राकेश झुनझुनवाला म्हणतायत एक ना एक दिवस क्रिप्टो करन्सीचा बाजार उठणार आहे

काही दिवसांपूर्वी, भारताच्या क्रिप्टो उद्योगाच्या भविष्याला मोठा धक्का बसला. केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ च्या भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी डिजिटल मालमत्ता (क्रिप्टो) वर कर लावण्याच्या घोषणा केल्या. डिजिटल मालमत्तेच्या (क्रिप्टो) हस्तांतरणातून मिळणा-या कोणत्याही उत्पन्नावर ३०% कर आकारल्या जाण्याबरोबरच व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणावर १% टीडीएसही लावला जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

 त्याचबरोबर तुमचं नुकसान झाली तरी तुम्हाला तुमच्या फायद्यावरील करातून कोणती सूट मिळणार नाहीये. 

एवढाच नाही तुम्ही जर कुणाला गिफ्ट देउन क्रिप्टो पासून सुटका करून घेण्याचा विचार करत असेल तर जो गिफ्ट घेणार आहे त्याला टॅक्स भरावा लागणारंय. त्यामुळं या सगळ्या निर्णयांनी  क्रिप्टो गुंतवणूकदारांचं कंबरडंच मोडलं.

मात्र त्याच बरोबर गव्हर्नमेंट किमान क्रिप्टोला मान्यता तरी देतंय या आशेवर आता गुंतवणूकदार तग धरून आहेत.

गव्हर्नमेंटनं स्वतःचीच डिजिटल करन्सी काढत असल्यानं क्रिप्टोला भविष्य आहे सा आशावादही गुंतवणूकदार धरून आहेत.

आता परवाच्या बजेटमधील या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया आल्या आणि त्यातलीच एक प्रतिक्रिया होती  शेयर बाजरचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांची.

२०२२ च्या अर्थसंकल्पानंतर CNBCTV18 ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, झुनझुनवाला यांनी सांगितले की डिजिटल चलनावरील तरतुदींच्या संदर्भात भारत चीनच्या पावलावर पाऊल टाकत आहे असं त्यांना वाटतं.

ते म्हणाले, “मला वाटते की सरकारला काय करायचं आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून (आरबीआय) डिजिटल चलनाला प्रोत्साहन द्यायचे आहे दुसऱ्या बाजूला इतर सर्व चलनांचा वापर हळू हळू बॅन करायचा आहे .जसं चीन करत आहे. हे एक प्रकारे योग्य देखील आहे.”

राकेशभाऊ एवढ्यावरच थांबलेले नाहीयेत. 

ET NOW ला दिलेल्या मुलाखतीत झुनझुनवाला पुढे म्हणाले की, क्रिप्टो मार्केट एक दिवस कोसळेल असं त्यांना वाटतं. पण त्याचा इक्विटी मार्केटवर फारसा परिणाम होणार नाही, कारण इक्विटी आणि क्रिप्टोकरन्सीचा गुंतवणूकदार वर्ग एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा आहे.

चीन हा पहिला देश होता ज्यांच्या लोकांनी पटकन क्रिप्टोकरन्सी स्वीकारली होती. 

चीनचे पहिले क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, बीटीसी चायना, २०११ मध्येच उघडले होते. २०१३ पासून सेवांसाठी देयक म्हणून क्रिप्टोकरन्सी स्वीकारायला पण चीनमध्ये सुरवात झाली होती.
त्यांनतर मात् चीनने क्रिप्टोकरन्सी वर सतत बंदी घालायला सुरवात केली. त्याच बरोबर चीननं त्यांच्या रिझर्व बँक असणाऱ्या पीपल्स बँक ऑफ चायनाला डिजिटल करन्सी काढण्यास सांगितलं होतं. आता चीन लोकांना हेच डिजिटल चलन वापरण्यास प्रोत्साहित करीत आहे.

त्यामुळं आता राकेश झुनझुनवाला म्हणतायेत तसं इंडिया पण चीन सारखेच पॉलिसी काढेल की शेअर बाजरातला किंग असणारे झुनझुनवाला यांचे अंदाज क्रिप्टो मार्केटमध्ये सपशेल गंडतात हे येणाऱ्या दिवसातच कळेल.

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.