राजीव दिक्षित यांच्या मृत्यूबद्दल रामदेव बाबांवर संशय का घेतला जातो ?

३० नोव्हेंबर २०१० ला राजीव दिक्षित यांचा मृत्यू झाला. मृत्यूच कारण हार्ट अटॅक सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षदर्शीचं मत अस होतं की राजीव दिक्षित यांचे शरीर निळ पडलं होतं. त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता.

राजीव दिक्षित यांच्या समर्थकांच मत होतं की पोस्टमार्टम करावं. पण त्यांच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टम देखील करण्यात आलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव रामदेव बाबांच्या हरिद्वार येथील पतंजली आश्रमात घेवून जाण्यात आलं.

एक ना अनेक संशय व्यक्त करण्यात आले. रामदेव बाबांनीच राजीव दिक्षित यांच्यावर विषप्रयोग केल्याचे आरोप आजही करण्यात येतात. 

राजीव दिक्षित कोण होते. 

राजीव दिक्षित यांच्या मृत्यूस आठ वर्षाहून अधिक काळ झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे व्हिडीओ आजही फेसबुक आणि युट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडीओंमध्ये असतात. त्यांच्या नावाने असंख्य पेजेस फेसबुकवर देखील आहेत. गांधी-नेहरू घराण्यांपासून ते हिंदूत्त्व, भारतीय संस्कृती एलोपॅथीचा विरोध आणि प्राचीन आयुर्वेदाचा पुरस्कार अशा कित्येक गोष्टींवर त्यांनी आपली मते मांडली आहे. आज देखील त्यांच्या भाषणाचा संदर्भ लोक देत असतात.

वास्तविक यातले बरेचशे दावे खोटे असल्याच सप्रमाण सिद्ध झालं असल तरी आज देखील राजीव दिक्षित यांची क्रेझ कोणीही नाकारू शकणार नाही. 

३० नोव्हेंबर १९६७. युपीतल्या अलीगझ मध्ये राजीव दिक्षित यांचा जन्म झाला. टिपीकल मध्यमवर्गीय कुटूंबात जन्मलेले राजीव दिक्षित आपल्या हूशारीने अलाहाबादच्या कॉलेजमघ्ये बी.टेक करु लागले. या कॉलेजवयात त्यांचा संबधं स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तिंसोबत आला.

त्यांनी आझादी बचाओं आदोलन  कॉलेजला असतानाच सुरू केले. त्यानंतर IIT मधून एम.टेक आणि CISR मध्ये जॉब करण्यास त्यांनी सुरवात केली. CISR च्या नोकरीच्या काळात माजी राष्ट्रपती एपेजी अब्दुल कलाम त्यांचे सहकारी असल्याच सांगण्यात येत. काही काळातच CISR मधून बाहेर पडून त्यांनी स्वदेशीचा नारा दिला.

इथून पुढचं आयुष्य राष्ट्रवाद, प्राचीन भारताची सभ्यता-संस्कृतीचा प्रचार आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी घालवण्याचं निश्चित करण्यात आलं. 

स्वदेशी आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरवात. 

सहजासहजी सर्वसामान्य लोकांच्या भावनेला हात घालतील अशी मते मांडण्यात राजीव दिक्षित प्रसिद्ध होते. त्यांच मत होत की पाश्चिमात्य देश हे भारत काबिज करण्याच्या तयारीत आहेत  त्यातून मॅकोलेच्या शिक्षणपद्धतीपासूनच आपल्या देशाची वाट लावण्यात आली आहे.

आपली शिक्षणपद्धती गुरूकूल पद्धतीची असावी. त्याचसोबत ५००, १००० च्या नोटाबंद करून भष्ट्राचार थांबवण्यात यावा. स्वदेशीचा पुरस्कार करून परदेशात जाणाऱ्या पैसे थांबवण्यात यावेत अस त्यांच मत होत. 

त्यांच्या भाषणात अनेकदा खोटे दावे केले जातं, पण लोकांना सहजपटण्यासारखी थेअरी असल्याने लोकांचा त्यावर विश्वास बसत असे. 

उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्या मते,

  • भोपालची दुर्घटना हि अमेरिकेने केलेले परिक्षण होते. या परिक्षणात भारतातील गरिब नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. 
  • अमेरिकेवर झालेला 9/11 चा हल्ला हा खुद्द अमेरिकेने घडवून आणला होता. जगावर युद्ध थोपण्याच्या, तेल विहीरी ताब्यात घेण्याच्या हेतूने अमेरिकेनेच हा हल्ला केला होता. 
  • ममता बॅनर्जी या स्वत: बीफ खातात त्यामुळे त्या प.बंगालमध्ये बीफ बंदी करण्यास विरोध करतात. 
  • मॅग्गी मध्ये डुकराच्या मांसाचा वापर केला जातो. 

ते अमिताभ बच्चन, वाजपेयी, धर्मेंद्र हेमा मालिनी अशा व्यक्तिंसोबत व्यक्तिगत संपर्कात असल्याचे दावे करायचे हेमा मालिनी बेसणने अंघोळ करते लक्स वापरत नाही, अमिताभ बच्चन व्यक्तिश: सांगतात की त्यांच्या आतड्यांचे ऑपरेशन पेप्सी मुळे करावे लागले. त्यानंतर त्यांनी पेप्सीची जाहिरात करणं बंद केलं. ते आपल्या भाषणातून विदेशी कंपन्याविरोधात अशा प्रकारे प्रचार करत की ऐकणारी माणसं तात्काळ विदेशी कंपन्याचा त्याग करत असत. 

राजीव दिक्षित त्या काळात स्वदेशीचा प्रचार करणारं, संस्कृती आणि धर्माचा पुरस्कार करणारं सर्वात मोठ्ठं नाव होतं. त्या मानाने रामदेव बाबा हे बरेचसे प्रसिद्धीपासून मागे होते. 

राजीव दिक्षित आणि रामदेव बाबांची भेट. 

रामदेव बाबा आणि राजीव दिक्षित यांची भेट २००९ साली झाल्याच सांगितलं जात. एका कार्यक्रमानिमित्त हि भेट झाल्यानंतर रामदेव बाबा राजीव दिक्षित यांच्यामुळे प्रभावित झाले होते. राजीव दिक्षित यांनी आपल्या भाषणात काळ्या पैशाबाबत घेतलेला मुद्दा बाबा रामदेव यांनी देखील मांडण्यास सुरवात केली. 

२००९ साली स्वाभिमान आंदोलनास सुरवात झाली.

बाबा रामदेव यांचे समर्थक हे स्वाभिमान आंदोलन बाबा रामदेव यांची संकल्पना असल्याच सांगतात तर राजीव दिक्षित यांचे समर्थक हे आंदोलन राजीव दिक्षित यांचे असल्याचं सांगतात. राजिव दिक्षित या ट्रस्टचे सचिव देखील होते. 

बाबा रामदेव आणि राजीव दिक्षित यांच्या दोघांच्या पुढाकारातून हे आंदोलन उभा करण्यात आलं होतं. १०० टक्के लोकांना मतदान करायला प्रेरित करणं, भारताला विश्वशक्ती बनवनं, भारताला पुर्णत: स्वदेशी बनवणं अशी ध्येय ठेवण्यात आली. इतकचं नाही तर व्यापक जनआंदोलन उभा करून २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी एका चांगल्या स्वच्छ पक्षाचा पर्याय लोकांपुढे ठेवणं. 

या आंदोलनाची सुरवात आस्था आणि संस्कार चॅनेलवरुन केली गेली. सुरवातीच्या काळात बाबा रामदेव आणि राजीव दिक्षित यांचे भाषण दाखवण्यास सुरवात झाली. बाबा रामदेव यांच्याहून अधिक राजीव दिक्षित यांची भाषणे गाजू लागली, त्यांना लोकप्रियता मिळू लागली त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होवू लागला अस राजीव दिक्षित यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते. 

राजीव दिक्षित यांचा मृत्यू कसा झाला ? 

२०१० सालच्या नोव्हेंबर २६ ते २९ दरम्यान राजीव दिक्षित छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. छत्तीसगडच्या वेगवेगळ्या भागातून व्याख्यान करून ते ३० तारखेला भिलाईला पोहचले होते. तेव्हा अचानकपणे त्यांची तब्येत खराब झाली.

हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना भिलाईच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर इथून त्यांना अपोलो BSR हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. BSR हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याच घोषित केलं. 

या प्रसंगी राजीव दिक्षित यांचे जे समर्थक होते ते सांगतात की,

राजिव दिक्षित यांनी कोणत्याही परिस्थितीत एलोपॅथीचे उपचार घेण्यास नकार दिला. समर्थकांच्या दाव्यानूसार त्यांचं शरिर निळ पडलं होतं, त्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली पण त्यास नकार देण्यात आला. त्यांच्या मृत्यूसाठी विषप्रयोग करण्यात आला असून तो रामदेव बाबांनीच केल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात आला.

मात्र रामदेव बाबांनी त्यास उत्तर देताना माझी राजीव दिक्षित यांच्यासोबत त्याच दिवशी बोलणं झालं होतं. त्यांची तब्येत सकाळपासूनच खराब होती व ते काही केल्या एलोपॅथीचे उपचार घेण्यास तयार नव्हते अस सांगितलं. 

विशेष म्हणजे शवविच्छेदन न करता त्यांचे पार्थिव वर्ध्याला घेवून न जाता ते हरिद्वारला घेवून जाण्यात आले.

तिथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यामुळे राजीव दिक्षित यांच्या समर्थकांच्या दाव्याला बळ मिळत गेले. यानंतर मात्र खुद्द राजीव दिक्षित यांच्या कुटूंबाने मौन पाळणं पसंद केलं.

त्यांनी कधिही त्यांच्या मृत्यूबद्दल भाष्य केलं नाही. याचाच फायदा घेवून राजीव दिक्षित यांच्या समर्थकांकडून रामदेव बाबांवर संशय़ घेण्याच काम चालू राहिलं जे आज देखील चालूच असतं, पण फक्त समर्थकांच्या जोरावरच. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.