नगरच्या जेलमधल्या नेहरु-पटेलांना सोडविण्यासाठी पिल्लेंनी ब्रिटीशांवर बॉम्ब फेकले होते.

साधारण ८० वर्षांपूर्वीची गोष्ट !

१९४२ च्या ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली.

जनतेने उत्स्फूर्तपणे गावागावात उत्स्फूर्तपणे सरकारच्या विरोधात आंदोलन केले. इतकेच नाही तर सरकारी कचेर्‍या लुटल्या, सरकारी मालमत्तेची नासधूस केली. आता जनताच आपल्यावर अशी विरोध करत सुटलीये तर आता आपण राज्य कुणावर करायचं असा प्रश्‍न ब्रिटीशांना पडला.  देशाचा स्वातंत्र्याचा लढा याच ऑगस्ट क्रांतीमुळे निर्णायक पातळीवर पोहचला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे.

या निर्णायक परिस्थितीला आणखी एक लढा महत्वाचा ठरला तो म्हणजे, नगरच्या भुईकोट किल्ल्यातला !

इतिहासातील अशी अनेक पाने गळून पडली आणि आपल्याला म्हणजे येत्या प्रत्येक पिढीला काही महत्वाचे स्वातंत्र्य सेनानीच्या कार्याची माहितीच पोहचत नसते. भिडूने देखील एका अशाच इतिहासात लुप्त झालेल्या काही नावांची शोध शोध करायला सुरुवात केली आणि एक नाव म्हणजे जे नगरचे स्वातंत्र्य सैनिक रत्नम पिल्ले होय.

ब्रिटीश काळातल्या १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीनंतर आपल्या राष्ट्रीय नेते पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद व अन्य राष्ट्रीय नेत्यांना ब्रिटीश सरकारने नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवले होते. जनता अजूनच भडकली. आमच्या नेत्यांना डांबून ठेवले काय आम्ही तुम्हाला या देशातूनच घालवू म्हणत इंग्रजांना सळो कि पळो करून सोडायचं असा जनतेने धरला.

भुईकोट किल्ला नगरच्याच भागात येत असल्यामुळे तेथील जनतेला कळलं कि आपल्या नेत्यांना इथे कैद केले. त्याची धग गावातल्या प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचली आणि झाला लढा सुरु …

नेत्यांच्या अटकेचा निषेध म्हणून क्रांतिकारी रत्नम पिल्ले यांनी ब्रिटीश सैनिकांवर बॉम्ब फेकायला सुरुवात केली आणि जवळपासच्या सैनिकांच्या नाकीनऊ आणले.

रत्नम पिल्ले यांनी त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये हबीब खान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांना हाताशी धरून  तेव्हाच्या सरोष टॉकीजवर (आताची दीपाली टॉकीज) बॉम्ब टाकला होता. यात अनेक ब्रिटीश अधिकारी ठार झाले, काही जखमीही झाले. त्या वेळेच्या गुजरात-महाराष्ट्र व मुंबई इलाख्याचा हा पहिला मोठा बॉम्बस्फोट मानला जातो.

स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ ब्रिटीश सैनिकांवर बॉम्ब फेकणारे नगरचे क्रांतिकारी रत्नम पिल्ले यांची प्रेरण आजूबाजूंच्या क्रांतीकारकांनी देखील प्रेरणा घेतली. 

त्या बॉम्बस्फोटानंतर पिल्लेंसह इतर सहभागी क्रांतिकारकांवर देखील खटला चालवला गेला होता मात्र  खटल्यातून पिल्लेंसह अन्य सर्वांची निर्दोष सुटका झाली असली तरीही घाबरलेल्या ब्रिटीशांनी त्यांना तुरुंगवासातच ठेवले होते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची सुटका झाली.

स्वातंत्रोत्तर भारतात पाऊल ठेवलेल्या पिल्ले यांनी भिंगारमध्ये विविध सामाजिक कार्य केलीत. सामाजिक आणि देशपयोगी कामांमध्ये सहभाग घेतला. नगरच्या भिंगार येथील बाजार पोलिस स्टेशनमागे रत्नम पिल्ले यांचे निवासस्थान आहे. 

आजही त्यांचे स्मरण करीत नगरवासी त्यांच्या योगदानाच्या प्रती अभिवादन करतात, विविध कार्यक्रम, चर्चासत्र आयोजित करतात. त्यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे चिरंजीव भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष adv आर. आर. पिल्ले करीत असतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.