एका छोट्या घरात 12 लोकांसोबत राहायचा आज त्याच्याइतक भव्य घर कोणाचं नाहीए….

भोजपुरी सिनेमा यांचं एक वेगळंच मार्केट आहे. रोमान्स पासून ते ऍक्शन थ्रिल पर्यंत सगळ्या गोष्टी तिथं पाहायला मिळतात. हे ही काय कमी होतं म्हणून त्यात क्रिकेटचीही भर पडली. भोजपुरी लोकगीताला आजही जगभर ऐकलं जातं. भोजपुरी सिनेमांमध्ये अनेक मोठे स्टार होऊन गेले ते म्हणजे मनोज तिवारी,रवी किशन, निरहुआ पण खरा हिंदीत राडा केला तो रवी किशनने. रवी किशन आज ज्या हिरोगीरीने वावरतो त्याच्यामागे त्याचा खूप मोठा संघर्ष आहे.

भोजपुरी सिनेमात जाण्याअगोदर रवी किशन मुंबईत आला. मुंबईत आल्यावर राहायला जागा नाही, काम मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. पण सुरवातीला तडजोड करून त्याला मुंबईत एका चाळीत जागा मिळाली. या चाळीमध्ये एकदम छोट्या आकाराच्या खोल्या होत्या आणि रवी किशनने मित्र मग हक्काचं घर म्हणून त्याच्याच खोलीत येऊन राहू लागली. असं एक एक जण करता करता एकूण 12 जण त्या खोलीत राहू लागले.

एका खोलीत 12 जण राहणे म्हणजे एक दिव्यच होतं पण रवी किशनने याही संघर्षाला तोंड दिलं. आईची इच्छा होती की रवी किशनने सिनेमातला हिरो व्हावं आणि टीव्हीवर झळकावं. आईने दिलेले 500 रुपये घेऊन तो मुंबईत आला आणि या 12 जणांच्या गर्दीत तो कसाबसा राहू लागला. व जसे संघर्षाचे दिवस जाऊन सुखाचे दिवस येतात तसंच रवी किशनच्या बाबतीत घडलं.

खाण्यापिण्याची होणारी आबाळ आणि किमान राहण्याची तरी सोय लागावी म्हणून रवी किशनने सिरियल मध्ये काम करायचं ठरवलं. हळूहळू तो स्थिरावत गेला आणि त्याला कामही मिळू लागलं. नंतर तो भोजपुरी सिनेमात झळकू लागला. 1992 साली त्याचा पहिला प्रमुख भूमिका असलेला पितांबर हा सिनेमा रिलीज झाला. नंतर मात्र त्याने मागे वळून बघितलं नाही. भोजपुरी सिनेमाचा तो टॉपचा सेलिब्रिटी झाला. भोजपुरी सिनेमात सगळ्यात जास्त व्हीलनच रोल रवी किशनने केले त्याला अमाप प्रेम लोकांकडून मिळालं.

बॉलिवुड मध्ये सुद्धा त्यानं चांगलं काम केलं आणि आपलं नाणं वाजवून दाखवलं. बॉलिवूड, टीव्ही, तेलुगू सिनेमा, कन्नड सिनेमा अशा बहुभाषि सिनेमांमध्ये रवी किशनने काम केलं. नंतर तो निवडणूक लढला विजयीही झाला.
एकेकाळी मुंबईत 12 जणांच्या खोलीत राहणाऱ्या रवी किशनचा बंगला किती किमतीचा आहे माहितीय का ? 12 करोड रुपयांचा. आज सगळ्यात महागडं घर भोजपुरी इंडस्ट्रीत त्याचं आहे. संघर्ष आणि जिद्द यांच्या साथीने रवी किशनने आपला एक ट्रेडमार्क इंडस्ट्रीत तयार केला.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.