युद्धावेळी रॉने मुशर्रफचा फोन टॅप केला होता, एक धाडसी पत्रकार ते घेऊन पाकिस्तानला गेला

कारगिल युद्ध हे भारत पाकिस्तान यांच्यात झालेलं निर्णायक युद्ध म्हणून ओळखलं गेले. आजही या युद्धाबद्दल अनेक चर्चा झडल्या जातात. पण यात एक मोठा खुलासा झाला होता आणि यामुळे पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं होतं. भारताच्या रॉ संघटनेने केलेली हि कारवाई बघून पाकिस्तान सुद्धा चकित झालं होतं. जाणून घेऊया हा पूर्ण मॅटर काय होता.

२६ मे १९९९ या दिवशी भारतीय सेनेचे जनरल वेदप्रकाश मलिक यांना याना रॉ संघटनेचे सचिव अरविंद दवे यांचा फोन आला आणि त्यात त्यांनी सांगितलं कि पाकिस्तानच्या दोन भागातल्या जनरल लोकांमध्ये झालेली हि रेकॉर्डिंग आहे. यात एक जनरल चीनच्या बीजिंगमधून बोलत होता. तर दुसरीकडून पाकिस्तानचे जनरल परवेज मुशर्रफ बोलत होते. 

भारताच्या दृष्टीने हि रेकॉर्डिंग महत्वाची होती. जनरल मलिक यांनी गुप्तसंघटना रॉला या दोघांमध्ये होणाऱ्या बोलण्याची रेकॉर्डिंग करायला सांगितली. फोन टॅपिंग करून बोलणं ऐकणं यामुळे अनेक गुप्त आणि भयानक बातम्या कळू लागल्या होत्या. तीन दिवसानंतर रॉने या दोघांमधली अजून एक रेकॉर्डिंग काढली आणि ती यावेळी थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवली.

रॉ संघटनेचं यामुळे चांगलंच कौतुक झालं. यात मुशर्रफ आणि पाकिस्तान सेनेचे जनरल अजीज खान यांच्यात झालेली हि चर्चा :

अजीज : यह पाकिस्तान है. हमें कमरा नंबर ८३३१५ में कनेक्ट कीजिए.
मुशर्रफ : हॅलो अजीज
अजीज : ग्राउंड सिचुएशन ओके. कोई बदलाव नहीं उनके एक एमआई १७ हेलीकॉप्टर को गिराया गया है. क्या आपने कल की खबर सुनी कि मियां साहेब ने अपने भारतीय समकक्ष से बात की है. उन्होंने उनसे कहा कि मामले को तुल आपलोग दे रहे हैं. वायुसेना का इस्तेमाल करने से पहले आपको कुछ और इंतजार करना चाहिए था. उन्होंने उनसे कहा कि हम तनाव को कम करने के लिए विदेश मंत्री सरताज अजीज को दिल्ली भेज सकते हैं.
मुशर्रफ : ओके, क्या यह एमआई-१७ हमारे इलाके में गिरा है ?
अजीज : नहीं सर, यह उनके इलाके में गिरा है। हमने उसे गिराने का दावा नहीं किया है। हमने मुजाहिदीनों से उसे गिराने का दावा कराया है।   
मुशर्रफ : अच्छा किया।
अजीज : लेकिन ये देखने वाला दृश्य था। हमारी अपनी आखों के सामने उनका हेलीकॉप्टर गिरा। 
मुशर्रफ : वेल डन। क्या इसके बाद उन्हें हमारी सीमा के पास उड़ान भरने में दिक्कत हो रही है ? वो डरे हैं या नहीं ? इस पर भी नजर रखो. क्या अब वो हमारी सीमा से दूरी बनाकर उड़ रहे हैं ?            अजीज : हां, अब उनपर बहुत दबाव है. उसके बाद उनकी उड़ानों में कमी आई है. 
मुशर्रफ : बहुत अच्छे, फर्स्ट क्लास.

पंतप्रधान आणि सुरक्षा सल्लागार यांनी हि रेकॉर्डिंग ऐकली होती. पुढे हीच रेकॉर्डिंग भारतीय इंटेलिजेंसने थेट पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ऐकवायची ठरवली. हि रेकॉर्डिंग इस्लामाबादला घेऊन जाण्याची जबाबदारी पत्रकार आर के मिश्रा आणि सचिव विवेक काटजू यांना देण्यात आली.

मिश्रा यांना पूर्ण संरक्षण देऊन नवाज शरीफ यांच्यापर्यंत पोहोचवलं. तिथे नवाज शरीफ यांना रेकॉर्डिंग ऐकवण्यात आली आणि त्याची ट्रान्स स्क्रिप्ट सुद्धा शरीफ यांना देण्यात आली. हि घटना इतक्या गुप्तपणे झाली होती कि कुणालाही याची खबर लागली नव्हती. 

पुढे हि फोन टॅपिंग ११ जून १९९९ रोजी सार्वजनिक करण्यात आली. या रेकॉर्डिंगच्या अनेक प्रति या दिल्लीमधल्या प्रत्येक विदेशी दूतावासात पाठवण्यात आल्या.

पाकिस्तानचं म्हणणं होतं कि सीआयए किंवा मोसादने भारताला यात मदत केली. पाकिस्तानच्या एका लेखिकेने यात मुशर्रफला चांगलंच धारेवर धरलं होतं. परवेज मुशर्रफ हे कुठल्या थरावर जात आहेत अशा अनेक टीका करण्यात आल्या.

अजीज यांचं स्वागत दिल्लीत या प्रकरणामुळे अत्यंत साधेपणाने करण्यात आलं. पाकिस्तानने हे रेकॉर्डिंग सार्वजनिक का केलं यावर सुद्धा आक्षेप नोंदवला होता. पण या फोन टॅपिंग प्रकरणामुळे भारतीय सैनिकांचं मनोधैर्य उंचावलं होतं. याच घटनेने मुशर्रफ आणि पाकिस्तानचं पितळ जगासमोर उघडं पडलं होतं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.