यूपीत हिंदू नेत्याची हत्या होईल असं राकेश टिकैत म्हणतायत, खरंच का ?
मागच्या दोन दिवसांपूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी हरयाणातल्या सिरसामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होत. ते म्हंटले होते,
उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी हे लोक एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या घडवून आणतील. त्यानंतर हिंदू – मुस्लीम भेदभावाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील.
उत्तरप्रदेशच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं हे विधान खूप काही सांगून जात. आता नेत्याची हत्या होईल असं तर ते म्हंटले पण नेता कोणता हे समजण खूप अवघड आहे. म्हणून मग आम्ही उत्तरप्रदेशच्या मोस्ट पॉवरफुल हिंदू नेत्यांची यादीच काढली.
यात पहिले आहेत, विजय कुमार किंवा विजय मिश्रा
हे दोन्ही एकच आहेत. भदोही हा उत्तर प्रदेशातील एक जिल्हा आहे. येथील धनापूर हे गाव बनारसपासून फक्त ५० किमी अंतरावर आहे. विजय मिश्रा यांचा जन्म या धनापूर गावात झाला. ट्रकचालक असणारे विजय मिश्रा यांनी त्यांची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. ९० च्या दशकात त्यांची राजीव गांधींसोबत जवळीक वाढली होती मात्र राजीव गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलायम सिंह यादव यांचा हात धरला.
२००१ मध्ये ते पहिल्यांदा सपाच्या तिकिटावर आमदार झाले. पण त्यांनी स्वतः निवडून येतानाच ज्ञानपुर हंडिया, भदोही, मिर्जापुर इथल्या सपाच्या उमेदवारांना पण जिंकवून आणलं. या मोठ्या नेत्याने २०१० मध्ये बसपा सरकार मध्ये मंत्री असणारे नंदकुमार नंदी यांच्यावर हल्ला केला होता असं म्हंटल जात. हेच नंदी आता आताच्या योगी सरकारमध्ये मंत्री आहेत. विजय मिश्रा यांच्यावर १६ खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
दोन नंबरवर आहेत इंद्र प्रताप तिवारी
इंद्र प्रताप तिवारी उर्फ खब्बू तिवारी. सध्या ते अयोध्या येथून गोसाईगंज मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत. भाजपचे आमदार होण्यापूर्वी ते सपा मध्ये होते. खब्बू तिवारी यांचं उत्तरप्रदेशच्या अयोध्येत उपद्रवमूल्य जास्त आहे. त्यांच्यावर आजपर्यंत हत्या, हत्येचा प्रयत्न, किडनॅपिंग आणि एक्स्टॉर्शन सारखे बरेच गुन्हे दाखल आहेत.
त्यानंतर सुरेश्वर सिंह
हे भाजपचेच यूपीच्या बहराइच जिल्ह्याच्या महसी मतदारसंघातून आमदार आहेत. ते या भागातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. या भाजपच्या आमदारावर २४ वर्षांपासून ट्रिपल मर्डरची केस चालू आहे. हे झाले बडे हिंदू नेते जे आत्ता हिटलिस्टवर असू शकतात. पण त्यांच्याव्यतिरिक्त ही बडे नेते आहेत पण मग ते हिंदूच आहेत असं नाही.
त्यांच्यामध्ये आजम खान, जया प्रदा, अब्दुल्ला आजम, विक्रम सैनी, सुरेंद्र नागर, विनीत अग्रवाल शारदा, चंद्रशेखर, इमरान मसूद, मुनकाद अली, नावेद मियां अशी मुस्लिम वैगरे पण नावं आहेत. त्यामुळे नंबर कोणाचा लागणार याचा काही अंदाज येत नाही.
पण राकेश टिकैतांच्या वक्तव्यानुसार आगामी निवडणुकीत,
हिंदू – मुस्लिमांना भिडवण्याचा प्रयत्न होणार हे मात्र नक्की. त्यावर टिकैत स्वतःच म्हणाले होते,
शेतकरी आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी सरकारकडून हरएक तऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले. या आंदोलना दरम्यान हिंदू – शीख असो किंवा हिंदू – मुस्लीम असो यांना एकमेकांत भिडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता जेव्हाही उत्तर प्रदेशात निवडणुका होतील, आरएसएसचे लोक एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या घडवून आणण्याचं काम करतील. निवडणुकीत हिंदू – मुस्लीम करत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात हिंदू नेत्याची हत्या घडवून आणून यांना निवडणुका जिंकायच्या आहेत,
असो…पण उत्तरप्रदेश मध्ये अजून एका खूप मोठ्या हिंदू नेत्याचं नाव आहे, ते म्हणजे सगळ्यांचेच बाहुबली योगी आदित्यनाथ. पण त्यांना उडवण्याचा कोणाचा घास ही नाही, हे ही तितकंच खर आहे.
हे हि वाच भिडू
- युपीसारख्या मागास राज्यातसुद्धा आता ब्राम्होस मिसाईल बनणार आहे
- तालिबानच्या मुद्द्यावर आता युपीत राजकारण पेटलय !
- शेतकरी आंदोलन आता युपीकडे सरकतंय, राकेश टिकैतांनी योगींना चॅलेंज दिलंय..