सचिन सावंतांमुळेच राजीव सातव यांनी युवक काँग्रेसचा राजीनामा दिला होता…

असं म्हणलं जातं, सोनिया गांधी यांना जशी अहमद पटेल यांची साथ होती तशीच राहुल गांधी यांना राजीव सातव यांची साथ असायची. या विश्वासू मैत्रीची उदाहरणे कित्येकदा आपल्याला दिसून आलीत. 

जेंव्हा राहुल गांधींनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली तेंव्हा त्यांनी राजस्थानमधील काँग्रेसची जबाबदारी सचिन पायलट यांच्याकडे सोपवली आणि तोपर्यंत गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांना काँग्रेसमध्ये सरचिटणीस बनवण्यात आले आणि त्यानंतर राजीव सातव यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

गुजरातचा प्रभारी असणे म्हणजे फार मोठी जबाबदारी होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एरिया समजल्या जाणाऱ्या गुजरातच्या क्षेत्रात काँग्रेसची जबाबदारी पाहण्याचा भार त्यांच्यावर होता.

कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. तसेच याच काळात आणखी एक बळी गेला तो म्हणजे राजीव सताव. त्यांच्या रूपाने कॉंग्रेस पक्षाचा एक हिरा गमावला असं म्हणता येईल. अगदी कमी वयात त्यांची राजकीय कारकिर्द हि खासदारकीपर्यंतच्या पदापर्यंत पोहोचणे  हि साधीसोपी गोष्ट नव्हतीच.

कारण त्यांच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाची मुलाखत स्वतः राहुल गांधी यांनी घेतली होती.

राहुल गांधी कॉंग्रेसची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी देशभरात मुलाखतींचा सपाटा लावला होता. ते स्वतः प्रत्येक राज्यातल्या मुलाखती घेत होते.  मुलाखत देणाऱ्या सर्व उमेदवारांमध्ये राजीव सातव हे एकमेव उमेदवार होते, जे आपल्या लॅपटॉपसह मुलाखतीला आले होते. अत्यंत सहज आणि प्रभावशाली प्रेझेंटेशन केल्यावर राजीव सातव यांच्यातील नेतृत्व गुण राहुल गांधी यांनी हेरले

याच मुलाखतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्यासमोर फर्स्ट इम्प्रेशन तयार करण्यात राजीव सातव यशस्वी ठरले, त्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही.

महाराष्ट्र युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी राजीव सताव यांची निवड झाली.

या काळात त्यांचे आणखी एक राजकीय गुरु मानले जातात ते म्हणजे सचिन सावंत हे. त्यांच्या राजकीय मार्गदर्शन लाभलेल्या राजीव सातव यांनी आपली राजकीय कारकीर्द योग्य दिशेने चालू ठेवली. पण वयाच्या पस्तीशीच्या टप्प्यावर येऊन राजीव सताव यांनी महाराष्ट्र युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते ते त्यांचे मार्गदर्शक म्हणजे सचिन सावंत यांनी….

का ? तर सचिन सावंत यांनी सांगितल्यानुसार सातव यांनी हा राजीनामा दिला होता. या महाराष्ट्र युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेल्यांनी थांबू नये असा पक्षाचा साधा नियम आहे. म्हणून या नियमाची जाणीव ठेवून, सातव यांनी नैतिकता म्हणून आपला राजीनामा दिला होता….

सातव यांनी हा राजीनामा राहुल गांधी यांना पाठवला होता मात्र राहुल गांधीनी तो राजीनामा स्विकारलाच नाही.

याचं कारणही तसं होतं ते म्हणजे राहुल गांधी यांना राजीव सातव यांचा प्रामाणिकपणा भावला. त्यांच्या  याच राजीनाम्याच्या प्रामाणिकपणामुळे राजीव सातव आणि राहुल गांधी यांच्यातील मैत्री अधिकच घट्ट झाली होती. कोणत्याही नेत्याला आपला सहकारी किंवा कार्यकर्ता राजकारणात कुरघोड्या न करता प्रामाणिक असेल तर आवडेलच. तसंच काहीसं या दोघांमधील नातं होतं.

पक्षनिष्ठा आणि वरिष्ठांना डावलण्याची कुरघोडी राजीव सातव यांनी केली नाही.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.