जग वाचवायला आलेले खऱ्या आयुष्यातले आईसमॅन आणि फॉरेस्टमॅन !

कॉमिक्समध्ये जग वाचवायला सुपरहिरो येतो. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा त्यांच्या कडे शक्ती असतात. कधी कोण कोळीकिडा चावल्यामुळे स्पायडरमॅन झालेला असतो तर कोणी परग्रहावरून आल्यामुळे सुपरमॅन बनलेला असतो. याच अफाट शक्तीच्या जोरावर डेंजर डेंजर सुपरव्हिलनला ते धूळ चारतात.

पण खऱ्या आयुष्यातही काही सुपरहिरो आहेत. त्यांच्याकडे ही शक्ती आहेत त्या दैवी नाहीत पण जगाला वाचवण्याच काम मात्र ते करत आहेत. चला तर त्यांची ओळख करून घेऊया.

आईसमॅन चेवांग नॉरफेल ?

लडाख चा प्रदेश जो भारतीय थंड वाळवंट म्हणून ओळखला जातो त्या भागात सुमारे ९०% शेतकरी शेतीसाठी बर्फाच्या पाण्यावर अवलंबून असतात .लडाख मध्ये साधारणतः एप्रिल महिन्याच्या सुरवातीला शेतीची कामे चालू होतात आणि या कामासाठी आवश्यक असणारे पाणी बर्फातून मिळते. पण त्याला जुलै महिना उजाडावा लागतो, आता या अवघड परिस्थितीशी दोन हात करायला देवदूतासारखे प्रकट झाले ते चेवांग नॉरफेल.

त्यांनी एक असा जालीम उपाय शोधला कि शेतीसाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला यासाठी त्यांनी मदत घेतली “आर्टीफिशीअल ग्लॅसिअर” ची त्यांच्या याच कामामुळे त्यांना जगभर “आईसमॅन” ही ओळख मिळाली.

लेह मधील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेले  चेवांग नॉरफेल यांनी लखनऊ येथून इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण केला .१९६० पासून लडाख मध्ये ग्रामीण विकास विभागात नागरी अभियंता म्हणून काम केले.पुढे १९९६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर समाजासाठी काम करण्याची उर्मी त्यांनी स्वस्थ बसू देत नव्हती त्यांनी “लेह पोषण प्रोजेक्ट” मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून सहभागी झाले.

कसे बांधले आर्टीफिशील ग्लॅसिअर ?

प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करत असताना त्यांना लक्षात आले…की,पाणी वाहत असेल तर त्याच बर्फामध्ये रूपांतर होणं हि अवघड गोष्ट असते मात्र पोपलर झाडाच्या खाली ही गोष्ट तुलनेनं सोपी आहे .याच तत्वाचा वापर करत त्यांनी आर्टीफिशील ग्लॅसिअर बांधायला सुरवात केली.

कमी उंचीच्या भागात याच तंत्राचा  वापर करत शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. नॉरफेल यांनी फुकटसे नावाच्या छोट्या खेड्यात बांधलेला आर्टीफिशील ग्लॅसिअर तर ७०० लोकवस्ती असणाऱ्या गावाची पाण्याची गरज भागवतो. अशी सुमारे १५ आर्टीफिशील ग्लॅसिअर त्यांनी आजतागायत बांधली आहेत.

भिडुनो,चेवांग नॉरफेल यांच्या जीवनावर आधारित लघुपट आरती श्रीवास्तव यांनी “व्हाईट नाइट” या नावाने तयार केला आहे. ती तुम्हाला नक्की आवडेल.

फॉरेस्टमॅन जादव पायेंग

“ मेरा घर बडा है साडे बारासौ एकर का है !!! तुम्हारा घर कितना बडा है “

असं अभिमानाने सांगणारे ५६ वर्षीय जादव पायेंग यांनी १९७९ सालापासून स्वतःच आयुष्य एकाच कामाला वाहून घेतलेलं ते म्हणजे झाडं लावायची. हाच एक ध्यास घेत ते एक एक झाड स्वत:च्या हाताने लावत राहिले याचा परिणाम म्हणजे आज ब्रह्मपुत्रेच्या माजूली बेटावर तब्बल १२५० (साडेबाराशे) एकरावर ‘मुलाई कथोनी’ नावच जंगलच उभं राहील आहे.

“मुलाई” हे जादव यांचं टोपण नाव तर आसामी भाषेत “कथोनी” चा अर्थ जंगल असा आहे . या जंगलाला “मोला फॉरेस्ट” सुध्दा म्हणतात.

जादव पायांग सोळा वर्षाचे असताना आसाम राज्यातील जोहराट जिल्ह्यात कोकिलामुखी या त्यांच्या गावी एक घटना घडली. ब्रह्मपुत्रेन रौद्ररुप धारण केल आणि मोठा महापूर आला या बेटावर एकही झाड शिल्लक राहील नाही..

प्रचंड प्रमाणात वृक्षहानी तर झालीच शेकडो साप वाळूत तडफ़डून मेले. झाडं नसतील तर आपली- माणसाची अवस्थाही अशीच होईल का या चिंतेनं १६-१७ वर्षाचे जादव पायेंग अस्वस्थ झाले. गावातल्या वडिलधाऱ्यांनी  त्यांना झाडं लावायचा सल्ला दिला, काहींनी बांबूची रोपंही दिली. तीच एक गोष्ट खूपच मनावर घेत जादव पायेंग यांनी बेटावर झाडं लावणं सुरु केलं ते काम आजतागायत सुरुच आहे.

जादव पायंग एका छोट्या बांबूंच्या झोपडीत त्यांच्या तीन मुलांसोबत राहतात. जादव पायांग यांच्याकडे  बोटावर मोजण्याइतकी गाई म्हशी आहेत यातून मिळणार दूध हा एकच उत्पनाच साधन अशी आर्थिक परिस्तिथी असताना ३५ वर्ष अगदी नित्य नियमानुसार हा अवलिया अक्षरशः वेड्यासारखं काम करू लागला.

जाधव पायेंग यांचा दिनक्रम सकाळी चार वाजता, मग ते बोटेत बसून नदी पार करत,बेटावर जावुन मिळतील तिथनं बी, रोपं गोळा करायची, वाळूच्या बेटावर खड्डे खणून ती रोपं लावायची,वाढवायची. ऊन,वारा,पाऊस काहीही असलं तरी जादव पायेंग हे बेटावर जाऊन बी- रोपं लावण्याचं काम करत असत आणि बघता बघता जादव पायेंग यांनी मोठ जंगलच उभा केल.

मुलाई कथोनी नावाच्या त्यांच्या या जंगलात बांबू, साग, सुबाभुळ, कदंब, अर्जून, कपोक, शेवरी अशी ११० प्रकारची वेगवेगळी औषधी झाडं आहेत. तर प्राण्यामध्ये अस्वल, हरणं, गवे पट्टेरी वाघ, तसेच तीन चार महिण्यासाठी मुक्कामी येणारे गेंडे हत्ती आहेत.अशा विविध प्रकारच्या पक्षी-प्राण्यांचं निवासस्थाना ची सोय  या जंगलाच्या माध्यमातून झाली.

स्वभावाप्रमाणे मुलाई कथोनीच्या पुढे ब्रह्मपुत्रेचा आणखी एक प्रवाह पार करत जादव पायेंग यांनी आणखी एक  ‘मेकाही’ नावाचं बेट शोधून काढलंय. गेली ६ वर्ष त्या दीड ते दोन हजार एकर विस्तार असणाऱ्या  “मेकाही बेटावर”  झाडं लावायचं आवडत काम जादव पायेंग करत आहेत .

येत्या काही वर्षात त्या वाळूच्या बेटावरही मुलाई कथोनी सारखं मोठं जंगल उभा करायचा निर्धार या झाडं लावणाऱ्या माणसांनं केलाय.

७ वर्षांपूर्वीपर्यंत कोणालाही माहिती नसणार नाव हे अचानक सगळयांचा समोर आल ते जितू कल्लीता या फोटोग्राफर मुळे…त्याच झाल अस कि पक्ष्यांची फोटो काढायला गेलेल्या या फोटोग्राफरला शोध लागला या अवलियाचा त्यांनी उभा केलेल्या बेटाचा हे जादव पायेंग यांनी उभारलेलं बेटावरचं जग बाहेरच्या जगाला कळायला तशी तब्बल ३० वर्ष लागली.

आज मात्र जादव पायेंग यांना “फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया” अशी आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे.

विल्यम डग्लस मॅकमास्टर या अमेरिकी माणसानं जादव यांच्या कार्यावर एक माहितीपट तयार केला. तिचं नाव ‘फॉरेस्ट मॅन’ (यूटय़ूबवर हा माहितीपट उपलब्ध आहे.)

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.