स्पोर्टबाईक म्हणजे पल्सर इतकं परफेक्ट सेगमेंट राजीव बजाज यांनी तयार केलं …

बजाजच्या स्कुटर सध्या जरी दुर्मिळ झाल्या असल्या तरी स्पोर्टबाईक मात्र सगळीकडे दिसून येतात. एकेकाळी किक मारणारी स्कुटर ते मॉडर्न बाईक असा प्रवास बजाजचा होता. २९ नोव्हेम्बर १९४५ साली बजाज बचराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सुरु झाली. सुरवातीच्या काळात इंपोर्टेड बाईक आणि स्कुटर बजाज विकत असे.

१९६५ साली राहुल बजाज हे या ग्रुपचे चेअरमन झाले आणि पुढील काही वर्षात बजाज स्कुटर सेगमेंट मधील नंबर वन ब्रँड बनला. पण हे यश मिळवणं बजाजला कदापि सोपं ठरलं नाही. १९९० साली मार्केटमध्ये भयंकर मंदी आली, मार्केट डाऊन झाल्याने अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होते. ग्लोबलायझेशनचं वारं भारतात वाहू लागलं होतं. 

पेट्रोलच्या बचतीमध्ये मोटर सायकल हे स्कुटरच्या पुढे निघून चाललं होतं. बँकांनी नवीन वाहनावर लोन देण्याची योजना आणली त्यामुळे लोकं स्कुटरवरून शिफ्ट होऊन मोटारसायकलकडे वळले. कारण मोटारसायकलमुळे पेट्रोलची बचत स्कुटरच्या तुलनेत जास्त होत होती.

जपानी कंपन्या हिरो होंडा, सुझुकी, यामाहा या भारतात आपली मार्केटिंग वाढवून आपला व्यवसाय थाटू लागल्या होत्या. या सगळ्या कंपन्या फक्त मोटारसायकल ब्रँडची जाहिरात करत असे. आधुनिक टेक्नॉलॉजी, पेट्रोल इफिसिएंसी, प्रॉडक्शन अशा सगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या या गाड्या बाजारात धुमाकूळ घालू लागल्या होत्या.

विदेशी कंपन्यांच्या मार्केटमधील अतिक्रमणामुळे बजाज मार्केटमधून बाहेर फेकला गेला. पण नंतर बजाज ने असं काय केलं कि ज्यामुळे त्यांनी अशी सक्सेस मिळवली कि कोणी नंतर त्यांच्या नादी लागलं नाही.

१९९० साली राहुल बजाज हे विदेशामधून आपली डिग्री पूर्ण करून आले.

त्यांना स्कुटरमध्ये शून्य इंटरेस्ट होता.

त्यांनी आल्याबरोबर मोटारसायकलवर काम करणं सुरु केलं. या मोटारसायकलवर मेहनत घेण्यासाठी त्यांनी पुण्याच्या चाकण मध्ये एक अत्याधुनिक प्लांट उभा केला.

कंपनी मधल्या सिनियर लोकांची हा प्लांट उभा करण्याची अजिबात इच्छा नव्हती.

९० च्या दशकात बजाजने आपला गाशा जवळपास गुंडाळलाचं होता. हिरो होंडाने ११ मिलियन स्प्लेंडर विकून देशामध्ये वादळ निर्माण केलं.

राजीव बजाज यांनी हिरो होन्डाला फाईट देईल अशा गाड्या बनवल्या खऱ्या पण सगळंच फेल ठरलं. सगळा टेक्नॉलॉजीमध्ये फरक होता, जिथं बजाजला २ स्ट्रोक होत्या तिथं होंडा ४ स्ट्रोकवर हवा करत होती. बजाजपेक्षा हिरो होंडा पुष्कळ पुढे गेली होती. मग मात्र राजीव बजाज यांनी चिंतन केलं. प्रतिस्पर्धी लोकांना आंधळेपणाने फॉलो करत राहणे कधीही धोक्याचं म्हणून त्यांनी ब्रेक घेतला.

आता राजीव बजाज यांनी स्वतःच नवीन काहीतरी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यांनी बाजारात उतरवली देशातली पहिली स्पोर्ट बाईक. इंजिन कपॅसिटी ५०-८० % होतं स्प्लेंडरच्या तुलनेत. स्पोर्ट बाईक ज्या दणकट असतात आणि दमदार असतात अशा गाड्यांबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच हवा तयार केली. सगळ्यात अगोदर पल्सर १५०CC आणि १८० CC लॉन्च करण्यात आली. 

जितक्या आत्मविश्वासाने हि पल्सर लॉन्च केली गेली तितक्या दुप्पट वेगाने ती अयशस्वी ठरली. प्रोडक्ट पूर्णपणे तयार नव्हतं आणि मार्केटमध्ये ते कितपत टिकेल याची शाश्वती नव्हती. पण हिंमत न हारता राहुल बजाज यांनी महागड्या स्पोर्ट बाईकची निर्मिती केली. त्यांनी ठरवलं कि स्प्लेंडर आणि इतर गाडयांना फॉलो न करता केवळ बजाजच्या मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करणे.

हि युक्ती बजाजला कामा आली आणि पुढे दर महिन्याला पल्सर ३० हजार गाड्या विकू लागलं.

२००६ साली त्यांची विक्री इतकी वाढली कि एकेकाळी आघाडीवर असलेल्या हिरो होंडा ब्रॅण्डच्या आणि बजाजच्या विक्रीत फक्त ३२ हजार बाईकच अंतर उरलं होतं. २००७ पर्यंत सगळं ओके सुरु होतं.

पण अचानक बजाजने गडबड निर्णय घेऊन आपलं मार्केट पुन्हा डाऊन केलं. बजाजच्या ह्या प्रकरणे हिरो होंडाने पुन्हा मार्केटमध्ये आघाडी घेतली आणि बजाजच्या दुप्पट बाईक विक्री केली. याच कारण होत बजाजने आहे त्या ब्रॅण्डवर फोकस न करता नवीन बाईक तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हि स्थिती ओढवली गेली होती.

यामुळे राजीव बजाज भयंकर खचले आणि म्हणाले कि,

हिरो होंडा खूप मोठा ब्रँड झाला असून बजाज हा विहिरीतल्या छोट्या बेडकाप्रमाणे झाला आहे आता त्याने उडी मारायला हवी.

त्याचवेळी हिरो होंडाचे पवन मुंजाळ यांनी उत्तर दिल कि,

सगळ्यांसाठी हा बाजार इतका मोठा आहे तर उड्या का मारायच्या आहेत.

बाजारातल्या सगळ्या बाईक बनवणाऱ्या कंपन्यांनी बजाज आता संपलं असल्याची घोषणा केली. पण राहुल बजाज यांनी ठरवलं कि आता फक्त एकाच बाईकवर आपण लक्ष देऊ. योगा आणि होमियोपॅथी ते करू लागले.

वेगळ्या पद्धतीने विचार करून पल्सर वर काम करून पल्सरला प्रीमियम ब्रँड तयार केला. बजाजने स्टायलिश, पावरफुल, प्रीमियम असलेली बाईक बाजारात आणली. इतर बाईकसोबत जर पल्सरची तुलना केली तर मोठी साईझ, वेग, पावरफुल, दिसायला मॉडर्न अशा सगळ्या वैशिष्ट्यांनी पल्सर परिपूर्ण होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा स्वदेशी ब्रान्ड होता.

पुढील काळात पल्सरने नव्याने आपली ताकद दाखवून दिली आणि स्पोर्ट्स बाईक म्हणजे पल्सर असं समीकरण सेट करून दिल. राजीव बजाज यांनी चुकलेल्या निर्णयावर विचार करून नवीन नवीन उपाय शोधत हि बाईक पुन्हा मार्केटमध्ये आणली आणि यशस्वी करून दाखवली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.