलंदरची बायको हि पंचायत समिती सदस्य होती. हे हसण्याजोगं प्रकरण वाटेल पण राजा कलंदर हा मुळातच विचित्र आणि रागीट होता.

राजा कलंदरच्या क्रूरतेचा अंदाज आपल्याला सुन्न करू शकतो इतका जबरी होता. ऑर्डीनन्स फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या एकाला त्याने मारून टाकलं होतं कारण होतं तो हुशार होता. त्याने त्या हुशार डोकं असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं धड शिरापासून वेगळं केलं आणि त्याच शीर घेऊन घरी आला. तो त्या शिरांचे तुकडे भाजून खात असे आणि मेंदूचा सूप करून पीत असे. 

याचं कारण त्याने जेलमध्ये सांगितलं होतं कि त्याला हुशार बनायचं होतं म्हणून तो हा प्रकार करायचा. अशा प्रकारे त्याने १४ कांड केले होते पण कुणालाही त्याचा पत्ता लागला नव्हता. त्याने हे अतिशय हुशारीने गुप्तपणे चालवलं होतं. पण एका घटनेत तो अडकला.

१९९८ साली पत्रकार धीरेंद्र सिंग याची हत्या झाली आणि अलाहबादमध्ये खळबळ उडाली. धीरेंद्र सिंग हा नावाजलेला पत्रकार होता. धीरेंद्र सिंगला राजा कलंदरने विश्वासात घेऊन आपल्या फार्म हाऊसवर बोलावलं. तिथे त्याच्या पाठीत गोळी मारून हत्या करण्यात आली आणि शीर धड वेवेगळं करून फेकून देण्यात आलं. धिरेंद्रच्या घरच्यांना राम कलंदरवर संशय होता त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी फुलन देवीच्या घरी धाड टाकली.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बोलायला सुरवात केली. तेव्हा इतर पोलिसांनी घराची आणि गोडाऊनची झडती घेतली तेव्हा घरात १४ कवट्या आढळून आल्या आणि त्या कवट्यांवर ज्यांची ज्यांची हत्या केली गेली त्यांची नाव टाकण्यात आली होती. हा प्रकार बघून पोलिससुद्धा चक्रावून गेले. 

पण राजा कलंदर आपला गुन्हा कबुल करायला तयार नव्हता. पण झडतीमध्ये त्याची डायरी पोलिसांना सापडली. डायरीमध्ये त्याने अगदी थंड डोक्याने प्लॅन करून त्या हत्या घडवून आणल्या होत्या. त्या हत्या फक्त बुद्धिमान लोकांच्या आणि हुशार असणाऱ्या लोकांच्या होत्या. डायरीमध्ये त्याने आजवर केलेले हत्याकांड सगळं विस्तृतपणे लिहिलेलं होतं. हा सगळा प्रकार त्याने फक्त बुद्धिमान होण्यासाठी केला होता.

पुढे २०१२ मध्ये राजा कलंदरला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण बाहेर यायला १२ वर्ष लागली हेसुद्धा आश्चर्यच होतं. राजा कलंदर मधेच म्हणायचा कि हे मी केलेलं नाही, यात माझा काहीही हात नाहीए, राजकारणी आणि पोलिसांनी मला अडकवलेल आहे. पण जेव्हा डायरी दाखवली जायची तेव्हा तो म्हणायचा हि डायरी माझी आहे, हे हस्ताक्षर माझं आहे. 

न्यायालयाने हि दुर्मिळ केस असून आणि राजा कलंदर हा मानसिक रुग्ण असून त्याला आजन्म कारावास ठोठावला. पण हा राजा कलंदर इतक्या विकृत प्रकृतीचा असलो असा त्याच्या घरच्या लोकांनासुद्धा वाटत नव्हतं.

बुद्धिमान लोकांचे मेंदू काढून त्या मेंदूचा सूप प्यायल्याने आपणही बुद्धिमान होऊ असा चस्का त्याला लागला होता आणि त्यातून त्याने हे कांड केलं ज्याने देश हादरला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.