२५ जणांच्या टोळक्याकडून मार खाताना तो म्हणत होता, चेहऱ्यावर नका मारू, मला हिरो व्हायचंय…

आजच्या काळातल्या चाहत्यांच्या मोजक्या आवडत्या हिरोंपैकी असलेला एक म्हणजे राजकुमार राव. बॉलिवूडमधला एक आघाडीचा नायक म्हणून राजकुमार राव ओळखला जातो, याच राजकुमारच्या बाबतीत एक घडलेला किस्सा त्याने एका मुलाखतीत सांगितला होता ज्यात त्याकाळापासूनच तो सिनेमामध्ये काम करण्यास किती उत्सुक होता ते दिसून येतं. शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है सारखी हि स्टोरी आहे.

कॉलेजात असताना राजकुमार रावने एका मुलीला बास्केटबॉल खेळताना पाहिलं. राजकुमार राव हा आधीपासूनच शाहरुख खानचा फॅन होता. त्यावेळी त्या मुलीला त्याने पाहिलं होतं तिच्या आईला राजकुमारने अगोदर शोधलं आणि चांगली ओळखपाळख झाल्यावर त्या मुलीला डेट करायला सुरवात केली. पण त्या पोरीला अगोदरच बॉयफ्रेंड होता.

आता त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला राजकुमार रावच्या प्रकरणाबद्दल कळलं आणि तो त्या कॉलेजात बादशहा सारखा होता. त्याने २५ त्याच्यासारख्याच बलदंड तरुणांना राजकुमार रावला झोडपायला आणलं. पण तेव्हा राजकुमार राव हा एकदम संत टाईप वागत होता. त्या टोळक्याने राजकुमार रावला चोपायला सुरुवात केली. त्यातल्या एकाने तर बंदूक काढली आणि राजकुमार रावला तो दम देऊ लागला. त्यातल्या एकाने तर शूट कर म्हणून ऑर्डरही दिली होती.

तेव्हा राजकुमार राव मारचं खात होता आणि तो त्या टोळक्याला सांगत होता कि मारताय तर हरकत नाही पण चेहऱ्यावर नका मारू मला हिरो व्हायचंय.

राजकुमार रावचा एक पंजाबी मित्र तिथं या भांडणात पडून त्याची बाजू घेत होता. तो म्हणत होता त्याला मारू नका त्याची काही चुकी नाही, त्याऐवजी मला मारा. राजकुमार रावचं ओरडणं सुरूच होतं कि मला हिरो व्हायचंय.

कॉलेज काळापासूनच राजकुमार राव हिरो बनायच्या तयारीत होता. बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर बराच स्ट्रगल त्याच्या वाट्याला आला. छोटेमोठे रोल करत तो बॉलिवूडमध्ये स्थिरावू पाहत होता. २०१० साली राजकुमार रावला पहिला बॉलिवूड सिनेमा मिळाला तो म्हणजे लव्ह सेक्स और धोका. सिनेमा मिळूनही राजकुमार रावचं करियर रुळावर आलं नाही. पण सातत्य ठेवल्याने राजकुमार राव हळूहळू सपोर्टिव्ह रोलमध्येही दिसू लागला.

शेकडो ऑडिशनदिलेला राजकुमार राव नोटीस झाला गँग्ज ऑफ वासेपूरमध्ये पण त्याची खरी ओळख वाढली ती काय पो छे या सिनेमातून. आज घडीला राजकुमार राव काय दर्जाचा अभिनेता आहे हे सांगायला नकोच. अगदी कॉलेजच्या राड्यात मार खाताना तो म्हणाला होता कि मला हिरो बनायचंय आणि तो त्यानुसार प्रयत्न करत राहिला. आज आघाडीच्या नायकांमध्ये राजकुमार रावचं नाव घेतलं जातं. 

दिल्लीतून आपलं शिक्षण पूर्ण करून राजकुमार राव पुण्यात आला, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातून त्याने आपलं शिक्षण घेतलं आणि मुंबईत जाऊन, संघर्ष करून आज त्याने आपल्या नावाचा ब्रँड केला आहे. अनेक प्रोड्युसर, दिग्दर्शकांची रांग राजकुमार राव आपल्या सिनेमात असावी म्हणून लागते. शाहरुख खानच्या प्रचंड प्रेमात असलेला राजकुमार राव ऍक्टर बनायचं आहे म्हणला होता तेव्हा शाहरूखचा अगर किसी चीज को…..हा डायलॉग त्याने सत्यात उतरवल्याची प्रचीति येते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.