राजस्थान मंत्रिमंडळातले बदल युपी इलेक्शन डोळ्यांसमोर ठेऊन करण्यात आलेत

केंद्र सरकारचा सत्तेचा मार्ग उत्तरप्रदेशमधून जातोचं. पण त्याचबरोबर देशातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेश मध्ये आपली सत्ता असावी यासाठी सर्व प्रयत्न करत असतात. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यात ठेऊन अनेक राज्यात मोठे बदल आपल्याला बघायला मिळतील. त्याचा एक भाग म्हणून राजस्थानच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले असल्याची जोरदार चर्चा आहे.

नुकतचे पंजाब मध्ये सुद्धा अशाच प्रकारे बदलण्यात आले असून पहिल्यांदाच एका दलित समुदायातील व्यक्तीची मुख्यमंत्री पदी निवड केली आहे. चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. चन्नी हे आताच्या घडीला देशात दलित समुदायचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

राजस्थान मधील कॉंग्रेसच्या अशोक गहलोत यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा फेरबदल रविवारी झाला. त्यात ११ नवीन कॅबिनेट आणि ४ राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्य म्हणजे या मंत्रिमंडळ फेरबदला दरम्यान जातीय समीकरण जुळवून आणण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला.

महत्वाचे म्हणजे राजस्थान मध्ये पहिल्यांदाचं ४ दलित आमदारांना कॅबिनेट मध्ये स्थान देण्यात आले आहे. यात ममता भूपेश, भजनलाल जाटव, टिकाराम जुली आणि गोविंदराम मेघवाल यांचा समवेश केला गेला आहे. तर कॅबिनेट मधील ३ मंत्री हे आदिवासी समुदायातून आले आहेत.

असे सांगण्यात येते की, कॅबिनेट मधील ११ जणांपैकी ५ आमदार हे सचिन पायलट गटातून येतात. यातील ३ जनांना कॅबिनेट तर २ जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

पहिल्यांदाच राजस्थान मध्ये दलित समुदायातील ४ आमदारांना कॅबिनेट मंत्र्यान मध्ये स्थान मिळाल आहे.

ममता भूपेश बैरवा

ममता बैरवा या दलित समुदायातील असून मागच्या वेळी त्या राज्य मंत्री होत्या. त्यांच्याकडे महिला व बालविकास मंत्रालय होत. आता त्यांना बढती दिली असून रविवारी त्यांनी कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले आहे. त्या दौसा जिलह्यातील सिकराय या विधानसभा मतदारसंघातून निवडणून येतात. त्यांना बढती देऊन सिकराय जिल्ह्यातील जातीय समीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

भजनलाल जाटव

भजनालाल हे दुसऱ्यांदा वैर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. भजनालाल सुद्धा मागच्यावेळी राज्यमंत्री होते. हे गृहराज्य मंत्री होते. त्यांना बढती देण्यात आली असून त्यांच्याकडे कुठल्या विभागाचा कारभार देतात हे लवकरच समजेल. भरतपूर भागातील वैर मतदारसंघातून निवडून येतात येथील जाटव समुदायातील मते आकर्षित करण्यासाठी त्यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आल्याची चर्चा आहे.

टिकाराम जुली

अलवर ग्रामीण मधून टिकाराम जुली निवडून आले आहेत. ते दलित समुदायातून येतात. ते कामगार आणि रोजगार राज्यमंत्री होते. २००४ मध्ये ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. २००८ मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत आले होते.

गोविंदराम मेघवाल

गोविंदराम मेघवाल हे प्रसिद्ध बिकानेर मधील खाजूवाल येथून निवडून आले आहेत. आता पर्यंत ते दोन वेळा निवडून आले आहेत. गोविंदराम मेघवाल हे अगोदर भाजप मध्ये होते. वसुंधरा राजे सरकार मध्ये संसदीय सचिव म्हणून काम पहिले आहे. त्यांनी यापूर्वी राजस्थान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम सुद्धा केले आहे.

याच बरोबर हेमाराम चौधरी, महेंद्र जीत सिंह मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, शकुंतला रावत, रमेश मीना यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर जाहिदा, बृजेन्द्र सिंह ओला, राजेंद्र गुढा, मुरारीलाल मीना यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.    

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.