रजनीच्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो कधी अनुभवला आहे काय? तेही मुंबईत !

रजनीकांत हा खऱ्या अर्थाने सुपरहिरो आहे असं म्हणता येईल. त्याच्याबद्दल लोकांच्या मनात असणारं वेड, प्रेम आणि आदर हे काही वेगळ्याच पातळीवरचं आहे. म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी रजनीकांतची ओळख एक लीजंड म्हणूनच असणार आहे.

एक अशी असामी होऊन गेली ज्या असामीने लोकांच्या मनावर खऱ्या अर्थाने अधिराज्य केलं. एखाद्या व्यक्तीचा अगदी सामान्य माणसापासून यशस्वी आणि लोकप्रिय होण्याचा प्रवास काय असतो हे रजनीकांतकडे बघून कळत.

तर असा हा रजनीकांत आणि जेव्हा त्याची फिल्म येते.

तो दिवस आणि त्याचा आदला दिवस म्हणजे उत्सव. अक्षरशः शब्दशः उत्सव.

मी रजनीकांतचा चाहता आहे. आणि याचं कारण मी गेली पंधरा सोळा वर्ष पब्लिसिटी डिजाईनर म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि त्याच्याही आधी राम गोपाल वर्माकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचो. तिचे साउथ फिल्ममेकर्सची वर्दळ असायची बऱ्याचदा, त्यामुळे तिकडच्या इंडस्ट्रीमधले मित्रसुद्धा बनले आणि लार्जर than लाईफ साउथ इंडिअन चित्रपटांशी खूप जवळून ओळख झाली आणि नंतर चटकच लागली.

मुंबईमध्ये खूप जनता साउथ इंडिअन आहे ह्याची अगदी तीव्रतेने जाणीव झाली जेव्हा मी पंधरा वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यातला पहिला रजनीकांतचा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेलो.

ओहोहो आदल्या रात्रीपासून लोकं थिएटरच्या बाहेर मुक्कामाला आली होती. मग रजनीकांतसाठी असलेलं वेड म्हणजे काय असतं आणि लोक रजनीकांतची पूजा करतात म्हणजे काय करतात याची ओळख झाली.

मी आजच दरबार पाहायला गेलो पहाटे पहाटे आणि त्या उत्सवाचा आनंद घेतला.

तर काय असतो हा रजनीकांतच्या मुव्हीचा फर्स्ट डे फर्स्ट शो चा उत्सव.

त्याचे चाहते थेटरच्या बाहेर आदल्या रात्री मुक्कामाला येतात. मोठ्ठे पूजा पाठ यज्ञ घालतात. एकत्र मिळून जेवतात आणि गाणी म्हणतात, वाद्य वाजवतात आणि नाचून आनंद घेतात. मी अगदी खरं सांगतोय कि रजनीकांतच्या चाहत्यांची कम्युनिटी आहे आणि ते सगळे ठरवून एकत्र येतात आणि अलमोस्ट अख्खं थेटर बुक करतात.

मी आज दरबारला गेलो तेव्हा पोंगलचं वातावरण होतं. पूजा अर्चा झाल्या होत्या लोकं वाद्य वाजवत गाणी म्हणत नाचत होते.

थेटरमध्ये एन्ट्री होते, शो सुरु व्हायच्या आधी स्क्रीन समोर जमून सगळे परत एकदा नाचतात. सुरुवातीच्या टायटल्स मध्ये रजनीकांत हे नाव दिसल्यावर अख्खं थेटर जल्लोषाने दुमदुमून जातं.

सिनेमा सुरु होतो, आणि रजनीकांतच्या एन्ट्रीची सगळे आतुरतेने वाट बघत असतात आणि जसा रजनीकांत एन्ट्री घेतो तसं लगेचच ती फ्रेम फ्रीझ करून ठेवली जाते आणि सुरु होतो डान्स.

https://www.instagram.com/p/B7GnVN6pYZz/?igshid=10e3nk0h26vsi&fbclid=IwAR0sZShjGJfXV-OU77K0pRl0P2ElH3ySD-yOv2KUhnm5qfI0rPEdd01yNUE

सिनेमा तिथेच थांबलेला असतो आणि बराचवेळासाठी सगळ पब्लिकसोबत आणलेलं वाद्य वाजवत अत्युच्च आनंदाने रजनीकांतच्या नावाचा जल्लोष करत नाचत राहतात.

काही वेळानं सगळ शांत होतं, सिनेमा परत सुरु होतो आणि मग सगळे शांतपणे अगदी तल्लीन होऊन सिनेमा बघत राहतात. मात्र सिनेमाच्या गाण्यांसाठी एक वेगळा स्पेशल इफेक्ट असतो. स्क्रीनच्या भोवतीने दिवाळी सारखी लायटिंग केलेली असते आणि छतावरून देखील लाईटच्या माळा सोडलेल्या असतात, आणि सिनेमातल्या प्रत्येक गाण्याच्या वेळी हा लखलखाट एक वेगळाच अनुभव देतो.

रजनीकांत ही खऱ्या अर्थाने साउथ इंडिअन सिनेमाला लाभलेली देणगी आहे. आणि त्याचा अनुभव तुम्हाला ह्या अश्या लोकांनी दाखवेल्या प्रेमातून दिसत राहतो.

तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा असेल तर रजनीकांतच्या पुढच्या फिल्मच्या फर्स्ट डे फर्स्ट शो च्या वेळी मुंबईमध्ये कोणत्याही थेटरला भेट द्या आणि हा उत्सव प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा.

  • सचिन सुरेश गुरव

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.