अखेरच्या क्षणी देखील तो डिम्पलला म्हणाला,” राजा मौत के बाद भी राजाही होता है…..”

बॉलिवूड म्हणल्यावर डोळ्यापुढे भव्य दिव्य सेट, लायटिंग, हिरो, हिरोईन असं सगळं लख्ख डोळ्यासमोर उभं राहतं. प्रत्यक्ष जीवनात पडद्यावरचा रोमान्स, नाती वैगरे सगळं विसरून वास्तवाला सामोरं जावा लागतं. आजचा किस्सा सुद्धा असाच आहे, एकेकाळचा सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्याबद्दलचा.

डिंपल कपाडियाचा आज बड्डे. ८ जून १९५७ साली डिंपलचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधन असल्याने मोठ्या लाडाकोडात ती वाढली. तिच्या वडिलांचा संबंध चित्रपट क्षेत्राशी होता. पण डिंपल कपाडियाच्या जीवनात असा क्षण आला कि त्याकाळच्या तरुणाईच्या मनात ती कायमचीच रुजली गेली. आजही डिंपल कपाडिया त्या चित्रपटामुळे ओळखली जाते.

तर झालं असं कि बॉबी या चित्रपटासाठी द ग्रेट शो मॅन राज कपूर अभिनेत्री शोधत होते. त्यावेळी डिंपल कपाडिया म्हणायची कि बॉबी चित्रपट शेवटी मलाच मिळणार आहे. आणि झालंही अगदी तसंच. राज कपूर यांनी त्यावेळी डिंपल कपाडियाला नर्गिसचे चित्रपट दाखवले आणि सांगितलं कि इतके निरागस हावभाव हवे आहेत.

केवळ १६ वर्षे वय असताना डिंपल कपाडियाने तो चमत्कार केला जो मोठमोठ्या अभिनेत्रींनासुद्धा जमला नाही. तिला मिळालेल्या यशात सगळ्यात मोठा वाटा होता राज कपूर यांचा. राज कपूर यांच्या बॉबीने थेटरमध्ये धुमाकूळ सुरु केला. मेरा नाम जोकर नंतर राज कपूर यांनी बॉबी मार्केटमध्ये आणला आणि हा चित्रपट राज कपूरला भरपूर प्रेम आणि पैसा देऊन गेला.

ऋषी कपूर आणि डिंपल कपाडियाची जोडी इतकी परफेक्ट बॉबीमध्ये जमून आली कि त्यानंतर मात्र बॉलिवूडमध्ये लव्ह स्टोरीचा महापूर येऊ लागला. बॉबी रिलीजच्या मार्गावर असताना डिंपल कपाडिया एका वेगळ्याच वळणावर गेली.

त्यावेळी बॉलिवूडचा बेताज बादशहा , सुपरस्टार होते राजेश खन्ना. राजेश खन्नाच्या स्टारडमची भुरळ डिंपल कपाडियालासुद्धा पडली.

आणि अचानकपणे इतक्या कमी वयात तिने राजेश खन्नासोबत लग्न करून एक खळबळ उडवून दिली.

दोघांच्या वयात कमालीचं अंतर होतं तरीही त्यांनी लग्न केलं आणि डिंपल कपाडिया पुढे १२ वर्षे अभिनयापासून लांब राहिली. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या त्यांना मुली झाल्या. या काळात फॉर्ममध्ये असलेले राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला खिंडार पडलं होतं. आणि एकेक चित्रपट त्यांचे फ्लॉप ठरू लागले होते.

मॅगझिनमध्ये बातम्या छापून येऊ लागल्या होत्या कि राजेश खन्नाचं करियर आता संपलं आहे. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना वेगळं राहतात, नात्यात वितुष्ट आलं आहे वैगरे अशा प्रकारच्या बातम्या झळकू लागल्या. सनी देओल सोबत डिंपलचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगत होत्या.

पुढे डिंपल कपाडिया राजेश खन्नापासून वेगळी झाली आणि सागर चित्रपटात दिसली. हा चित्रपट इतका जबरदस्त चालला कि डिंपल कपाडिया पुन्हा चर्चेत आली.

डिंपल कपाडियाने पुढे वेगळ्या धाटणीचे रोल करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. क्रांतिवीर, दृष्टी, गर्दीश, रुदाली, फाइंडिंग फॅनी अशा वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये ती दिसली. दिल चाहता हे मधला डिंपल कपाडियाचा रोल कोण विसरू शकतो. 

इकडे राजेश खन्नाने जे स्टारडम मिळवलं ते इतर कुणालाही जमलं नाही. ज्यावेळी त्यांना विचारलं जायचं कि जीवनात कुठल्या गोष्टीचा पश्चाताप व्यक्त करावा वाटतो का तर त्यावर ते म्हणायचे पश्चाताप वाटावा अशा गोष्टीच नाहीत.

जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं

हा त्यांचा अजरामर डायलॉग होता. राजेश खन्ना अंथरुणाला खिळले त्यावेळी त्यांनी डिंपल कपाडिया आणि त्यांच्या मुलींना सांगितलं होत कि,

राजा हा राजाच असतो. मरणानंतरही तो राजाच असतो. माझी अंत्ययात्राही राजासारखीच निघाली पाहिजे.

डिंपल कपाडिया यांनी तसंच केलं. अगदी भव्य दिव्य अशी त्यांची अंत्ययात्रा काढली. लाखोंच्या संख्येने लोकांची गर्दी जमली होती. राजेश खन्नासोबत त्यांचं सुरवातीचं आयुष्य चांगल्या प्रकारे जरी गेलं असलं तरी नात्यात आलेल्या वितुष्टामुळे त्यांना वेगळं व्हावं लागलं आणि राजेश खन्नाला वाईट दिवस पाहावे लागले.

वयाच्या १६ व्या वर्षी लग्न आणि सुपरहिट चित्रपट देऊन डिंपल कपाडिया त्याकाळची मॉडर्न हिरोईन म्हणून ओळखली जात होती. 

हे हि  वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.