डॉली खन्ना : एक गृहिणी शेअर मार्केटमधून हजारों कोटींची मालक झाली…

हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित SCAM १९९२ सिरीज आल्यापासून स्टॉक मार्केटमध्ये अनेकांनी उडी घेतली आहे. घरबसल्या ट्रेडिंग करून पैसे मिळवणे हे करोना काळात महत्वाचं मानलं गेलं आणि बरेच जण या व्यवसायाकडे वळले.

पुरुषांचं वर्चस्व मानल्या जाणाऱ्या या शेअर मार्केटमध्ये एका गृहिणीने सगळ्यांनाच अवाक केलं आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून या गृहिणीने करोडो रुपयांची उलाढाल केली.

नक्की कोण आहेत या गृहिणी आणि हि इतकी मोठी यशस्वी कमाई त्यांनी कशी केली जाणून घेऊया.

डॉली खन्ना या एका गृहिणीने करोडो रुपयांची कमाई केली असून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या सगळ्या लोकांकडून त्यांचं कौतुक केलं जातं. मूळच्या चेन्नईच्या असलेल्या डॉली खन्ना या आपल्या पती राजीव खन्नासोबत हा त्यांचा करोडोंचा व्यवसाय करत आहे.

या जोडप्याचा आज घडीला नेटवर्थ हा १००० कोटीहून जास्त रुपयांचा आहे.

त्यांच्या या व्यवसायात रेन इंडस्ट्री, केसीपी लिमिटेड, न्यूलैंड लॅबोरेटरीज, बटरफ्लाय गांधीमठी, न्यूक्लियस सॉफ्टवेअर, एनसीएल इंडस्ट्रीज, रेडीको खेतान, जेके पेपर अशा अनेक कंपनीं त्यांच्यासोबत काम करतात. रेन इंडस्ट्रीजमध्ये त्यांची गुंतवणूक हि ७९ करोड रुपये आहेत.

डॉली खन्ना यांचे पती राजीव खन्ना हे आजच्या घडीला त्यांचा व्यवसाय सांभाळतात. चेन्नईतल्या एका मध्यमवर्गीय परिवारातून आलेले राजीव खन्ना यांना सुरवातीच्या काळात बराच संघर्ष करावा लागला. अभ्यासात हुशार असल्याने पुढे त्यांना मद्रासच्या आयआयटी कॉलेजात प्रवेश मिळाला.

१९८६ साली राजीव खन्ना यांनी एक आईस्क्रीम कंपनी सुरु केली होती. पुढे स्टॉक मार्केटच्या व्यवसायाबद्दल त्यांना कळल्यावर ९ वर्षानंतर त्यांनी आपली आईस्क्रीम कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरला विकून टाकली.

अगोदर त्यांचा शेअर बाजाराशी काडीचाही संबंध नव्हता.

आयटी कंपनीत एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी शेअर बाजारात हात अजमावायला सुरवात केली. त्यावेळी आयटी कंपन्यांमध्ये शेअर मार्केटच्या चर्चा जास्तच होत्या. आयटी कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करणे हे जिकिरीचे आणि जोखमीचे काम होते तरी त्यांनी गुंतवणूक केली.

२००० साली आयटी कंपनीचे शेअर क्रॅश झाले. पण सुयोगाने राजीव खन्ना यांना यात कसलीही हानी झाली नाही उलट त्यांना यातून बराच फायदा झाला.

आयटीच्या शेअर क्रॅश मुळे राजीव खन्ना हे धास्तावले होते त्यांनी परत कधीही शेअरच्या नदी न लागण्याचा निर्णय घेतला आणि पैसे फिक्स डिपॉजिट करून टाकले. बरेच वर्ष त्यांना शेअर बाजारात यश मिळत नव्हते.

२००४ साली त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

दिल्लीत एका फ्लॅटची चौकशी करत असताना त्यांना युनिटेक या कंपनीबद्दल माहिती मिळाली. १०० करोड किंमत असलेल्या युनिटेक कंपनीत सिटी बँक आणि इतर अनेक लोकांच्या गुंतवणुकी आहेत. त्यावेळी त्यांनी ठरवलं कि या कंपनीत ५-६ लाख रुपये इन्व्हेस्ट करून ते विसरून जाऊ फायदा झाला तर चांगलचं.

२००८ साली रियल्टी सेक्टरमध्ये आलेल्या बूममुळे त्यांना ५-७ लाखांची किंमत डायरेक्ट २५ लाख रुपय झाली. यामुळे शेअर बाजारात त्यांनी परत येण्याचा निर्णय घेतला.

राजीव खन्ना यांनी एक आयडिया लढवली कि ज्या ज्या ब्रँडच्या वस्तू डॉली खन्ना वापरतात त्या त्या ब्रँडमध्ये त्यांनी गुंतवणूक करायला सुरवात केली. त्यात हॉकिन्स कुकर, न्यूट्रीलाईट बटर अशा मोठ्या ब्रॅण्डचा समावेश होता. क्वालिटी बिझनेस मध्ये त्यांना जास्त रस आहे.

२००८ साली शेअर बाजारात आलेल्या मंदीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, पण २००९ च्या रिकव्हरीमुळे त्यांनी जोमाने सुरवात केली. मेरिट आणि नशीब यांच्या जोरावर चालता आलं पाहिजे असं ते म्हणतात.

त्यांच्या या व्यवसायात डॉली खन्ना यांचं मोठं योगदान आहे.

बराच काळ लोकांना डॉली खन्ना आणि राजीव खन्ना हे कोण आहे तेच माहिती नव्हतं, मात्र छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि आज करोडो रुपयांची उलाढाल ते करतात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.