आपल्या मरणाचा तमाशा होऊ द्यायचा नाही हे राजकुमार यांना आधीच कळलं होतं.

जानी, हम उन बादशाहोमेंसे हे जिनपर किसी भी दौर का असर नहीं होता…….

राजकुमार यांचं व्यक्तिमत्व जितकं सिनेमाच्या पडद्यावर प्रभावी होत तितकंच ते खऱ्या आयुष्यात स्वाभिमानी आणि रुबाबदार होतं. त्यांचा विनोद करण्याचा आणि  बोलण्याचा अंदाज सगळ्याच सिनेरसिकांना आवडणारा होता. त्यांचा खऱ्या आयुष्यातला SWAG हा त्यांच्या अभिनयातून आपल्याला अजूनही दिसतो.

बरीच वर्ष त्यांनी इंडस्ट्रीत काम केलं, भरपूर चाहते मिळवले, बऱ्याच लोकांना मदत केली. राजकुमार यांचं बोलणं सुद्धा एखादा भारदस्त डायलॉग वाटावा असं होतं अशा या महान अभिनेत्याच्या अंत्ययात्रेला बॉलिवूडमधलं कुणीच का आलं नाही ? त्याबद्दलचा आजचा किस्सा….

दिग्दर्शक मेहुल कुमार यांच्यासोबत राजकुमार यांनी आधी तिरंगा हि ब्लॉकबस्टर फिल्म केली होती.  मेहुल कुमार यांनी दिग्दर्शित मरते दम तक नावाचा चित्रपट करत असताना या चित्रपटात एक सिन होता ज्यात राजकुमार यांचं निधन होतं आणि त्यांची अंत्ययात्रा गाडीतून स्मशानात  घेऊन जात असतात.

या सीनची तयारी करत असताना राजकुमार प्रेत बनून पडलेले असताना तो सिन वास्तवदर्शी वाटावा म्हणून त्यांच्या गळ्यात दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी एक हार घातला. यावर राजकुमार यांनी दिग्दर्शक मेहुल कुमार यांच्यावर एक डायलॉग मारला कि,

जानी अभि पेहनालो जब असली में मरेंगे ना तब ये मौका नहीं मिलेगा…

त्यावेळी मात्र मेहुल कुमार काहीच म्हणाले नाही, चित्रीकरण झाल्यावर मेहुल कुमार यांनी राजकुमारांना याचं कारण विचारलं कि तुम्ही असं का म्हणाले कि जेव्हा मरेन तेव्हा कोणीही नसेल म्हणून ? याचं राजकुमार यांनी सांगितलं कि,

त्यांच्या मृत्यूच्या वेळेस बॉलिवूडचं कोणीही उपस्थित राहिलेलं किंवा मीडिया आलेलं त्यांना आवडणार नाही.

यामागे त्यांचं असं म्हणणं होत कि मी गेल्यानंतर हि लोकं माझाही तमाशा बनवतील, स्मशानाला एक फिल्मचा सेट बनवतील , अंत्ययात्रेला पांढरे कपडे घालून येऊन मीडियाला फोटो व्हिडिओ देतील, मेलेल्या माणसाला श्रद्धांजली देणं बाजूला राहिलं तर हि लोक त्याचाही तमाशा करतील. मृतात्म्याला शांती लाभेल का अशाने ? माझं मरण आणि माझी अंत्ययात्रा हे पूर्णपणे माझा परिवार बघेल , तिथं बॉलिवूडची गरज नाही.

राजकुमार यांचं हे वक्तव्य भविष्यात खरं ठरलं. ज्या आवाजाच्या जोरावर कैक संवाद अजरामर केले त्याच आवाजाला आता धोका निर्माण झाला होता. त्यांना बातमी सांगायला डॉक्टर कचरत होते, पण धीर एकवटून त्यांनी घशाचा कर्करोग असल्याचं निष्पन्न केलं. तेव्हा राजकुमार म्हणाले

मी राजकुमार आहे, किरकोळ आजार माझ्यापासून फटकून राहतात,

पण त्यांना कळलं होतं कि आपली वेळ आली आहे म्हणून. दोन महिने ते पलंगाला खिळून होते, बराच काळ ते कर्करोगाशी झुंज देत राहिले.

शेवटच्या काळात त्यांनी आपला मुलगा ओमराज कुमारला त्यांनी सांगितलं कि जगणं आणि मरणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, माझ्या मरणाची बातमी माझा मित्र चेतन आनंद ( देवानंद यांचे भाऊ ) सोडून इतर कोणालाच सांगू नको, माझे अंत्यसंस्कार झाल्यावरच सगळ्यांना कळव.

पुढे ३ जुलै १९९६ ला त्यांचं निधन झालं.

आपलं सगळं आयुष्य स्क्रीनवर लोकांना आनंद देण्यात घालवणाऱ्या राजकुमार यांनी आपल्या मरणाचा तमाशा होऊ दिला नाही. यावरून आपल्याला अंदाज येतो कि राजकुमार हे किती विशेष व्यक्तिमत्व होते. आजच्या काळात जे घडतंय त्यावरसुद्धा बोलायला लोकं घाबरतात कारण इमेज खराब होईल पण राजकुमार मात्र समोर कुणीही असो प्रोड्युसर, दिग्दर्शक अशा लोकांना जागेवरच उत्तर द्यायचे.

त्यांचे डायलॉग मात्र भारतभर अजूनही लोक आवडीने ऐकतात, त्यांच्या डायलॉगच्या कचाट्यातून महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार राजेश खन्नाही बचावले नाही ,

जानी, तुम खुंटे कि तरह लंबे हो ! जरा नजदिक आओ हमें अपना कोट टांगना हें…..

जानी, हमारे फेंके टुकडे पर कुत्ते भी बुलडॉग हो जाते हें, इस फिल्म के बाद तुम भी सुपरस्टार बन जाओगे…..

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.