गोध्रा कांडाची चौकशी करणारे राकेश अस्थाना आता दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेत

आयपीएस राकेश अस्थाना यांची निवृत्ती केवळ ३ दिवसांवर आली होती. त्यांना आता दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून  नियुक्त करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद परिसरात ट्रॅक्टर नेले होते. हे ट्रॅक्टर लपून संसद परिसरात आणण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

आता गुजरात केडरच्या राकेश अस्थाना यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्रालय अंतर्गत काम करते.

निवृत्ती ३ दिवसावर आली असतांना त्यांना कसे काय दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आले. यापूर्वी त्यांनी कुठल्या प्रकरणाचा तपास केला आहे? कुठल्या वादात ते सापडले होते. 

कोण आहेत राकेश अस्थाना

राकेश अस्थाना हे मुळचे झारखंड येथील असून त्याचा जन्म ९ जुलै १९६१ रोजी रांची येथे झाला. १९८४ बॅचते आयपीएस अधिकारी आहेत. दिल्ली येथे पोलीस आयुक्त होण्यापूर्वी राकेश अस्थाना हे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) डीजी और एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) के प्रमुख होते.

राकेश अस्थाना यांनी आता पर्यंत अनेक मोठ्या गुन्ह्याचा तपास केला. त्यात लालू प्रसाद यादव, आसाराम बापू, अहमदाबाद बॉम्बस्फोटचा या प्रकरणाचा तपास केला.

राकेश अस्थाना देशात चर्चेत राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. 

कुठले प्रकरणामुळे अस्थाना प्रकाश झोतात आले

  • बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांच्या कार्यकाळातील चारा घोटाळा प्रचंड गाजला होता. राकेश अस्थाना यांनीच चारा घोटाळ्याप्रकरणात पहिल्यांदा लालूंची ६ तास तपासणी केली होती. त्यांनी दाखल केलेल्या चार्जशिट नंतरच लालू प्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती.
  • २००२ मध्ये देशभर गाजलेले गोधरा कांडाच तपास सुद्धा राकेश अस्थाना यांनी केला होता. २००२ मध्ये साबरमती एक्स्प्रेस मध्ये आग लावण्यात आली होती. त्यात आयोध्ये वरून परत येणाऱ्या ७२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास राकेश अस्थाना यांच्याकडे देण्यात आला होता.
  • तसेच २००८ मध्ये गुजरात मधील अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाची तपास अस्थाना यांच्या टीमने केला होता. दोन्ही घटनावेळी नरेंद्र मोदी हे गुजराचे मुख्यमंत्री होते.
  • आसाराम बापू आणि नारायण साई यांच्यावर २०१४ मध्ये बलात्काराचे आरोप झाला होता. त्यानंतर नारायण साई हा अनेक दिवस फरार होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राकेश अस्थाना यांच्याकडे देण्यात आला होता. फरार नारायण साईला अस्थाना यांनी अटक केली होती.

कुठल्या प्रकरणामुळे वादात सापडले होते

बीएसएफच्या महानिदेशक बरोबर एनसीबीचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. त्यांच्या देखरेखीखाली अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्ये प्रकणात ड्रग्सचा तपास केला होता. आणि रिया चक्रवर्तींवर एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या  तपासाने बॉलीवूड मध्ये बरीच गडबड झाली होती.

अनेक मोठ्या अभिनेत्याला चौकशीला बोलाविण्यात आले होते. त्यामुळे राकेश अस्थाना चर्चेत आले होते.

बीएसएफचे महानिदेशक बनण्यापूर्वी राकेश अस्थाना सीबीआईचे  स्पेशल डायरेक्टर म्हणून पण राहिले आहेत. यावेळी सीबीआयचे तत्कालीन डायरेक्टर आलोक वर्मा यांनी राकेश अस्थाना यांनी लाच घेतली असल्याचा आरोप केला होता. एवढा मोठ्या संस्थेतील दोन अधिकारी वाद घालत असल्याचे पाहून केंद्र सरकारने या अधिकाऱ्यांची बदली वेगळ्या विभागात केली होती. त्यानंतर अलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

तर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. २०२० मध्ये न्यायालयाने राकेश अस्थाना यांना क्लीन चीट दिली होती. त्यानंतर त्यांना राकेश अस्थाना यांना बीएसएफचे महानिदेशक बनविण्यात आले होते.

राकेश अस्थाना ३१ जुलैला निवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच केंद्र सरकारने त्यांना एक वर्षासाठी कार्यकाळ वाढविला असून त्यांना दिल्ली पोलिस आयुक्त केले आहे. देशाची राजधानी असल्याने दिल्ली पोलीस आयुक्तवर मोठी जबाबदारी असते. अस्थाना यांची नियुक्ती स्पेशल केस म्हणून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाचे म्हणजे दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून बालाजी श्रीवास्तव यांनी एक  महिन्यापूर्वीच पदभार स्वीकारला होता. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.