साधा वाटणारी माणसं दहशतवादी कशी होतायत ?

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राच्या टेरेरिस्ट स्कॉडने १९ जूनला रमेश शहा या व्यक्तीला अटक केली. रमेश पुण्यातल्या नर्हेमध्ये रहायला होता. २६ मार्च पासून तो फरारी होता. 

१९ जूनची रात्र. पुण्यातल्या नर्हे गावातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातल्या टेरिरिस्ट स्कॉडने ही कारवाई केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव होत. रमेश शहा. दिसायला साधा.रहायला साधा. मुळचा युपीचा. तो २६ मार्चपासून फरारी होता. कारवाई करण्यात आल्यानंतर लोकांना समजलं तो भारतात होणाऱ्या आतंकवादी कारवायांसाठी पैसै फंडिंग करणारा सर्वात मोठ्ठा सुत्रधार होता. 

रमेश शहा मुळचा बिहारचा. गोपालगंज जिल्ह्याच्या हजियापूर कैथौलिया गावात राहणारा रमेश शहा. त्याचे वडिल भाजी विकायचे. तो देखील त्यांच्या सोबतच असायचा. गेले कित्येक वर्ष तो झोपडीतच राहतो. आई वडिल आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं मांडलेला संसार. महिन्याचा खर्च चालवण्याची देखील या कुटूंबाला मारामार होती. याच काळात हळुहळु का होईना बदल होत गेला. बदल होता तो पैशाचा. साहजिक चार पैसै हातात येतात म्हणल्यानंतर आई बापाला देखील पोरगा कुठून पैसे आणतो ते विचारायची हिंम्मत झाली नाही. कसातरी संसार चालतोय म्हणल्यानंतर त्यांनी देखील विचार करण सोडून दिलं. त्यांना वाटत होतं पोरगा आत्ता प्रॉपर्टी डिलींगच काम करतोय तर त्यातूनच चार पैसै रहात असतील. 

21686321 915683581918991 283292724972995762 n
FACEBOOK

रमेश शहाने २०१३ ला वडिलांच्या भाजीच्या गाडीवर काम करण सोडून दिलं आणि गोरखपुरमध्ये प्रॉपर्टी डिलींग करण्यास सुरवात केली. याच दरम्यान त्यानं दोन लग्न केली. पहिली बायको आई वडलांसोबत त्याच झोपडीत रहायची तर दूसऱ्या बायकोसाठी त्यानं वेगळ भाड्याचं घर घेतलं होतं. दूसऱ्या बायकोकडून त्याला सत्यम नावाचा मुलगा होता. प्रॉपर्टी डिलींगच काम करणाऱ्या रमेशनं मॉल काढायचं ठरवलं. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यानं दोन मजल्याचा भव्य शॉपिंग मॉल बांधला. दरमहिना पगारावर दहा जणांची नियुक्ती केली आणि मॉलच नाव ठेवलं सत्यम मॉल. 

इतकं करुनही रमेश त्याच आपल्या झोपडीसारख्या छोट्याशा घरात रहात होता. कदाचित याच कारणामुळे झोपडीत राहणाऱ्या श्रीमंती कोणाला दिसून आली नाही. रमेश पहिल्यासारखाच साध्या कपड्यात राहत होता. आर्थिक व्यवहार करत होता. 

21414865 909263632560986 4222558671087644899 o
FACEBOOK

अचानक २०१८ च्या मार्च महिन्यात सत्यम मॉलवर पोलिसांची धाड पडली. धाड टाकणारे पोलिस साधेसुधे नव्हते ते एन्टी टेरिरिझम स्कॉटचे पोलिस होते. रमेशच्या घरावर धाड टाकण्यात आली. मात्र रमेश सापडला नाही. रमेश त्या अगोदरच गायब झाला होता. गोरखपुरच्या नागरिकांना रमेश सारख्या झोपडीत राहणाऱ्या माणसाचे पाकिस्तान कनेक्शन पचवणं अवघड चाललं होतं. 

२४ मार्च २०१८. 

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशाच्या पोलिसांनी उत्तरप्रदेशातील प्रतापगड येथे राहणाऱ्या संजय सरोज, निरज मिश्र, लखनौच्या साहिल मसीह, मध्यप्रदेशच्या रिवा शंकर सिंह, बिहारच्या मुकेश प्रसाद, कुशीनगरच्या मुर्शरफ अन्सारी, नसीम अहमद, अरशद नईम अशा मोठ्या गॅंगला अटक केली. त्यांच्याकडे ५४ लाख रुपये रोख. एटिएम कार्ड, स्वाईप मशिन, मॅग्नेटिक कार्ड रिडर सारख्या गोष्टी आढळून आल्या. चौकशी केल्यानंतर समजल की त्यांना पाकिस्तानमधून पैसे येत असत. हे पैसे ते घातपात कारवाई करण्यासाठी पुढे पाठवत. या सर्वांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना पैसै पुरवणाऱ्या मुख्य सुत्रधाराच नाव समोर आलं ते नाव होतं रमेश सिंह याच. 

Screen Shot 2018 06 23 at 11.50.35 AM
twitter

रमेश शहा पाकिस्तानच्या कॉन्टेक्टमध्ये आला तो लॉटरीतून पैसे मिळवण्याच्या जाळ्यातून. इंटरनेट गेमिंगद्वारे पाकिस्तानमधून पैसै भारतात आणि भारतातून पैसै पाकिस्तानमध्ये पाठवले जात असत. यामध्ये पहिला पैशाचं आमिष दाखवून नंतर आतंकवादी कारवाई करण्यासाठी आमिष दाखवलं जात असे. त्यातूनच तो या जाळ्यात ओढला गेला. पैशाच्या मोहापाई झालेली सुरवात त्याला इस्लामच्या कट्टरवाद्यांपर्यन्त घेवून गेली. पुढे तो इंटरनेटवरुन कट्टरतावाद्यांच भाषण ऐकू लागला. त्यांचे विचार त्यांन आत्मसात केले. त्याचा ब्रेश वॉश करण्यात आला. या सगळ्याचा परिणाम म्हणून तो पाकिस्तानचा मोठ्ठा हस्तक बनून भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला.

पाकिस्तान काय आणि भारतातले कट्टर हिंदूत्ववादी दहशतवादी काय ? हे रोखलं नाही तर आज जसा पाकिस्तानला तालिबानी दहशतवाद्यांना पोसल्याचा पश्चाताप होतोय तसाच आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.