राजीव गांधींच्या नावावरून आता पिंपरी चिंचवडमध्ये वाद सुरु झालायं..

काही दिवसांपूर्वीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने खेलरत्न पुरस्काराला असलेले माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे नाव बदलून या पुरस्काराला हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. ज्यानंतर एकच वाद पेटला. काँग्रेस- भाजप आपापसात भिडले होते. आता तो वाद संपत नाही तर पुन्हा एकदा नव्या वादाने डोकं वर काढलंय.

राज्यात उभारण्यात येणाऱ्या ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीला आता ‘पदमविभूषण रतन टाटा विज्ञान अविष्कार नगरी नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय. आता या मागणीमुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

खरं तर, गेल्या १ सप्टेंबरला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने पिंपरी-चिंचवड भागात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने सायन्स सिटी बांधण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली.  राज्य मंत्रिमंडळाने देखील याला मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत यासाठी १९१ कोटी रुपयांची रक्कमही मंजूर करण्यात आलीये.

पण ही  विज्ञान नगरी उभी राहण्याच्या आधीचं वाद्याच्या भोवऱ्यात सापडलीये. चार दिवसांपूर्वीच काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य सरकारचे अभिनंदन केले होते. मात्र त्यांनतर भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पाला ‘पदमविभूषण रतन टाटा विज्ञान अविष्कार नगरी’ असं नाव देण्यात यावं अशी मागणी लावून धरली.

महेश लांडगे म्हणाले कि,

शहराच्या जडणघडणीत पदमविभूषण रतन टाटा यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे या प्रकल्पाला त्यांचेच नाव देण्यात यावे.

आमदार लांडगे पुढे म्हणाले कि, या प्रकल्पाला पदमविभूषण रतन टाटा विज्ञान अविष्कार नगरी असे नाव देण्यात यावे, यासाठी केंद्र सरकारमधल्या संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधला जाईल. महत्वाचे म्हणेज हे माझं किंवा भाजपचंच म्हणणं नाही तर शहरवासियांकडून देखील हीचं मागणी करण्यात येतेय.

दरम्यान, यावर काँग्रेसने आपला विरोध दाखवलाय. काँग्रेसचे पिंपरी- चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी म्हंटल कि,

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणारे. त्यात संगणक क्षेत्रातील प्रगतीत स्वर्गीय राजीव गांधी याचं अमूल्य योगदान आहे. त्यामुळे त्यांचंच नाव या प्रकल्पाला योग्य आहे.

साठे यांचं म्हणणं आहे कि, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी गरज लक्षात घेता राजीव गांधी यांनी संगणक क्षेत्राची उभारणी केली. त्यामुळेच आज भारतात प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती होतेय, लाखो लोकांना रोजगार मिळतोय. देशाच्या उत्पन्नातं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि हे सगळं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यामुळेच शक्य झालयं. त्यामुळेच यांच्याच नावे विज्ञान अविष्कार नगरी उभारणे योग्य आहे. 

आता या दोन्ही नेत्यांनी आपलं म्हणणं मांडलं खरं पण यामुळे नवा वाद सुरु होणारे.

त्याआधी , ठाकरे सरकारने राजीव गांधींच्या नावाने आयटी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या प्रोजेक्टवर लवकरच काम सुरु होणार असून येत्या पाच वर्षात हे बांधून पूर्ण करणार असल्याचं आवाहन वर्षा गायकवाड यांनी दिल.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी म्हंटल कि,

या विज्ञान अविष्कार नगरीमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. जागतिक दर्जाच्या या प्रकल्पामुळे शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ८ एकरचा भूखंड आहे. त्या भूखंडाच्या एक एकरावर जागतिक दर्जाचं सायन्स  पार्क तयार होणार असून बाकीच्या ७ एकर जमिनीवर, भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी’ बांधण्यात येईल. ही नगरी विज्ञानाच्या विविध संकल्पनांवर आधारित बांधली जाईल. या प्रोजेक्टसाठी मोठं बजेटही काढण्यात आलंय.

दरम्यान, जेव्हा खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं होत, तेव्हा देखील महाविकास आघाडीने  माजी पंतप्रधानांच्या नावाने राजीव गांधी आयटी पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचे आयटी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले होते की, हा पुरस्कार राज्यातील आयटी कंपन्यांना पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दिला जाईल. 

हे ही वाचं भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.