रामसे ब्रदर्सचे हे १० पिक्चर आवर्जून बघायला पाहीजेत, यादी सेव्ह करून ठेवा

तुम्हाला हॉरर पिक्चर आवडतात काय, 

ते कन्ज्युरिंग.. ॲनाबेल, द नन गेला बाजार साऊथमधले 13B वगैरे आवडत असतील, तर हा विषय तुमचा नाय. तुम्ही खरोखर भ्या. आम्हाला काय प्रॉब्लेम नाय. पण तुम्ही अल्ट्रा लिजेंड कॅटेगरितले असाल तर हा विषय तुमच्यासाठीय. 

म्हणजे माणसानं कसं जरा भ्याव…जरा टरटरावं…जरा हसावं…आणि जरा आबंटचिंबट पण बघावं… टिपीकल आपल्या गुंडा सारखं.. 

तो जर तुमचा कल्ट असला तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. यात आम्ही रामसे बंधुंच्या दहा पिक्चरची यादी दिलेय. हे दहा पिक्चर निवांत सवड काढून बघा. रोज एकएक बघा. फक्त बघताना एक काम करा, मित्रांसोबत..मैत्रिणींसोबत बघा..सोबत बियरची बाटली ठेवू वाटली ठेवा.. 

तर सुरु करुया…

1) विराना (1988) 

Screenshot 2022 04 15 at 8.12.31 PM

रामसे बंधुचा हा पिक्चर १९८८ साली आलेला. तुफान चालला. म्युझिक, भूतं सगळं भारीय. ती विरानाची हिरोईन कुठं गायब झाली याचं आर्टिकल पण आम्ही केलय. खाली लिंकमध्ये देतो वाचून घ्या. टिपीकल एक चिकनी पोरगी झपाटते आणि माणसांना डावात घेते आणि मारून टाकते. जरा व्यवस्थित नजरेनं पाहिलं तर खऱ्याच आयुष्याची गोष्टय वो. जॅस्मिन, सतीश शहा, गुलशन ग्रोवर अशी स्टारकास्ट आहे नक्की बघा..  

2) पुराना मंदीर (1984) 

 

Screenshot 2022 04 15 at 8.12.38 PMसामरी नावाचं भूत. हे भुत खऱ्या आयुष्यात आयआयटीचं इंजिनियर होतं. यावर पण आम्ही लेख केलाय. तर दोनशे वर्षांपूर्वी समरीचं डोकं एका राजानं कापून टाकलेलं. या राजाने समरीला एका बॉक्समध्ये कोंडून ठेवलय. हा सामरी परत येतो. पिक्चर आलेला तेव्हा पिक्चरने अडीच कोट छापलेले. त्या काळातले अडीच कोट म्हणजे आत्ताचे व्याख्या वूख्खू वेख्ये..

3) तहखाना  (1986) 

Screenshot 2022 04 15 at 8.12.45 PM

ठाकूर सुरजीत सिंह आपली सगळी संपती आपला मोठ्ठा मुलगा रघुवीरला सोपवून देतो. आणि राक्षसांचा उपासक असलेल्या धुरजनला बाबाजीका ठुल्लू भेटतो. काळ्या जादूने भरलेला हा सिनेमा पण भारीए. 

4) पुरानी हवेली 

Screenshot 2022 04 15 at 8.12.53 PM

बऱ्याचदा ऐकून असाल. १९८९ साली हा पिक्चर आलेला. सुनील आणि अनिता हे कपल. हे त्या काळात ओयो नसल्याने हवेलीत येतात. सोबत दोस्तमंडळी. आत्ता एकेक करुन दोस्त मरणार आणि लोकांची फाटत जाणार. टिपीकल फॉर्म्युला तरिही भारी वाटणारा. 

5) डाक बंगला (1987) 

Screenshot 2022 04 15 at 8.13.00 PM

यात पण बऱ्यापैकी तोच मसाला आहे. एक डाक बंगला अशतोय आणि त्यात एक कपल अडकतय. नाही म्हणायला तसले सीन आहेतच. रात्रभर आवाज येतो मग एक आत्मा येते आणि मारून टाकते अशी या पिक्चरची स्टोरी. 

6) बंद दरवाजा (1990) 

Screenshot 2022 04 15 at 8.13.06 PM

तोच आपला सामरी. पिक्चरची सुरवात काली पहाडीमध्ये असणाऱ्या नेवला या पिशाच्य पासून सुरू होते. ड्रॅक्युला वो. तो पण इंडियन. दिवसभर झोपणार रात्रीचे राडे करणार अशी ही स्टोरी. 

7) अंधेरा (1975) 

Screenshot 2022 04 15 at 8.13.16 PM

रामसेंचा सुरवातीच्या काळातला पिक्चर. ठाकूर विजय सिंह कविता सोबत लग्न ठरतात. लग्नानंतर बायकोची मेमरी जाते. झपाटायला सुरवात होते आणि पुढे राडे सुरू होतात… 

8) सामरी (1985) 

सामरी हे भूत होतं. त्याच्याच नावाने एक पिक्चर होता. सामरी शैतानचा उपासक असतो. घरातले त्याला मारून टाकतात आणि एकएक करुन घरातले मरू लागतात अशी स्टोरीलाईन. बघा आत्ता ह्यो पण कशाला सोडताय. 

9) और कोन (1979) 

सांगून पटणार नाय पण यातलं गाणं लता मंगेशकर यांनी गायलय. ही रामसे यांच्या पहिल्या फिल्मपैकी एक होती. याचं संगीत बप्पी लहिरींनी दिलं होतं. पिक्चर सुपरहिट झालेला बाकी काही विशेष नाही 

10) दो गज जमीन के नीचे

बघा त्यावेळी महाराष्ट्रात १९७२ चा दुष्काळ चालू होता. त्या काळात हा पिक्चर आलेला. या पिक्चरपासूनच रामसे बंधुचा काळ सुरू झाला तो अगदी १९९० पर्यन्त चालला.

Screenshot 2022 04 15 at 8.13.23 PM

थोडे नाय १० पिक्चर सांगितले, बघा, भ्या आणि जमलं तर निवांत रहा. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.