रत्नाप्पा कुंभार म्हणाले, शिवलिंगाची शपथ घेऊन सांगा तुम्ही खरेपणाने वागत आहात

शासकिय यंत्रणा कशाप्रकारे काम करतात तर बऱ्याचदा नेतेमंडळी आपल्या कार्यकर्त्यांना, हितसंबधातील व्यक्तींना शासकिय योजनांचा फायदा करुन देतात. भष्ट्राचार करतात. आणि शासकिय मंडळी आपल्या नेटवर्कमार्फत अशा नेते मंडळींना उघड तरी करतात किंवा निमुटपणे आपले कमिशन घेवून कार्यभाग साधतात.

काही ठिकाणी शासकिय अधिकारी देखील नेत्यांच्या वरचढ ठरतात. तेव्हा नेतेमंडळी पुढेमागे आपल्या कामाला येईल म्हणून दुर्लक्ष करतात.

या दोन्ही साखळ्यांमध्ये कोणतातरी एक माणूस प्रामाणिक असण्याची उदाहरणं तशीचं दूर्मीळच म्हणावी लागतात. असच उदाहरण म्हणजे रत्नाप्पा कुंभार आणि वसंतदादा पाटील यांच. शासकिय काम करुन घेणं, प्रामाणिक अधिकाऱ्यांना पुढं करणं हे काम ते नेटाने करत असत.

राजकारणाच्या पातळीवर कितीही मतभेद असले तरी या दोघांनी एका पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्याची चांगलीच जिरवली होती, हे सांगणारा हा किस्सा.

तर झालेलं अस की मार्केटिंग फेडरेशनमध्ये तेव्हा सरकारतर्फे भाताची एकाधिकार खरेदी चालू होती. फेडरेशन शेतकऱ्यांकडून तांदुळ घेवून ते सरकाराला पुरवत असे. सरकारी वाटपाचे आदेश येईपर्यन्त असा तांदुळ फेडरेशनच्या ताब्यातच असायचा.

एकदा कर्जत येथे अशा तांदळाच्या साठ्यांना आग लागली. सुमारे दीड ते दोन हजार पोती या आगीत सापडली. तांदुळ जळल्याचा बातम्या प्रसिद्ध झाल्या.

मात्र झालेलं अस की यातील बहुतांश तांदुळ खाण्याच्या दर्जाचा होता. असा तांदुळ कमी दरात व्यापाऱ्यांना विकता येईल असा विचार फेडरेशनमार्फत पुढे करण्यात आला. बंद लखोट्यातून व्यापाऱ्यांकडून या तांदळासाठी किंमत मागवायची, त्यासाठी तांदळाचा नमुना त्यांना पोहच करायचा अस काम फेडरेशन मार्फत करण्यात येवू लागल.

वास्तविक फेडरेशन फक्त एजंट म्हणूनच काम पहात होते, तांदुळ शासकिय मालकीचा असल्याने याचा फायदा तोटा जो काही होणार होता तो शासनालाच होणार होता.

ठरल्याप्रमाणे शंभरहून अधिक व्यापाऱ्यांचे तांदुळ खरेदीसाठी अर्ज आले. त्यासाठी अन्नधान्य समितीची सभा आयोजित करण्यात आली.

या सभेत फेडरेशनच्या चेअरमन यांनी,

हा तांदुळ ८५ रुपये क्विंटलप्रमाणे ठराविक व्यापाऱ्याला विकावा अशी सुचना मांडली.

येथे ना.श्री. कुलकर्णी या अधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. ८५ रुपयांहून अधिक दर अनेक व्यापाऱ्यांनी भरलेला असताना कमी किंमतीत या व्यापाऱ्याला तांदुळ का विकावा असा आक्षेप घेण्यात आला. सभेत खडाजंगी सुरू झाली. दुपारी सुरु झालेली सभा या विषयावर रात्रीचे साठेआठ वाजली तरी चालूच राहिली.

सुदैवाने अन्नधान्य समितीत दोन संचालक सभासद होते,

त्यापैकी एक म्हणजे वसंतदादा पाटील आणि दूसरे रत्नाप्पा कुभांर

रत्नाप्पा कुंभार आणि वसंतदादा पाटील या दोन्ही संचालक सदस्यांनी फेडरेशन चेअरमनच्या या गोष्टीवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी चेअरमन यांना विचारणा केली की, तुम्ही सांगता त्या दरापेक्षा अधिक दराने अनेक व्यापारी दर देण्यास तयार असताना ठराविक व्यापाऱ्यालाच हा माल का विकला जातोय?

मात्र या गोष्टीवर चेअरमन उत्तर देत नव्हते. ते फक्त आपण सांगतो त्याच व्यापाऱ्याला तांदुळ विकण्याच्या भूमिकेवर हट्टून बसले होते.

अखेर रत्नाप्पा कुंभार यांचा संयम सुटला. ते ताडकन उठले आणि थेट चेअरमन यांच्या खूर्चीजवळ गेले आणि आपल्या शर्टात हात घालून गळ्यातले शिवलिंग चेअरमनच्या समोर धरले. आणि म्हणाले,

ह्या शिवलिंगाची शप्पथ घेवून सांगा की तूम्ही खरेपणाने वागत आहात?

मात्रा लागू पडली आणि चेअरमने आपला हट्ट सोडून दिला. वसंतदादा पाटीलांनी रत्नाप्पा कुंभारांना साथ दिली. शेवटी सभा आटोपताच तो व्यापारी चेअरमन जवळ आला आणि शेलक्या शब्दात चेअरमन साहेबांचा उद्धार करत आपण दिलेले पैसे परत मागू लागला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.