ज्या कंपनीमूळं अपमान सहन करावा लागला होता, ती कंपनी आज टाटांच्या खिशात आहे

टाटा ग्रुप. आज ही कंपनी एकप्रकारे भारताची ओळख बनलीये. देशाच्या प्रत्येक मिडलक्लास फॅमिलीचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय ते या कंपनीमूळचं.  पिढ्यानपिढ्या ग्राहकांची  साथ आणि विश्वास घेऊन ही कंपनी जगातल्या टॉप कंपन्यांपैकी एक बनलीये.

ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एखाद्या आयडियल माणसाचं नाव विचारलं तर आपसुकच अभिमानानं तोंडावर रतन टाटा यांचं नाव येत. त्यांच्या बजेट कासपासून डिजाईन कारपर्यंत अनेक गाड्या आज धावतायेत. पण फार  कमी लोकांना माहितेय की,  रतन टाटांनी सुद्धा एका गाडीमूळं अपमान झेलावा  लागला होता. 

टाटा ग्रुप आज देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.  जमशेदजी टाटांच्या नेतृत्वाखाली देशाच्या उद्योगात क्रांती झाली, तेव्हा टाटा त्या कंपन्यांपैकी एक आहे.

आज टाटा ही केवळ देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात जास्त रोजगार देणाऱ्या कंपन्यांपैकी एक नाही, तर आपल्या कर्मचाऱ्यांविषयीच्या आदर्शांबद्दल आणि मूल्यांबाबत नेहमीच जागरूक असते.  या कंपनीला या पदावर आणण्याचे सर्व श्रेय रतन टाटा यांना दिले जाते.

1998, मध्ये, जेव्हा टाटाने पहिल्यांदा पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये टाटा इंडिका बाजारात आणली.  त्यावेळी रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा इंडिका बाजारात दाखल झाली. मात्र, लॉन्च झाल्यानंतर एका वर्षातचं ती फ्लॉप झाली.

त्यानंतर टाटांना त्यांच्या निर्णयाबाबत अनेक टीकेला सामोरे जावे लागले.  अनेकांनी त्यांना सल्लेही दिले की,  त्यांनी पॅसेंजर कारचा व्यवसाय बंद करावा. टाटांनी स्वतः हे मान्य केले आणि फोर्डला ते विकण्याची तयारी सुरू केली.  फोर्डनेही यात रस दाखवला.

बिल फोर्ड म्हणाले, आम्ही ते खरेदी करून तुमच्यावर एहसान करू.

यासाठी रतन टाटा आपल्या काही कर्मचाऱ्यांसह डेट्रॉईटमधल्या फोर्डच्या मुख्यालयात पोहोचले.  या डीलसाठी रतन टाटा आणि फोर्डच्या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे तीन तास बैठक झाली.  पण फोर्डच्या अधिकाऱ्यांचे वर्तन टाटांना आवडले नाही.

या बैठकीत फोर्डचे अध्यक्ष बिल फोर्ड यांनी रतन टाटांना सांगितले, “तुम्ही पॅसेंजर कार व्यवसाय का सुरु केला जेव्हा तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. जर आम्ही तुमच्याकडून हा व्यवसाय खरेदी केला तर आम्ही तुमच्यावर एक उपकारच करू.

बिल फोर्डची ही वागणूक रतन टाटांना पटली नाही आणि त्यांनी परत येण्याचा निर्णय घेतला.  या अपमानानंतर ते  प्रचंड तणावाखाली होते.

सुरुवातीच्या अपयशानंतर, टाटा मोटर्सने पॅसेंजर व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. याचा फटका  फोर्डच्या व्यवसायाला  मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला.

फोर्ड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती.  2008 साली  टाटाने फोर्डचा लक्झरी ब्रँड जॅग्वार-लँड रोव्हर खरेदी करण्याची ऑफर दिली.  यासाठी बिल फोर्डने आपल्या टीमसह टाटाचे मुख्यालय “बॉम्बे हाऊस” गाठले.  ही डील 2.3 बिलीयन अमेरिकन डॉलर म्हणजेच 9,300कोटी रुपयांवर फायनल केली गेली.

इंस्ट्रेसटींग  गोष्ट म्हणजे या वेळी या डीलच्या बैठकीत बिल फोर्डने रतन टाटांना सांगितले की, तुम्ही आमचा हा लक्झरी सेगमेंट खरेदी करून आमच्यावर उपकार करत आहात. 

आज जॅग्वार-लँड रोव्हर ही टाटा समूहाची मालमत्ता आहे.

जॅग्वार ही जगातील आलिशान कार्सपैकी एक आहे. याचे एक – एक मॉडेल इतके भारी असतात की, ती विकत घ्यायची म्हंटलं की, आधी बुकींग करावी लागते. त्याची किंमत ही कोटीच्या घरात असली,  तरी कार लव्हर्ससाठी ती पहिली चॉईस आहे.

सर विल्यम लायन्स आणि विल्यम वॅमस्ली या दोन मोटरसायकल प्रेमींनी 4 सप्टेंबर 1922 मध्ये स्वॅलो साइडकार कंपनीची स्थापना केली.  त्यानंतर 1935 मध्ये पहिली जॅग्वार लॉन्च केली.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.