राम जेठमलानी यांच्यामुळे युती तुटली आणि भाजप शरद पवारांसोबत गेला..
१९८४ सालच्या लोकसभा निवडणूका. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणूकांमध्ये सहानभुतीची लाट होती. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणाऱ्या निवडणूकांसाठी कॉंग्रेस सज्ज होती. या निवडणूकीत राजीव गांधींना न भुतो न भविष्यती अस पाठबळ मिळालं. लोकसभेच्या निवडणूकांमध्ये राजीव गांधीच्या नेतृत्वात कॉंग्रेसला ४१४ जागांवर विजय मिळाला.
आजवरचा हा रेकॉर्ड होता..
या निवडणूकीत नुकताच जन्म घेतलेल्या भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. १९८४ च्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. पण या युतीचा फरक महाराष्ट्रात पडला नाही. भाजप सेनेचा एकही उमदेवार विजयी होवू शकला नाही.
नेमकं हे का घडलं? फक्त सहानभुतीच होती की अन्य काही कारणं होती. याचाच विचार करण्यासाठी लोकसभेच्या निवडणूकीनंतर विश्लेषण करण्यासाठी भाजपने आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, पराभूत उमेदवारांची बैठक बोलवली
या बैठकीत होते जेष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी
राम जेठमलानी तेव्हा भाजपकडून निवडणूकीसाठी उभा होते. पराभवाचं विश्लेषण करत असताना ते म्हणाले महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या बदनाम पक्षासोबत जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याने पराभव झाला. त्यानंतर पराभवांच्या केंद्रस्थानी शिवसेना आली व शिवसेनेमुळेच भाजपला पराभव पहावा लागला, हा बदनाम झालेला पक्ष आहे अशा चर्चा अजेंड्यावर राहिल्या..
दूसरीकडे भाजप जनता दलासोबत जाण्यास उत्सुक होती. तर तिसरीकडे शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पुरोगामी लोकशाही दलामार्फत कॉंग्रेसविरोधात १९८५ च्या विधानसभा निवडणूकांसाठी आघाडी करत होते. शरद पवारांच्या आघाडीत जनता पक्ष तर होताच सोबत अन्य डावे पक्ष देखील होते. भाजप सेनेसोबतची युती सोडून जनता पक्षात जाण्यास उत्सुक होती पण जनता पक्ष व इथे असणारे अन्य डावे पक्ष यांचा शिवसेनेला विरोध होता कारण शिवसेनेचं कम्युनिष्ट विरोधी प्रचारतंत्र.
मात्र महाजन आणि पवारांना बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जायचं होतं.
उमेदवार उभा न करता पाठींबा व त्याबदल्यात विधानपरिषदेवर संधी असा फॉर्म्युला महाजन पवारांचा होता. याला जनता दलासहीत डाव्यांचा शिवसेनेला असणाऱ्या विरोधाच कारण होतच सोबतच शिवसेना बदनाम असल्याचं राम जेठमलानी यांनी मांडलेला मुद्दा देखील कारणीभूत होता.
पण बाळासाहेबांनी त्या पूर्वीच शिवसेनेचे १८ उमेदवार घोषीत करून टाकले. युती तुटली. भाजप जनता दलासोबत गेला आणि याच वेळच्या प्रचारात बाळासाहेब म्हणाले, कमळाबाई आम्हाला सोडून गेली..
महाजन यांनी भाजपला पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलाचा भाग बनवलं आणि या निवडणूका लढल्या. भाजपला या निवडणूकीत १६ जागा जिंकता आल्या मात्र कॉंग्रेसने १६१ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता राखली.
हे ही वाच भिडू
- फक्त राम जेठमलानी यांच्याशी गप्पा मारल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची गेली ?
- सेनेमुळे शरद पवारांना महाराष्ट्रात होणारा ह्युंडाई प्रकल्प तामिळनाडूला सोडावा लागला…
- बाळासाहेबांनी कदमांसाठी काय केलं, गडकरींना विनंती करून मतदारसंघ घेतला