सी.वी. रमन यांची ऑफर डावलून ते संघात गेले आणि पुढे सरसंघचालक बनले…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्रसिंह उर्फ रज्जू भैय्या, १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान रज्जू भैय्या बर्‍यापैकी सक्रिय होते आणि याच वेळी ते आरएसएसच्या संपर्कात आले आणि आरएसएसच्या विचारधारेचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पाडला.

जेंव्हा रज्जू भैय्या एमएससीची परीक्षा देत होते, तेंव्हा रज्जू भैय्या यांचे परीक्षक होते ते म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते सर सी.वी रामन हे होय. 

सी.वी रामन यांनी देखील त्यांना हुशार विद्यार्थी म्हणून गौरव केला होता.

त्यांनी रज्जू भैय्या यांना न्यूक्लियर फिजिक्सच्या प्रगत संशोधनासाठीची फेलोशिप ऑफर केली होती. 

स्पेक्ट्रोस्कोपी शिकवण्यासाठी फिजिक्समध्ये शिक्षण घेऊन मग रज्जू भैय्या अलाहाबाद विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी अनेक वर्षे या विद्यापीठात अध्यापन केले आणि नंतर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली.

त्यांना न्यूक्लियर फिजिक्समधील तज्ज्ञ मानले जायचे जे भारतात त्या काळात ते त्या विषयाचे एकमेव अभ्यासक होते.

ते विद्यापीठात या विषयाचे खूप लोकप्रिय शिक्षक होते कारण विद्यार्थ्यांना अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत अवघड संकल्पना शिकवायचे, समजावयाचे.

डॉ. मुरली मनोहर जोशी हे त्यांच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांपैकी एक होते, त्यांच्या आयुष्यावर रज्जू भैया यांच्या कारकीर्दीचा खूप मोठा प्रभाव आहे ते नेहमीच सांगतात.

१९६६ मध्ये त्यांनी विद्यापीठामधील पदाचा राजीनामा दिला आणि आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले. त्यांना उत्तर प्रदेशच्या ‘प्रांत प्रचारक’ ची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी या पदावर काम करीत, समाजातील सर्व घटकांतील नेते, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंताच्या भेटी घेतल्या.

रज्जू भैया आणि लाल बहादूर शास्त्री, चंद्र शेखर, व्ही.पी यांच्याशी त्यांचे खूप चांगले संबंध होते.

आणीबाणीच्या काळात रज्जू भैय्या भूमिगत होऊन संपूर्ण भारत दौरा केला. १९७६ मध्ये दिल्ली येथे न्यायमूर्ती व्ही. एम. तारकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मानवाधिकार अधिवेशनाचे आयोजन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले होते. १९८० च्या दशकात रज्जू भैय्या सरकार्यावाहक (सरचिटणीस) म्हणून कार्यरत राहिले.

१९९४ मध्ये बाळासाहेब देवरस यांच्यानंतरचे आर. एस. एसचे सरसंघचालक बनले ते म्हणजे रज्जू भैया.

संघाचे पहिले आणि शेवटचे बहुजन असणारे सरसंघचालक म्हणजेच रज्जू भैया !

स्वदेशी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या संकल्पनेवर त्यांचा ठाम विश्वास होता.

ग्रामीण विकासाच्या कार्याची सुरूवात करून त्यांनी १९९५ मध्ये घोषित केले होते की, खेड्यांना उपासमारमुक्त, रोगमुक्त व शिक्षित करण्यासाठी सर्वात जास्त प्राधान्य दिले जावे. आज संघ मोठ्या प्रमाणात खेड्यांमध्ये समग्र ग्रामीण विकासासाठी काम करीत आहे.

स्वयंसेवकांनी केलेल्या ग्रामीण विकास कामांमुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना प्रेरणा मिळाली आहे आणि इतर प्रयोगांमध्ये त्यांच्या प्रयोगांचे अनुकरण केले जातेय.

२००० च्या फेब्रुवारी मध्ये त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी सरसंघचालकांची जबाबदारी सोडली आणि  के.एस. सुदर्शन यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. आणि १४ जुलै २००३ रोजी महाराष्ट्रातल्या पुणे येथील कौशिक आश्रमात रज्जु भैया यांचे निधन झाले.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.