रामनाथ गोयंकांनी आपल्या विरोधातल्या बातम्या आपल्याच पेपरच्या फ्रंटपेजवर छापायला लावलेल्या

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो. जो सरकार आणि जनता यात एका दुव्यासारखं काम करतो. हा… आजकाल काही मोजक्या लोकांमुळे सरकाराच्या दबावाखाली येऊन काम करणारी पत्रकारिता असे आरोप बऱ्याचदा ऐकायला मिळतात. पण भिडू कोणा एकामुळे अख्खच्या अख्ख क्षेत्रचं खराब आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल नाही का..?

अशात रामनाथ गोयंका यांच्यासारख्या पत्रकारचं उदाहरण आवर्जून द्यावं लागेल. ज्यांनी स्वतःच्या विरोधातल्या बातम्या सुद्धा आपल्याच्या पेपरच्या फ्रंट पेजवर छापल्या होत्या.

२२ एप्रिल १९०४ साली बिहारच्या दरभंगामध्ये जन्मलेले रामनाथ गोयंका ज्यांच नाव पत्रकारितेच्या क्षेत्रात आजही तितक्याच सन्मानाने घेतलं जात. सरकारच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं आणि चुकीच्या वाटल्या तितक्याच सडेतोड पणाने उत्तर देणं हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या याच स्वभावामुळं त्यांना बऱ्याचदा सरकारच्या दबावाचा सामना करावा लागलेला.

आणीबाणीच्या काळात सुद्धा असंच काहीस पाहायला मिळालं. अर्थात इंदिरा गांधी सरकारने लावलेल्या आणीबाणीला कडक विरोध करणाऱ्यांमध्ये रामनाथ गोयंका सुद्धा होते. त्यामुळे सरकारसुद्धा  त्यांच्या विरोधात होत. 

म्हणजे कुठलंही वृत्तपत्र किंवा मीडिया हाऊस चालवण्यासाठी जाहिरात ही  सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण गोयंका सरकारच्या विरोधात गेल्याने आणीबाणीच्या त्या १९७५ ते १९७७ च्या काळात इंडियन एक्सप्रेसला दिल्या जाणाऱ्या सगळ्या जाहिराती बंद करण्यात आल्या होत्या. एवढंच नाही तर पेपर छपाईच्यावेळी इंडियन एक्सप्रेसच्या प्रिटिंग हाऊसमधली लाईट सुद्धा कापली जायची. त्यामुळे पेपर वेळेत लोकांपर्यंत पोहोचणं अवघड झातेल. 

यानंतर गोयंका यांच्यावर वृत्तपत्राचे संपादक बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. एवढं सगळं होत नाही सरकारन सेन्सॉरशिप लावली. पण अश्या अवघड परिस्थितीत सुद्धा गोयंका यांनी सरकारच्या दबावाखाली आले नाही. उलट, सेन्सॉर केलेल्या संपादकीय जागा रिकामी ठेवली होती. मीडियाच्या क्षेत्रात अशा प्रकारचा निषेध याआधी कधीच झाला नव्हता.

त्यात आणीबाणीच्या काळात गोयंका लोकसभेचे सदस्य होते. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे सरकार गोयंकांना चारही बाजूंनी घेरत होते. संसदेत त्यांच्यावर आणि बाहेर त्यांच्या वृत्तपत्रावर सर्व प्रकारचा दबाव आणला जात होता.

पण अशा परिस्थितीत सुद्धा गोयंका यांनी धीर सोडला नाही. त्यांच्या जागी दुसरं कोणी असत तर आपल्या वृत्तपत्राचा फायदा स्वतःसाठी केला असता, पण गोयंका यांनी तसं केलं नाही. उलट त्यांनी एक्स्प्रेसचे तत्कालीन संपादन मुळगावकर यांच्या माध्यमातून त्यावेळी संसदेत आपल्या विरोधात जे काही बोलले किंवा केले जाईल ते पहिल्या पानावर छापायला सांगितलं. आणि  त्यांच्या बचावासाठी किंवा त्यांना मदत करणाऱ्या बातम्या आतल्या पानांवर छापायला सांगितल्या.  

असा क्वचितचं किंवा एकमेव संपादन असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, ज्याने स्वतःच्या विरोधातल्या बातम्या स्वतःच्याच वृत्तपत्रतच्या पहिल्या पानावर छापायला सांगितल्या. यानंतर सुद्धा सरकारने रामनाथ गोयंका यांच्यावर बराच दबाव टाकला. पण तरीसुद्धा ते आपल्या मतावरून मागे सरकले नाहीत.  

शेवटी आणीबाणी संपली,  आणि रामनाथ यांनी आपल्या वृत्तपत्रात संपादकीय लिहायला सुरुवात केली त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा केला गेला. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचे सरकार पडले आणि पहिले बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

एकदा तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले होते की, रामनाथजींचा आणीबाणीसाठीचा लढा हा आम्हा राजकारण्यांपेक्षा खूपच नाजूक, निर्णायक आणि महत्त्वाचा होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.