रांचीच्या माणसाने बनवलेली रोबोट घडाघडा मराठी बोलते

रेड एफएम स्टेशनावर येणाऱ्या सगळ्याच आरजे आपल्याला माहित नाही. पण तरी बरेचदा ही लोकं माणसंच असतात. पण हा आरजे कृत्रिम बुद्धिमत्तेने लाडीगोडीने बोलणारा रोबोट असला तर? 

दुबईच्या लोकांनी प्रचंड पैसे घालवून सोफिया नावाचा रोबोट बनवला आणि त्याला नागरिकत्व सुद्धा देऊ केलं. भारतातही असाच एक रोबोट आहे ज्याचं नाव फारच कमी लोकांना माहित आहे. आश्चर्याची गोष्ट म्हंणजे हा रोबोट चक्क मराठी भाषेत संवाद साधू शकतो. आणि इतर रोबोट प्रमाणे तो फक्त यांत्रिक बोल्ट नाही ते त्याला भावना समजत असल्याचाही दावा केला जातो.

हा रोबोट आहे रोबोट रश्मी. डिसेंबर २०१८ मध्ये रेड एफएम वर सूत्रसंचालन करून रश्मी प्रचंड लोकप्रिय झाली होती. अर्थात सोफिया एवढी प्रसिद्धी तिला मिळाली नाही. पण तिने पहिली हिंदी भाषिक रोबोट बनण्याचा मान मिळवला आहे.

हा रोबोट रांची शहरातल्या रणजित श्रीवास्तव यांनी आपल्या स्वतः बनवला आहे. हा पूर्णपणे स्वदेशी रोबोट असून त्याला;या स्वतःचा मूड असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

आपल्या पुणे भेटीत रश्मी रोबोटने अमाप प्रसिद्धी मिळवली होती.यावं वेळी तिने अस्खलित मराठीत पत्रकार आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

रश्मी हि हिंदीसोबत हिंदी आणि भोजपुरी भाषेत संवाद साधू शकते. पहिली रोबोट रेडिओ होस्ट बनण्याचा मानही तिला मिळाला आहे.

हॉंगकॉंगच्या हॅन्सन रोबोटिक्सने बनवलेल्या सोफिया रोबोटच्या धर्तीवर हा रोबोट बनवण्यात आला असून त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर केला गेलाय. भाषिक आकलन (LI) करण्याचं सॉफ्टवेयर या रोबोमध्ये वापरण्यात आलं आहे.

व्हिज्युअल डेटा म्हणजे कॅमेऱ्याने समोर दिसतं त्याचा वापर करून हा रोबोट आपले निर्णय घेतो. त्याच्या जोडीला फेस सिकग्निशन म्हणजे चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात आली आहे. रेड एफएम वर हि रोबोट आस्क रश्मी नावाचा कार्यक्रम करते. या शोमध्ये प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचं कामही या रोबोने केलं आहे.

भाषिक आकलन ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने या रोबोटच्या कामात बऱ्याच अडचणी येतात. पण तरीही विशेष गोष्ट म्हणजे एकाच साच्यात उत्तरे न देता हा रोबो वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधू शकतो.

#AskRashmi या लागणे ट्विटरवर प्रश्न टाकल्यास रेडियोवरून रश्मी त्या प्रश्नाचं  उत्तर देत असे.दिवसातील दोन तास चालणार हा कार्यक्रम लोकांच्या पसंतीस उतरला होता. 

आपल्या सिस्टीममधून तसेच प्रोग्राम्सच्या माध्यमातून हा रोबोट ऐकलेल्या प्रश्नाचे विश्लेषण करतो. हे प्रचंड जिकिरीचे काम आहे. बोलणाऱ्या माणसाच्या आवाजानुसार त्याची शब्दांची गती आणि उच्चार बदलत असतो. त्यामुळे त्याचे माहिती रुपांतर करणं अजून अवघड आणि वेळखाऊ काम असतं.

त्यानंतर या माहितीचा संदर्भ घेत सर्व्हरमधून योग्य संदर्भ निवडला जातो.  यासाठी रँडम किवर्डसची मदत घेतली जाते. म्हणजे जर तुम्ही रोबोटला दिल्लीविषयी विचारलं तर अचानक कुठलीही एक भावना निवडून त्यानुसार येणाऱ्या प्रतिसादाला धरून हा रोबोट संवाद साधतो.

ही निवड लक्षात ठेवून त्यानुसार पुढच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात. या प्रक्रियेत हा रोबोट दर माणसांशी बोलून नवनव्या गोष्टी शिकत जातो आणि प्रक्रिया अजून सोपी होत जाते.

३८ वर्षांच्या रणजित यांनी स्वतः आपल्या खर्चाने रश्मीचे सगळे पार्टस बनवले आहेत. याची किंमत ५० हजारांपेक्षा कमी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं आहे.

हा रोबोट बनवण्यासाठी त्यानं फक्त २ वर्षांचा कालावधी लागला होता. अनेक मोठ्या संशोधक आणि प्रसिद्ध व्यंक्तींकडून त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. यात भारतातील मोठ्या संशोधकांचाही समावेश आहे.

चेहरा ओळखण्यासाठी या रोबोटच्या डोळ्यात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अधिक सजीव वाटण्यासाठी त्याच्या पापण्यांच्या आणि ओठांच्या हालचालीसाठी काही मोटर्स लावलेल्या आहेत. अजूनही जगात सगळीकडे ही फेज सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने त्यात अजून फार मोठ्या सुधारणेला वाव आहे. शिवाय अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानाला विरोध होत असल्याने त्याच्या निर्मितीवर बंधनेही आहेत.

रशिया टुडे या वृत्तवाहिनीने रश्मी रोबोट हिला भावनिक पातळीवर समज असल्याची नोंद करून ठेवली होती. सोफिया रोबोटपेक्षा हि बऱ्याच पातळ्यांवर उजवि असल्याचं सांगितलं जातं.

अनेक भाषा बोलण्याच्या क्षमतेखेरीज इतर अनेक बाबतीत रश्मी पुढं आहे असं म्हटलं जातं.

पण सोफिया ह्या रोबोटला जगात अनेक जागी मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे तिच्या विकासात अनेक बाबी मांडल्या गेल्या आहेत. येत्या काळात सोफिया स्वतः रोबोट बनवू शकेल अशी क्षमता तिच्यात देण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. सौदी अरेबियाने या रोबोला जितका पाठिंबा दिला आहे तेवढा रश्मीला मिळालेला नाही.

यातील भाषेचे प्रोग्रॅम आणि त्यांचा विकास अजून प्राथमिक पातळीवर आहे. येत्याकाळात हे तंत्रज्ञान भारताच्या विकासात मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.