तरंगणाऱ्या दगडांवर उभं असलेलं हे मंदिर वर्ल्ड हेरिटेज यादीत जाऊन पोहचलंय

भारताची शिल्पकला जगप्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटन प्रेमी भारताची हीच कला पाहण्यासाठी हजारो मैलांचा पल्ला गाठतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा देशाच्या मंदिरांवरच शिल्पकाम, कोरलेल्या लेण्यांची दखल घेतली जाते. नुकताच UNESCO कडून तेलंगणातल्या वारंगलमध्ये असणाऱ्या काकतीय रुद्रेश्वर म्हणजेच रामप्पा मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीत सामील करण्यात आलंय. जी अर्थातच भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

१२ व्या शतकात बांधलं गेलेले हे मंदिर काही विशिष्ट कारणांमुळं सगळ्या जगात प्रसिद्धआहे.

पहिलं कारण म्हणजे हे एकमेव असे मंदिर आहे, ज्याचं नाव त्या मंदिराच्या शिल्पकराच्या नावावर आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराची निर्मिती पाण्यात तरंगणाऱ्या दगडांनी केली गेलीये. असे दगड जे आज कुठेही सापडत नाहीत.

अशा परिस्थितीत हे एक रहस्यचं म्हणायला हवं की,  हे मंदिर बांधण्यासाठी दगड आले तरी कुठून?

तेलंगणाच्या तत्कालीन काकतीय वंशाचे महाराजा गणपती देवाने सन 12- 13 च्या दरम्यान एक भव्य आणि विशाल अशा शिव मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेतला. गणपती महाराजांना इच्छा होती की, या मंदिराची निर्मिती अशा प्रकारे केली जावी की, येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत याचे गुणगाण गायले जावे.

मंदिराच्या निर्मितीचे काम त्यांनी आपले शिल्पकार रामप्पाला दिलं. रामप्पांनेही आपल्या महाराजाच्या आदेशाचे जसच्या तसं पालन केलं आणि एका भव्य आणि सुंदर अशा मंदिराची निर्मिती केली.

मंदिराची निर्मिती पाहून महाराजा गणपती इतके खूष झाले की, त्यांनी मंदिराचे नामकरण रामप्पाच्या नावाने केलं. त्यामुळेच भगवान शिवाला समर्पित हे मंदिर रामप्पा या नावाने ओळखले जाते.

वेंकटपूर मंडलच्या मुलुक तालुक्यात असणाऱ्या रामप्पा मंदिराला तेराव्या शतकात भारतात आलेले इटलीचे प्रसिद्ध शोधकर्ता मार्को पोलोने ‘मंदिराच्या आकाशगंगेतील सगळ्यात जास्त चमकणारा तारा’ असं म्हटलं होतं. 40 वर्षात बनवून तयार झालेलं हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, ज्याला रामलिंगेश्वर असेही म्हटले जाते.

मंदिराचा मुख्य मंदिर परिसर सहा फूट उंच अशा प्लॅटफॉर्मवर बनवला गेला आहे. शिखर आणि प्रदक्षिणा पथ मंदिराच्या संरचनेचा प्रमुख अवयव आहे. मंदिरात प्रवेश करताच नदी मंडपम आहे, जिथे नदीची एक विशाल प्रतिमा आहे.

आपण नेहमी पाहतो की, भारताच्या प्राचीन मंदिराची नाव त्यांना बनवणारे राजे किंवा मंदिरात असणाऱ्या देवतांच्या पौराणिक नावाने असतात. पण तेलंगणा पर्यटन विभागाच्या नुसार रामप्पा मंदिर देशातील एकमेव मंदिर आहे. ज्याचे नामकरण ते बनवणाऱ्या मुख्य शिल्पकारांच्या नावे आहे.

याशिवाय मंदिर आणखीन एका खास कारणासाठी प्रसिद्ध आहे, जे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. मंदिर गेल्या आठशे वर्षांपासून कोणत्याही नुकसानात शिवाय उभे आहे. अशा परिस्थितीत निश्चितच प्रश्न निर्माण होतो की, या मंदिराच्या निर्मितीनंतर अनेक मंदिर बांधली गेली, जी दगडामूळं कोसळली सुद्धा. पण हे मंदिर अजूनही जसं च्या तसं आहे.

याच रहस्याचा उलगडा करण्यासाठी पुरातत्व विभाग मंदिरात पोहोचलं. विभागाकडून या रहस्याचा तपासासाठी मंदिराच्या दगडाचा एक तुकडा घेतला आणि त्याचा तपास केला गेला. या दगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आर्किमिडीजच्या तत्त्वाच्या विरूद्ध ते पाण्यात तरंगते.

हेच कारण होते की, एकीकडे दगडांच्या वजनामुळे उर्वरित मंदिर खराब झाली, परंतु हे मंदिर हलक्या दगडांनी बांधल्या गेल्यामुळे त्याच स्थितीत राहिले.

परंतु हे रहस्य सुटले नव्हते तर ते आणखी खोलवर बनले कारण राम सेतूशिवाय संपूर्ण जगात असे कोणतेही दगड नाही जे पाण्यात तरंगतात. त्यामुळे 800 वर्षांपूर्वी ही पाण्यात तरंगणारी ही दगड इतक्या मोठ्या संख्येत आली तरी कुठून?

त्यात आता युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर मंदिरातील सुविधांचा आणखी विस्तार होण्याची नक्कीच खात्री आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.