रमजान की रमदान, नक्की काय म्हणायचं असत ?

आपला जसा श्रावण किंवा मार्गशिर्ष तसाच मुस्लीम समजाचा रमजानचा महिना. फरक इतकाच कि आपण सोमवार नायतर गुरवार करतो तर मुस्लीम समाज पुर्ण महिना पाळतो. आपण श्रावणात मटण पाळतो? तर मुस्लीम समाज दिवसभर पाणी देखील पाळतो. रात्र झाली की मग दे दणादण सण चालू होतो. मोहल्ल्यातून कबाब आणि बिर्याणीचा वास यायला लागला की आपल्याला भाईचार वाढू लागतो. 

तर विषय असा आहे की, पवित्र महिन्यास रमजान म्हणायचं की रमदान ? कसाय बिर्याणी खायची असेल शिरखुर्मा प्यायचा/खायचा असेल तर ईद मुबारक तर दिलच पाहीजे, अशा वेळी प्रश्न पडणं साहजिक आहे. 

इतिहासाचा संदर्भ द्यायचा झाला तर भारतीय उपखंडात रमजान म्हणण्याची प्रथा आहे. फारसी भाषेवरुन आलेला रमदान हा ऊर्दू आणि हिंदी तसच बांग्ला भाषेत देखील असाच वापरला जातो. 

आपण देखील आपल्या लहानपणापासून रमजान हेच ऐकत आलो आहे. पण अचानक रमजानचा रमदान व्हायला लागला आहे. 

तर हे वारं आहे वाहतय इस्लामच्या जन्मभूमीतून अर्थात अरब देशांमधून. त्यासाठी आपणास रमजान आणि रमदान या दोन्ही शब्दांचा अर्थ आणि त्यांचा जन्मकसा झाला ते पहावं लागेल. 

रमदान. 

रमदान हा अरबी भाषेतला मुळ शब्द. मुळात त्याचा उच्चार अरबी भाषेत द असा होत नाही. मात्र अरबीतून इंग्लीशमध्ये भाषांतर होत असताना हा द आणला जातो. आत्ता हा द याच द चा उच्चार युरोप आणि अमेरिकेत ड असा केला जातो तर भारतीय उपखंडात तो द असा करतात. 

रमजान. 

रमजान हा अरबी तून पारसी आणि पारसीतून उर्दू आणि हिंदीत मिसळलेला शब्द आहे. पारसी भाषा हि कोणे एकेकाळी भारतातील मुख्य भाषा म्हणून गणली जात होती. पारसी भाषेतील अनेक शब्दांचा प्रभाव मराठी, हिंदी, बंगाली आणि उर्दू भाषेवर असलेला दिसून येतो. भारतात मुस्लीम समाजाच्या स्थापनेनंतर पारसी भाषेतील अनेक शब्दांचा स्वीकार मुस्लीमांकडून करण्यात आला. त्यामध्येच रमजान चा उच्चार केला जात असल्याचं सांगितलं जात. 

विशेष म्हणजे  नमाज (अरबी – सालाह) आणि  रोजा (अरबी – साउम ) हे शब्द देखील पारसी भाषेतून आले आहेत. भारतात जेव्हा मुस्लीम धर्म वाढू लागला. तेव्हा सांस्कृतिक मिक्सरमध्ये पासरी शब्दांना सहज स्वीकारलं गेलं. 

मग आत्ताच रमजानचं रमदान का होत आहे ? 

त्यासाठी वरवरच्या इतिहासात आपण जावू, तर झालं काय ज्या ठिकाणी मक्का मदिना आहे त्या इस्लामच्या कर्मभूमीतून अर्थात अरबस्थानात मुळच्या अरबी शब्दांचे जोर धरू लागला. सोप्यात सोप्प सांगायचं झालं तर झालं काय, अरबस्थानातल्या मुस्लीम समाजाकडे पेट्रोल, डिझेलमधून बक्कळ पैसा आला. त्या त्यांच्याकडे धर्माबाबत कट्टरता देखील होतीच. या दोन्हीच्या मिश्रणातून त्यांचा त्यांचा अरबण्यवाद निर्माण झाला. मग आमचच कस बरोबर आहे हे सांगण्याची स्पर्धा निर्माण झाली. अरबस्थानातले मुस्लीम हेच कट्टर मुस्लीम अस समीकरण जसजस दृढ होत गेलं तसतस जगभरातील मुस्लीम समाजावर त्यांचा कंट्रोल येत गेला. त्यातूनच आत्ता रमजान ऐवजी रमदान वापरण्याचं नवं वार वाहू लागलं आहे. 

सागंण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जाकीर नाईक माहितच असतील. तेच जे टिव्हीवरती प्रवचन देत असतात. तर ते देखील रमदान शब्दावर जोर देतात. ते कधीच रमजान म्हणत नाही. आत्ता मुद्दा हा आहे की रमदान पर्यन्त ठिक आहे पण खुदा हा शब्द देखील पारसी भाषेतून येतो त्यासाठी देखील पर्यायी शब्द वापरायचा झाला तर कस होणार आपल्या शायर लोकांच ? 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.