जातीभेदाविरुद्ध संपुर्ण समाजाने अंगावर “राम-राम” गोंदवुन घेण्यास सुरवात केली.

जय श्री राम. आज भारतात रहायचे असेल तर रामाचा जयजयकार करावा लागेल. त्यातून मॉब लिचिंकच्या झालेल्या घटना ताज्याच आहे. रामाच नाव घेण्यासाठी आज बळजबरी होतेय. या बळजबरीतून समोरचा न “सर्टिफाईड भारतीय” ठरणार आहे न की रामभक्त.

पण हि गोष्ट त्याहून वेगळी आहे आणि जूनी देखील. इथे जातीभेदामुळे एका समाजाने अंगावर रामाचं नाव गोंदवण्यास सुरवात केली. पुढे जातीप्रथा तर बंद झालीच नाही पण या समाजाला नवीन नाव मिळालं. ते नाव म्हणजे, 

“रामनामी”

साधारण १०० वर्षांपुर्वीची गोष्ट. छत्तीसगड मधील जांजगिरी चंपा जिल्ह्यातलं चारपारा गावा. या गावातला दलित समाज. त्या काळाप्रमाणे या समाजास गावाची विहिर बंद होती. गावातील मंदिरात त्यांना प्रवेश नव्हता. भेदाभेद होता. सवर्णांना या समाजाचा स्पर्श देखील विटाळ वाटायचां.

source: facebook

या प्रथेविरोधात एका तरुणाने आवाज उठवला. ते साल होतं १८९० चं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी दाखवलेला विद्रोहाचा मार्ग दिसण्यापुर्वीचा तो काळ. साहजिक अन्यायाची भाषा ज्या व्यक्तिला समजायची तसा तो विरोध करायचा. त्या तरुणाने देखील जातिभेदाला कडाडून विरोध केला. त्या काळात मंदिरात जाणं तर दूरच पण या समाजाला रामाचं नाव घेण्यास देखील बंदि होती. एखाद्याने देवाचं नाव घेतलं तर त्याला मनुस्मृतीचा दाखला देण्यात येत होता.

source: facebook

अशा वेळी या तरुणाने अंगावर रामराम गोंदवून घेतलं. देवाच्या नाव घ्यायला सु्द्धा बंदी करणाऱ्या समाजाच्या विरोधात केलेले ते बंड होतं. रामाच नाव घ्यायला सुद्धा बंदी असल्याने अंगभर रामराम गोंदवून घेतलं आणि त्या तरुणाला दलित समाजाने पाठिंबा दिला. हळुहळु करत गावातील प्रत्येक दलित व्यक्तिने अंगभर रामराम गोंदवून घेतलं.

पुढे झालं अस की, रामराम गोंदवून घेतलेल्या या समुदायाचा वेगळा पंथच तयार झाला आणि त्यांना रामनामी म्हणून ओळखल जावू लागलं. पण याचा अर्थ असा नाही की रामाच्या किंवा इतर कोणत्याही देवाच्या मंदिरात जाण्याचा अधिकार त्यांना मिळाला. झालं अस की या पंथाने देखील पूजाअर्चा, प्रार्थना, मंदिरात जाणं याला फाटा दिला. फक्त भजन, गायन करणं अंगभर देवाचं नाव गोंदवून भक्तीचा मार्ग स्वीकारण्यात आला.

source: facebook

पंथ आला. हळुहळु रामनामी मध्ये देखील प्रकार पडत गेले. अंगाच्या एकाच भागावर गोंदवून घेणारे रामनामी, कपाळावर गोंदवून घेणारे शिरोमणी, पुर्ण कपाळ अन् डोक्यावर गोंदवून घेणारे सर्वांग रामनामी आणि संपुर्ण अंगभर गोंदवून घेणारे नखशीख रामनामी झाले. रामनामी मध्ये देखील चार प्रकार निर्माण झाले.

मध्यंतरी रामनामी संप्रदायाचे प्रमुख असणारे मेहतर लाल टंडन यांना राम मंदिराच्या मागणीविषयी पत्रकारांनी विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की, 

‛मंदिरों पर सवर्णों ने धोखे से कब्जा कर लिया और हमें राम से दूर करने की कोशिश की गई. हमने मंदिरों में जाना छोड़ दिया, हमने मूर्तियों को छोड़ दिया. ये मंदिर और ये मूर्तियां इन पंडितों को ही मुबारक.’

आज किमान शरिराच्या एखाद्या भागावर देखील रामराम गोंदवल जातं. मुल दोन वर्षाच झालं की रामाच नाव गोंदवण्यात येत. इतकच नाही तर घरापासून ते कपड्यांपर्यन्त प्रत्येक ठिकाणी रामराम लिहलं जातं. आज या संप्रदायातील मुलं शिक्षणासाठी बाहेर पडलीत. संपुर्ण अंगभर नाही पण किमान शरिरावर एका ठिकाणी का होईना ते रामराम लिहून आपल्या संप्रदायाची मुल्य पाळत असतात.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.