बलात्कार पीडितांना व साक्षीदारांना कायदेविषयक मदत देण्यासाठी एक संस्था पुढे आलीय

देशात दररोज बलात्काराच्या असंख्य घटना समोर येत असतात. यातल्या काहींच्या तक्रारी दाखल होतात, तर काही आपली अब्रू जाण्याच्या भीतीनं पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतंच नाहीत. बरं तक्रार दाखल झाली तरी त्या प्रकरणाची कारवाई, पोलीस स्टेशनच्या फेऱ्या, चौकशी सत्र, कोर्ट-काचऱ्या या सगळ्यांना इतका वेळ जातो कि, बलात्कार पीडिता मानसिक दृष्ट्या कमकुवत बनते.

ह्यातून न्यायालयीन लढाई जिंकली तरी पीडितेला भविष्यात बऱ्याच गोष्टींना समोर जावं लागत. आपले नेतेमंडळी आर्थिक साहाय्य देण्याची आश्वासने देतात , मात्र या पीडितांना आणि त्यांच्या घरच्यांना खरं तर मानसिक आधाराची गरज असते. 

याच पार्श्वभूमीवर एक संस्था पुढे आलीये.  बलात्कार पीडिता आणि बलात्काराच्या केसेस मधल्या साक्षीदारांना कायदेविषयक मदत आणि सहाय्य्य देण्यासाठी सहयोग ट्रस्ट तर्फे पुण्यात ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरु करण्यात आलीये. ॲड.रमा सरोदे यांनी आज पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.

ॲड.रमा सरोदे म्हणाल्या कि,

प्रत्येकालाचं सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे बलात्कारातून सावरणाऱ्या स्त्रियांना कायदेविषयक मदत देण्यातून अशा माणुसकीविरोधी गुन्ह्यांना केवळ प्रतिबंधच होणार नाही तर या  स्त्रियांना सशक्तपणे व विश्वासाने जगण्यासाठी परिणामकारक मदत होऊ शकते.

या पत्रकार परिषदेत ॲड.रमा सरोदे यांच्या सोबत सुरेखा दास , रेश्मा गोखले, गौरांगी ताजने, ॲड.अजित देशपांडे, ॲड.अक्षय देसाई, शार्दूल सहारे, तृणाल टोणपे देखील हजर होते.

रेप क्रायसिस सेंटर

आता, रेप क्रायसिस सेंटर म्हणजे काय तर बलात्कार-विरोधी चळवळीशी संबंधित एक संस्था. जी  बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि लैंगिक हिंसा पीडितांना मदत करण्याचे काम करतात. या सेंटरच्या माध्यमातून अनेक सुविधा पुरवल्या जातात. ज्यात पीडितेला वकिली मदत, कम्युनिटी आउटरिच, एज्युकेशन प्रोग्रॅम सारखे कार्यक्रम राबले जातात. याच अर्थाने सहयोग ट्रस्ट देखील काम करणार आहे. 

सपोर्ट ग्रुपची मिळणार मदत

यावेळी आपल्या रेप क्रायसिस सेंटर वषयी माहिती  देताना ॲड.रमा सरोदे यांनी सांगितलं कि, ‘बलात्कार झाल्याचा भावनेने जगणाऱ्यांना त्यांचं दुख आणि समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून हे सेंटर काम करेल. या माध्यमातून एखाद्या दिवशी आमच्या कार्यालयात ‘सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे.

लैंगिक अत्याचार झालेल्या  बऱ्याचश्या महिला या सगळ्यात जणू काही आपण स्वतःच चूक केलीये, अश्या दबावात जगतात. त्यामुळे मानसिक नैराश्य येत, काही केसेसमध्ये तर त्यामुळे आत्म्याहत्येचा निर्णय घेतला जातो. अश्याच महिलांना त्यांच्या मनातील ताणतणाव एकमेकांसोबत संवाद साधण्यातून कमी करण्याचा प्रयत्न ‘सपोर्ट ग्रुप’ करेल. यातूनच बलात्काराच्या केसेसचे दडपण न बाळगता लढण्याची हिम्मत या स्त्रियांमध्ये निर्माण होईल आणि त्या रेग्युलर लाईफ जगण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील.

या सगळ्या पर्यटनात मायग्रोथ झोन हि कंपनी या ट्रस्टला मदत करेल. ‘मायग्रोथ झोन’ ही कंपनी न्युरोलिंगविस्टिक तंत्रावर काम करते. त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तीद्वारे बालात्कारग्रस्त स्त्रियांचे काऊन्सलिंग करून त्यांना मानसिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी मोफत मदत करण्यात येणार आहे.

रमा सरोदे यांनी सांगितलं कि, ‘मायग्रोथ झोन’ सोबत सहयोग ट्रस्ट सहकाऱ्याच्या भावनेतून बालात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपलीच चूक आहे अशी स्वतःलाच दोष देणारी भावना , मनातील भीती, राग या संदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी सुधा काम करणार आहे.

तसं भारतातली आणि राज्यातील बलात्काराच्या आकडेवारीवरून पाहिलं तर, २०१९ मध्ये देशात ३२५५९  बलात्काराच्या घटनांची नोंद आहे. म्हणजेच दररोज ८८ बलात्कार. यात महाराष्ट्रात २०१९ मध्ये २२९९ केसेस नोंदवल्या गेल्यात. आता बलात्काराच्या एवढ्या मोठया संख्येचा प्रकरणात आरोपीला शिक्षा होण्याचे प्रमाण फार कमी आहे. 

बलात्कार झाल्यावर आपल्यासोबत घडलेल्या घटना सांगायला सुद्धा मुलींना अवघड वाटतं. कारण आपल्या देशात लैंगिक गुन्ह्यांचा संबंध थेट अब्रूशी जोडला जातो. त्यामुळेच या रेप क्रायसिस सेंटर द्वारे हि सहयोगी ट्रस्ट स्त्रियांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देणं आणि  त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे काऊन्सलिंग करणार आहे.

न्यायालयात ज्या महिलांच्या बलात्काराशी संबंधित केसेस सुरु आहेत अशा महिलांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे, प्रश्नांची उत्तरे देण्याबाबतची मानसिक भीती दूर करणे व आवश्यकतेनुसार त्यांच्या केसेस मध्ये सरकारी वकिलांना मदत करण्याची भूमिका पार पाडण्याचं कामही या सेंटरद्वारे केलं जाणार आहे.

हे सेंटर पुणेच नाही तर  पुण्याबाहेर राहणाऱ्या महिलांना दूरध्वनीद्वारे देखील सहाय्य आणि मार्गदर्शन करणार आहे.

या रेप क्रायसिस सेंटरच्या माध्यमातून बलात्कारग्रस्त स्त्रिया, त्यांची मुले आणि परिवार यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देखील दिली जाणार आहे. यासाठी सहयोग ट्रस्टने ०२०- २५४५९७७७ हा क्रमांक देखील उपलब्ध करून दिलाय. 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.