मुंबईत सत्ता आणण्यासाठी भाजप मनसेला डावलून काँग्रेसची १९९२ मधली रणनीती आजमावणार का ?

भाजप आणि शिवसेना…दोन्ही पक्षांची जुनी मैत्री, जुनी युती…आता हि युती पुन्हा होणार कि नाही? दोन्ही पक्ष पुन्हा कधी एकत्र येणार कि नाही हे आत्ता काय सांगता येणार नाही. जरी दोन्ही पक्षात सद्या मोठा राजकीय संघर्ष दिसत असेल तरी भविष्यात काहीही होऊ शकते.

असो तर सद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा आहे. आणि त्यात आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे मनसे आणि भाजप युती. आधीच सेना आणि भाजप हे दोन्ही भगवे पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे त्याचा फायदा मनसे ला होऊ शकतो असं मत व्यक्त होतंय. 

२०१५ मध्ये देखील अशी स्थिती निर्माण झालेली कि, शिवसेना आणि भाजपमधील युती अधिकृतपणे संपुष्टात आली होती. हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष स्वतंत्रपणे लढल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला झालेला.  काँग्रेस पक्षाने बीएमसीमध्ये स्पष्ट बहुमताने सत्ता मिळवली होती. तशीच काही स्थिती आटा सेने आणि भाजपची आहे. महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेली सेने आता भाजपसोबत नाही. दोन्ही पक्षात फूट पडल्याने, या परिस्थितीचा फायदा मनसे घेणार की काय हे पाहणं गरजेचं आहे. 

तितक्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केलेलं कि, “भाजपला मनसेसोबत जाण्याची काहीही गरज नाही. १९९२ साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत जाऊन मुंबई महापालिकेत सत्ता आणली होती. यावेळी देखील तशीच सत्ता आणू”, असा दावा देखील रामदास आठवले यांनी केला आहे.

यानिमित्ताने हे बघूया कि काय राजकारण झालं होतं १९९२ च्या निवडणुकीत ?

१९८२ च्या गिरणी संपात पहिल्यांदा कामगार मैदानात सभा घेऊन बाळासाहेबांनी आपण काँग्रेसबरोबरची मैत्री तोडत आहोत अशी घोषणा केली. थोडक्यात शिवसेना आणि काँग्रेस यांच्या छुप्या युतीचा काळ संपुष्टात आला. तो पर्यंत जनता सरकारचा प्रयोग फसला होता. जनसंघ त्यातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली. पण इंदिरा गांधींच्या हत्येवेळी आलेल्या लाटेत या दोन्ही पक्षांची वाताहत झाली. पुढच्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकमेकांची साथ सोडली.

शिवसेना-भाजप युती १९८९ मध्ये झाली होती, परंतु हे दोन्ही पक्ष १९९२ मध्ये स्वतंत्रपणे नागरी निवडणुका लढले होते. या निवडणुकीत RPI (A) ने BMC मध्ये २९ जागा कॉंग्रेस मित्र म्हणून जिंकल्या होत्या. चेंबूर काँग्रेसचे आमदार चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे महापौर म्हणून निवडून आले होते. १९९२-९३ दरम्यान ते मुंबईचे महापौर होते. हंडोरे हे १९८५ ते १९९२ पर्यंत बीएमसीचे नगरसेवक आणि १९९२-९३ दरम्यान मुंबईचे महापौर होते.  तसेच ते चेंबूर काँग्रेसचे आमदार राहिलेत. २००४ ते २००९ दरम्यान ते चेंबूरमधून आमदार म्हणून निवडून आले आणि मागील सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते. आठवलेंनी भगव्या आघाडीशी हातमिळवणी केल्यापासून काँग्रेसकडून हंडोरे हे दलित नेत्यांपैकी एक आहेत.

१९९२ च्या या निवडणुकीचा स्पष्ट अर्थ असा आहे की मुंबई शहरात आरपीआयची काही निर्णायक मते आहेत. त्यामुळे RPI च्या मित्रपक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. 

रामदास आठवले यांच्या पक्षाची ताकद तशी विशेष नाहीये पण १९९२ मध्ये आठवले यांनी काँग्रेसबरोबर युती करून निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचे १२ नगरसेवक निवडून आले होते परंतु नंतर ही संख्या ३ पर्यंत खाली आली. आरपीआयची स्वत:चे उमेदवार निवडून आणण्याची ताकत नसली तरी युती केलेल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची ताकत आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत भाजपने आठवले यांना जवळ केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून आरपीआय, भाजप आणि मनसेमध्ये नेमकी जागेची वाटाघाटी कशी होणार ? कुणाला किती जागा मिळणार हे सगळं बघायला लागेल

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.