आठवले नवीन कायदा करणार आहेत, ड्रग्स घेणाऱ्याला आता जेल होणार नाही.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठी मागणी केलीये ती म्हणजे, ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये…त्यांचं असं मत आहे कि, आता कायदा बदलण्याची गरज आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज धुळे दौऱ्यावर आहेत. दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अंमलीपदार्थांसदर्भातील कायदा बदलण्याचा विचार सुरु असल्याबद्दल भाष्य केलंय.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असं मत मांडलंय. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला तुरुंगात आपण टाकत नाही त्याप्रमाणेच ड्रग्स घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे. आता या ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलला पाहिजे आणि याचा विचार देखील केंद्र सरकार करतंय अशी गंभीर वक्तव्य  

ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात असणारा कायदा बदलण्याचा केंद्र सरकार विचार करतंय असा खुलासा देखील या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

रामदास आठवले म्हणाले, “दारू पिणाऱ्यांना तुरुंगात पाठवले जात नाही, पण अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची कायद्यात तरतूद आहे.”

ते म्हणाले, “या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या आरोपींना तुरुंगात न पाठवता सुधारगृहात पाठवले पाहिजे, असे आमच्या मंत्रालयाला वाटते.

“व्यसनमुक्ती केंद्र तुमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी उपयुक्त आहे. गृह मंत्रालय सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करत आहे ज्यामध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते. म्हणून सध्या जो कायदा आहे ज्यात ड्रग्ज घेतलेल्याला तुरुंगात टाकलं जातं त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार आमचं मंत्रालय करत आहे. लवकरच त्यासंबंधीचा कायदा जर झाला तर ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात न पाठवात नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात येईल,” असं आठवले यांनी म्हटलं आहे.

हा कायदा लवकरच मंजूर झाल्यास अमली पदार्थांच्या व्यसनांना तुरुंगात न पाठवता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले जाईल, असे आठवले म्हणाले.

नवाब मलिक यांचाही समाचार त्यांनी घेतला

आर्यन खान चे ड्रग्स प्रकरण जसे सुरु झाले तसं नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे तसेच व्यक्तिगत आरोप करत आहेत. हा मुद्दा देखील रामदास आठवले यांनी मांडला होता. 

समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वादावर भाष्य करताना ते म्हणाले की, समीर वानखेडे हे दलित आहेत असे मला वाटते. नशामुक्त मुंबईची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यात त्यांचा वैयक्तिक फायदा नाही न शत्रुत्व नाही. त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ससंदर्भात आरोप करावेत परंतु समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नये असं म्हटलं आहे. 

तसेच नवाब मलिक हे ज्या सरकारचे सदस्य आहेत ते सरकार ड्रग्सला पाठिंबा देणारं सरकार आहे.

समीर वानखेडे यांनी पुराव्यांच्या आधारे क्रुझवर छापा टाकून १९ जणांना अटक केली. त्यांना २२ दिवस जामीन मिळाला नाही म्हणजे एनसीबीकडे मोठे पुरावे होते, असा याचा सरळ अर्थ आहे. यात केंद्र सरकार किंव्हा एनसिबी चा कसलाही उद्देश नाहीये.  समीर वानखेडेंना टार्गेट करत राज्य सरकार एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप देखील आठवले यांनी केला आहे.

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.