नीरा राडिया टेप प्रकरण बाहेर आलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच रतन टाटांच्या इमेजला तडा बसला
ट्विटर वर परवा एक पोल बघण्यात आला. भारतात दोन प्रकारचे श्रीमंत आहेत तुमच्या आवडते कोण? यावर दोन ऑप्शन देण्यात आले होते. पहिला म्हणजे अदानी आणि अंबानी आणि दुसरा ऑप्शन होता अझीम प्रेमजी आणि टाटा. लोकांनी भरभरून दुसऱ्या ऑप्शनला पसंती दिली होती.
टाटा समुहाइतका आदर भारतातल्या कोणत्या दुसऱ्या बिझनेसमन फॅमिलीला मिळाला नसेल. आजही रतन टाटा यांच्या मनात भारतीयांच्या मनात एक वेगळा आदर आहे. मात्र टाटांच्या या इमेजवर एका घटनेणं तडा गेला होता आणि आजही या घटनेची सर्व माहिती बाहेर येऊ नये यासाठी रतन टाटा प्रयत्नशील असतात. हे प्रकरण आहे नीरा राडिया टेप प्रकरण.
आठ वर्षांपूर्वी बाहेर आलेल्या या टेप आता चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे आता या केसची सुप्रीम कोर्टापुढे सुनावणी होणार आहे.
या प्रकरणाबद्दल दोन वेगवेगळ्या पेटिशन सुप्रीम कोर्टापुढे दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी काही संभाषणे खाजगी असल्याने सार्वजनिक करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका रतन टाटा यांनी केली होती आणि दुसरी याचिका सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन (CPIL) या एनजीओने दाखल केली होती त्यांचं म्हणणं होतं की या राडिया टेपमधील संभाषण सार्वजनिक हितासाठी उघड करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाची शेवटची सुनावणी 2014 मध्ये झाली होती .
गुरुवारी आठ वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळं नाकी बघूया हे नीरा राडिया प्रकरण आणि टाटांचा त्याच्याशी नेमका काय संबंध होता.
नोव्हेंबर 2010 मध्ये ओपन मॅगझिनने ‘द एक्स-टेप्स’ नावाची कव्हर स्टोरी छापली ज्यामध्ये नीरा राडिया या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी लॉबिंग करणाऱ्या महिलेची टॅप केलेली टेलिफोन संभाषणं छापली होती.
त्यानंतर दोनच दिवसात आउटलुक मॅगझिनने ए राजा, कनिमोळी आणि रंजन भट्टाचार्य यांसारख्या नेत्यांचं त्याचबरोबर बरखा दत्त, शंकर अय्यर, शालिनी सिंग, दिवंगत जहांगीर पोचा आणि वीर संघवी यांच्याशी नीरा राडिया हिचं झालेलं संभाषण छापलं. आणि यामध्ये एक सगळ्यांचा चाकरवून टाकणारं नाव होतं ते म्हणजे रतन टाटा.
या संभाषणांना एकत्रितपणे ‘राडिया टेप्स’ म्हणून संबोधले जाते. 2007 ते 2009 दरम्यान 300 दिवसांच्या कालावधीत इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ते रेकॉर्ड केले होते.
मग या नीरा राडिया कोण होती?
नीरा राडिया यांचा जन्म 1959 मध्ये केनियामध्ये स्थायिक झालेल्या एक पंजाबी जोडप्याच्या पोटी झाला. तिचे कुटुंब नंतर यूकेला गेले जेथे तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. 1981 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी तिने जनक राडिया यांच्याशी विवाह केला आणि एक उद्योजक म्हणून सुरुवात केली.
सुरवातीला तिने इंग्लंडमध्येच ट्रॅव्हल एजेंटचा व्यवसाय सुरु केला. पंजाब कुटुंबात वाढलेली नीरा बोलण्यात, नेटवर्क उभारण्यात पटाईत होती. त्यामुळे लवकरच तिच्या व्यवसायाची भरभराट झाली. हे सगळं चालू असतांना १९९१-९२ मध्ये भारतात लिबरलायझेशन झालं होतं. त्यानुसार हवाई वाहतूक क्षेत्र देखील खाजगी विमान कंपन्यांना खुलं झालं होतं. एअर इंडियाची मोनोपोली मोडून काढायला अनेक खाजगी कंपन्या पुढे येत होत्या.
आणि अशीच एक डील करण्यासाठी नीरा राडिया भारतात आली. 1994 मध्ये विमाने बदलू पाहत असलेल्या सहारा एअरलाइन्सशी दोन बोईंग 737-200 विमानांच्या कराराविषयी वाटाघाटी करण्यासाठी नीरा राडिया पहिल्यांदा भारतात आली आणि त्यानंतर तिने मागे वळून पहिलेच नाही.
भारतात बाबा आणि राजकारणी हे दोघे दोन सगळ्यात महत्वाचे लोकं होते हे तिनं ओळखलं आणि लवकरच अशा लोकांशी संबंध वाढवण्यास तिनं सुरवात केली. यातली महत्वाची लिंक तिला मिळाली एका केंद्रीय मंत्र्यांशी.
1999-2000 दरम्यान ती तिचे अध्यात्मिक गुरू कर्नाटकातील उडीपी येथील श्री पेजावर मठाचे धर्मगुरू विश्वेशा तीर्थ स्वामी यांच्यामार्फत तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री अनंत कुमार यांच्या जवळ आली. आणि त्यानंतर या दोघांचे संबंध एवढे जवळचे झाले की अनंत कुमारांच्या मंत्रालयाचे सर्व सौदे आणि करार तिच्यामार्फत होत होते असे आरोप झाले.
त्यावेळी कर्नाटकातील लंकेश पत्रिके या कन्नड वृत्तपत्राने बिल क्लिंटन-मोनिका लेविन्स्की या दोघांशी राडिया आणि अनंत कुमार यांचो तुलना केली होती.
तेव्हा या पेपर विरोधात अनंत कुमार यांच्या पत्नीने कोर्टात देखील दाद मागितली होती.
हे सगळं चालू असताना तिला शिखरावर नेणारी घटना घडली २००१ मध्ये.
टाटा एअरलाइन्स-सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त उपक्रमात काम करत असताना तिची रतन टाटा यांच्याशी भेट झाली. तिच्या विमान क्षेत्राबद्दल असलेल्या ज्ञानाने रतन टाटा प्रभावित झाले. त्या वेळीत्याच वेळी टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्सने ताजमहाल हॉटेलच्या जतन आणि अपग्रेडेशनसाठी सांस्कृतिक विभागासोबत सामंजस्य करारही केला होता. टाटांना हॉटेल्स आणि स्मारकाच्या ब्रँड असोसिएशनचा प्रचार करायचा होता. नीरा राडियाने मग या हॉटेलच्या पीआरचं काम देखील मिळवलं.
टाटांच्या इतर कंपन्यांच्या पीआरची कामं घेण्यासाठी तिनं वैष्णवी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स हि कंपनी सुरू केली. राडियाच्या या कंपनीला सुरुवातीला 14 टाटा कंपन्यांचे पीआर हाताळण्याचे कॉट्रॅक्ट मिळाले.आणि हेच वाढवत वाढवत 2009 पर्यंत ती 13 शहरांमधील 300 हून अधिक कर्मचार्यांसह टाटा समूहाच्या 90 हून अधिक कंपन्यांसाठी पीआर हाताळत होती.
टाटांनी जेव्हा पश्चिम बंगालमधील नॅनो कारचा प्रोजेक्ट गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील नीरा राडियानेच लॉबिंग केल्याचं समोर आलं होतं.
नीराचं बिझनेस एम्पायर देखील तेवढ्याच ताकदीनं वाढत होतं. २००७ मध्ये तिच्या कंपनीचं नेट वर्थ झाली होती ३०० करोड.
त्याचवेळी ती इन्कम टॅक्सच्या रडारवर देखील आली. सरकारने राडियाचे सुरवातीला 180 दिवसांचे संभाषण रेकॉर्ड केले होते. पहिल्यांदा 20 ऑगस्ट 2008 पासून 60 दिवस आणि नंतर 19 ऑक्टोबरपासून आणखी 60 दिवस. नंतर 11 मे 2009 रोजी 8 मे रोजी नवीन आदेश दिल्यानंतर तिचा फोन पुन्हा 60 दिवसांसाठी पाळतीवर ठेवला गेला.
यामुळे तिचे ए राजा आणि कनिमोझी तसेच २g घोटीलयाशी देखील संबंध असल्याचं देखील समोर आलं.
आणि याच टेपमधून टाटांनी नीरा राडियाला सरकारच्या विविध पॉलिसींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी , त्यासंबंधीची काही माहिती बाहेर काढण्यासाठी आणि में म्हणजे टाटा ग्रुपसाठी सरकारमध्ये लॉबिंग करण्यासाठी वापरल्याचं समोर आलं होतं. त्याचबरोबर दोघांमध्ये खाजगी संभाषणही झालं होतं. ज्यामध्ये काही नेत्यांबद्दल चुकीचे रिमार्क पास करण्यात आले होते.
या संभाषणातील काही भाग बाहेर आल्यानंतर टाटांच्या रेप्युटेशनला तडा गेला होता मात्र टाटांनी आपली इमेज पुन्हा रिकव्हर करण्यात यश मिळवलं.
त्यामुळेच टाटांनी हे संभाषण बाहेर येऊ नयेत यासाठी कोर्टाने निर्देश द्यावेत म्हणून कोर्टात धाव घेतली होती ज्याची सुनावणी आता आठ वर्षांनी सुरु होणार आहे. आणि जर ह्यावेळी सुद्धा ही सुनावणी चर्चेत राहणार असंच दिसतंय कारण सुब्रह्मण्यम स्वामींसारख्यानी या प्रकरणात खालच्या भाषेत ट्विट करत टाटांना घेरण्याची तयारी केली आहे.
हे ही वाच भिडू :
- टाटांनी आरोग्य क्षेत्रात इतकं काम केलय की त्यांची तुलना एखाद्या देशासोबतच होवू शकते
- पैसा मिळवणं हे मुख्य धोरण तरीही टाटांनी गुड कॅपिटलिस्ट ही इमेज कशी सेट केली…?
- जेआरडी टाटा नव्हे तर पुरुषोत्तम मेघजी कबाली हे भारतीय वंशाचे पहिले परवानाधारक पायलट होते