आता सौदी अरेबियाच्या पाठयपुस्तकांमध्ये शिकवलं जाणार रामायण, महाभारत..!

रामायण, महाभारत ही असे महाग्रंथ आहेत, जे कर्तव्य पालन, मान- सन्मान आणि शिस्त शिकवते. ज्याचा डंका केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे.  जगातील अनेक देशांमध्ये  रामायण, महाभारताची लोकप्रियता कोणापासूनही लपून राहिलेली नाही.

याच शृंखलेमध्ये कट्टर मुस्लिम समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाने आपल्या अभ्यासक्रमात रामायणाचा समावेश केला आहे. रामायणच नाही तर सौदीच्या पुस्तकात महाभारत देखील शिकवले जाणार असल्याचे समजते. 

प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन 2030 अंतर्गत सौदी अरेबियामधील शिक्षण क्षेत्रासाठी इतर देशांच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभ्यास करणे अनिवार्य केले आहे.  त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवले जाणार आहे. जेणेकरून या अभ्यासात योग आणि आयुर्वेदासारख्या जागतिक स्तरावर महत्वाच्या भारतीय संस्कृतींवर लक्ष केंद्रित केले जाईल. दरम्यान, नवीन व्हिजन 2030 मध्ये इंग्रजी भाषा देखील अनिवार्य करण्यात आली आहे.

नुकताच सौदी अरेबियातील एका ट्विटर युजरने आपल्या मुलाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांचा फोटो देखील सोशल मीडियावरून शेअर केला.

सौदीकडून या निर्णयाबाबत म्हटले गेले की,

‘या माध्यमातून देश सुशिक्षित आणि कुशल कामगार दल तयार करून जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत सामील होईल. त्याचबरोबर, विविध देश आणि लोक यांच्यात सांस्कृतिक संवादांची देवाणघेवाण जागतिक शांतता आणि मानव कल्याणात उपयुक्त आहे. ‘

‘सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब’

दरम्यान, सौदीच्या अभ्यासक्रमात रामायणाचा समावेश करण्यात येणार असल्याच्या बातमीचा संदर्भ देत रामायण मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरी यांनी ही आपल्यासाठी अभिमानाची बाब’ असल्याचे म्हंटले आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले कि, ‘सौदी अरेबियाने रामायणला आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग बनवल्याची बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुनील लाहिरी यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान,  रामायण आणि रामाशी निगडीत कथा अनेक  चित्रपट निर्मात्यांची निवड बनले आहे. अनेक चित्रपट निर्मात्यांनी वेगवेगळ्या प्रकारे स्क्रीनवर या हे महाकाव्याचं सादरीकरण केलं. परंतु रामानंद सागर यांच्या मालिकेला आजपर्यंत कोणीही तोड देऊ शकले नाही. तांत्रिकदृष्ट्या मर्यादित असूनही रामायणातील भावनिक कथा आजही प्रेक्षकांना भावनिक करते.

१९८०  च्या उत्तरार्धात रामानंद सागर यांची  ‘रामायण’ मालिका पहिल्यांदा प्रसारित झाली. या मालिकेत अरुण गोविलने रामाची भूमिका साकारली होती तर दीपिका चिखलियाने सीतेची भूमिका साकारली होती. याबरोबरच  दारासिंग यांनी हनुमान तर अरविंद त्रिवेदी रावणाच्या भूमिकेत होते.

लॉकडाऊनमध्ये  पुन्हा करण्यात आले प्रसारण 

गेल्या वर्षी कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन लागण्यात आले.  यावेळी रामानंद सागर यांची  ‘रामायण’ मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली.  प्रकाश जावडेकर यांनी याबबत माहिती दिली होती. लॉकडाऊनच्या या काळात पुन्हा एकदा  प्रसारित झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला.  ज्याने आजपर्यंतचा टीआरपीचा सर्वोच्च रेकोर्ड ब्रेक केला.

रामायण महाभारत हे दोन्ही हिंदूंचे धार्मिक ग्रंथ आहेत व यांचा इतिहासाशी कोणताही संबंध नाही असे आरोप करत बऱ्याचदा भारतातील काही विचारवंत याचा पाठयपुस्तकात समावेश करण्यास विरोध करतात. काही प्रसंगी इतर धर्मियांच्या भावना दुखावतील यासाठी या ग्रंथाचा समावेश टाळला जातो.

पण मुस्लिम धर्माचे प्रमुख स्थान समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाने त्यांचा पाठयपुस्तकात समावेश करून हे ग्रंथ फक्त हिंदू धार्मिक नसून त्यांत दिलेला संदेश सर्वसमावेशक आहे आणि प्रत्येकाने अभ्यास करावा असाच आहे हे दाखवून दिले आहे. 

फक्त इतकेच नाही तर प्रिन्स सलमान हे येत्या काही दिवसात योग व आयुर्वेद यांचा देखील आपल्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विचारात आहे असं देखील सौदी अरेबियाकडून सांगण्यात आलं.

हे ही वाचा भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.