एका पिक्चरवरून राजीव गांधींच्या हत्येचा प्लॅन बनवण्यात आला होता

21 मे 1991 ला तामिळनाडूतल्या श्रीपेराम्बदुर इथं काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या राजीव गांधी यांची लिब्रेशन टायगर श्रॉफ तमिळ ईलम (LTTE)या श्रीलंकेच्या कडव्या संघटनेच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी मानवी बॉम्ब चा वापर करून निर्गुण हत्या घडवली. भारताच्या पंतप्रधानांच्या हत्येमुळं देशचं नव्हे तर संपूर्ण जग हादरलं होते.

1987 मध्ये पंतप्रधान पदावर असताना राजीव गांधी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती जे आर जयवर्धने यांच्या विनंतीवरून श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने शांती सेना पाठवल्याबद्दल त्यांच्यावर असलेला रोष आणि 1991 मधील मध्यावधी निवडणुकामध्ये ते पुन्हा सत्तेवर येण्याची निर्माण झालेली शक्यता यामुळे LTTE या श्रीलंकेतील संघटनेन त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं.

राजीव गांधींची ही हत्या एक सुनियोजित कट होता

1987 नंतर दोन वर्षांच्या काळात भारतीय सेना आणि एलटीटीई यांच्यात झालेल्या संघर्षात एलटीटीईचे शेकडो सभासद मारले गेले. त्यात शांतिसेना श्रीलंकेत असल्यामुळे एलटीटीईचा चळवळीचे खच्चीकरण होत होतं. या कारणांमुळे ही संघटना राजीव गांधींच्या विरोधात दिली होती

यातूनच या संघटनेनं हत्त्येचा कट रचला आणि तो यशस्वीरित्या पार पाडला. ज्या राजीव गांधींसोबत 11 जण जागीच मारली गेली होती. धानु या तरुणींनं मानवी बॉम्ब बनून हा स्पॉट घडवला होता. जी एलटीटीईची सदस्य असल्याचे तपासात समजलं. ही आरोपी तरूणीसुद्धा या स्फोटात मारली गेली होती.

दरम्यान, तपासा वेळी आणखी एक गोष्ट समोर आली. ती म्हणजे हा मर्डर प्लॅन कमल हसनच्या एका चित्रपटावरून बनवण्यात आला होता.

तर LTTE चा प्रमुख प्रभाकरन जवळ एक मूवी प्रोजेक्टर होता. त्याला चित्रपट पाहण्याचे वेड होतं, कमल हसनचा ‘ओरु कैधियिन डायरी’ हा त्याचा आवडता चित्रपट होता. या फिल्मची स्टोरी बदला घेण्यावर आधारित होती.

कमल हसनचा हा सिनेमा तामिळनाडूमध्ये प्रचंड गाजला. पुढे त्याच्यावर हिंदीमध्ये आखरी रास्ता नावाचा सिनेमा रिमेक बनवण्यात आला. यात राजीव गांधी यांचे मित्र अमिताभ बच्चन यांनी काम केलं होतं.

असाच आणखी एक चित्रपट होता ‘द डे ऑफ़ जॅकल’. या चित्रपटात एक अंडरग्राउंड अर्धसैनिक ग्रूप फ्रान्सचा राष्ट्रपतीच्या हत्येचा प्लॅन बनवतात. पण जेव्हा त्यांना अपयश येत तेव्हा ते द जॅकल नावाच्या एका कुख्यात हिटमॅनला हे काम सोपवतात.

काही इंटेलिजन्स अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटालावरूनच राजीव गांधींच्या हत्येचा प्लॅन बनवण्यात आला होता.

त्यानंतरच त्यांन LTTE च्या काही सदस्यांना घेऊन या हत्येचा मास्टर प्लॅन तयार बनवला आणि हत्या घडवून आणली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.