पायलट म्हणून काम करणाऱ्या राजीव गांधींना ‘या’ स्वामींनी राजकारणात यायला लावलं.

देशाला २१ व्या शतकात नेतृत्व करायला हवे या आवाहनासह भारताचे भविष्य वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि औद्योगिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी आजही स्मरणात आहेत.

आपल्या आईच्या हत्येच्या दुखातून सावरले हि नसतील कि, राजीव यांनी लोकसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले आणि जिंकूनही आले. हे तर स्पष्ट होते की राजकारणात करीअर करण्यामध्ये त्यांना अजिबात रस नव्हता तरी देखील त्यांनी एक यशस्वी पंतप्रधान असण्याची प्रत्येक भूमिका बजावल्या.

वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. 

डेहराडून येथे शालेय शिक्षणानंतर, राजीव गांधींनी केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी लंडनमध्ये ए-लेव्हल म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी पात्रता प्रमाणपत्र पूर्ण केले. त्यांनी तेथे तीन वर्षे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पण डिग्री मिळवली नाही.

राजकारणात येणे हे काही नियोजित नव्हतेच. त्यांच्याकडे तत्वज्ञान, राजकारण किंवा इतिहासाशी संबंधित पुस्तके नसायची तर सायन्स आणि इंजिनीअरींगची बरीच पुस्तके असायची. तसचं त्यांना वैमानिक बनायचं होतं. विमान उड्डाण करणे हा त्यांचा छंद होता. सहाजिकच होते की इंग्लंडहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा पास केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती पत्र मिळवले.

आणि लगेचच ते इंडिअन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले.

राजीव गांधींना इंडियन एअरलाइन्सने आत्ताचे एअर इंडिया कंपनीने देशांतर्गत मार्गांवर पायलट म्हणून नोकरी दिली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिल्ली-जयपूर मार्गावर उड्डाण केले. त्यांना त्यासाठी  महिन्याला ५,००० रुपये पगार होता.

एका मुलाखतीमध्ये राजीव गांधी म्हणाले की त्यांना “परीक्षांसाठी घोकंपट्टी” करण्यात मला रस नव्हता. म्हणून भारतात परतल्यावर ते दिल्लीतील फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाले, जिथे त्यांना पायलट म्हणून प्रशिक्षण देण्यात आले.

त्यावेळी त्यांची आई इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. तरीही, वैमानिक म्हणून पगार मिळवण्यात त्याला कसलाही संकोच नव्हता.

राजीव गांधींचे उड्डाणप्रेम त्यांच्या बेधडक विमानं उडविण्याच्या वेगावरून दिसून आले. राजीव गांधी हे कदाचित एकमेव पंतप्रधान होते जे स्वतःची कार स्वतः चालवायचे. 

पत्रकार सुमन चट्टोपाध्याय यांचे “माय डेट विथ हिस्ट्री: अ मेमॉयर” हे पुस्तक, १९८६ च्या बंगाल निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधींनी स्वत: ची कार चालवताना वर्णन केले. राजीव गांधीं यांचे  राजकारणात येण्याचे काही प्रयोजन नव्हते कारण त्यांचे भाऊ संजय गांधीच्या अपघाती मृत्यूने त्यांचे आयुष्यच बदलले, जबाबदाऱ्या आल्या.

राजीव गांधींनी राजकारणात येण्यासाठी पायलट म्हणून आपली कारकीर्द सोडली.

पण त्याला अजून एक कारण होते. त्यांच्यासाठी पायलट म्हणून आपली कारकीर्द सोडणे सोपे काम नव्हते. पण त्यांना ते सोडून राजकारणात आणण्यासाठी मनविण्यात त्यांच्या आई च्या व्यतिरिक्त एका व्यक्तीने मोठे कष्ट केले. ते म्हणजे बद्रीनाथ शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद !

यांनी राजीव गांधींच्या या निर्णयावर प्रभाव टाकला. संजय गांधींच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधींना भेट देणाऱ्या उच्चपदस्थ मान्यवरांमध्ये ते होते. गांधी कुटुंबासोबत त्यांची जवळीक होते. राजीव गांधींनी विमाने उडवणे बंद करावे, आणि आता वेळ आली आहे तर राजकारणात उतरावे असा सल्ला त्यांनी दिला.

इंदिरा गांधींनी प्रतिक्रिया दिली होती की राजीव गांधींनी विमान उडवणे बंद केले तर ते आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकणार नाहीत. तेव्हा स्वरूपानंद यांनी राजीव गांधींन समजावले कि त्यांनी  राजकारणात यावे. अनेक प्रयत्नानंतर त्यांनी तयारी दाखवली त्यांनी इंडियन एअरलाइन्सचे पायलट पदाचा राजीनामा दिला आणि १९८० मध्ये अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवली आणि तेंव्हापासून  सक्रीय राजकारणात उतरले.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.