व्हाटसऍप मेसेजमध्ये सांगितलंय तसं पिसा टॉवरपेक्षा वाराणसीचं हे मंदिर जास्त झुकतंय का?

भिडूला काही गोष्टी समजून पारखून घ्यायची नेहमीचंच सवय. आता बाकीच्या ठिकाणी ही वेळखाऊ वाटतं असली तरी व्हाटसऍप आणि फेसबुकच्या जमण्यात मात्र भिडूला ही गोष्ट जाम कामाला येते. आता तर एकदा मेसेज फॉरर्वर्ड टॅग बरोबर आला तर आता आपोआप त्याची सत्यात चेक करायची इच्छा होते.

असंच एक फॉरवर्ड आलं वाराणसीच्या रत्नेश्वर मंदिराचं.

इटलीचा  लीनिंग टॉवर पिसा फक्त ४ डिग्रीने झुकलेला असताना त्याला जगातील ७ आश्चर्यांपैकी एक मानण्यात येतंय. पण आपल्या वाराणसीचं मणिकर्णिका घाटावरचं रत्नेश्वर मंदिर हे ९डिग्रीने झुकलेलं असताना पर्यटन स्थळातही या जागेचं नाव घेतलं जात नाही असा त्या मॅसेज मध्ये लिहलेलं होतं.

आत मंदिर आहे म्हणून आपोआप पाय पडलो. पण त्याचबरोबर आपल्या श्रद्धेचा कोणी गैरफायदा तर घेत नाही ना हे बघण्यासाठी म्हटलं आधी कन्फर्म तरी करू असं काय खरंच आहे का.

तर वाराणसीला मणिकर्णिका घाटावर खरोखरच हे मंदिर उभा आहे. आता हे मंदिर कोणी बांधलं याचे असे स्पष्ट पुरावे मिळत नाही. ज्या वेळी राणी अहिल्याबाई होळकर वाराणसी शहरात मंदिरे आणि तलाव बांधत होत्या, त्याच वेळी राणीची दासी रत्नाबाई हिनेही मणिकर्णिका कुंडाजवळ शिवमंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली, त्यासाठी तिने अहिल्याबाईंकडून पैसेही उसने घेतले. आणि ते केले अशीही एक दंतकथा सांगितली जाते. मात्र याचे एखादे विश्वसनीय लिखित दस्तावेज मात्र नजरेस आले नाही.

पण आपला विषय दुसरा आहे. 

मंदिर खरंच एवढं झुकलंय का? तर याच उत्तर हो आहे. 

अनेक विश्वसनीय साईट्सच्या संदर्भानुसार रत्नेश्वर मंदिर ९ डिग्रीनं झुकलेलं आहे. टाइम्स नाऊ, द लॉजिकल इंडियन आणि ऍटलास ऑब्सक्कुरा या वेबसाईटही या दाव्याची पुष्टी करतात.

आता प्रश्न येतो रत्नेश्वर मंदिर ज्याला लोक काशी करवट पण म्हणतात ते पिसा टॉवरपेक्षा जास्त झुकेलेलं आहे का? तर त्याचं उत्तर पण हो असंच मिळतं. 

इटलीतील जगप्रसिद्ध स्मारक, लीनिंग टॉवर ऑफ पिसा किंवा टोरे पेंडेंटे डी पिसा हे ११७३ मध्ये परत बांधले गेले. ते बांधल्यानंतर लगेचच, दगडांच्या वजनाखाली एका बाजूची जमीन बुडू लागली आणि संरचना ढासळू लागली. 

ताज्या अपडेटनुसार, टॉवर सरळ करण्यासाठी केलेल्या व्यापक कामामुळे टॉवर ३.९९अंशांवर झुकतो. त्यामुळे, हे खरे आहे की पिसाचा झुकणारा टॉवर सुमारे ४अंशांनी झुकतो, रत्नेश्वर मंदिरापेक्षा ९अंशांपेक्षा कमी.

आता येऊ हे रत्नेश्वर मंदिर का झुकतंय या विषयावर. तर याची अनेक कारणं सांगण्यात येतात. पहिलं  कारण आहे आधी हे मंदिर घाटावर बांधण्यात आलं होतं. मात्र त्यांनतर त्या घाटाची पडझड झाली आणि हे मंदिराचा पाय खचला. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे नदीच्या किनारी असलेलं हे मंदिर गाळात आहे. त्यामुळं याला पक्का पाया भेटला नाही आणि मंदिर शेकडो वर्षांपासून थोडं थोडं करून झुकत गेलं. तसेच अनेक वर्ष हे मंदिर पाण्याखाली होतं आणि आजही बऱ्याचवेळा नदीची पातळी वाढल्यानंतर हे मंदिर पाण्याखाली जातं. त्यामुळं हे मंदिर झुकत असल्याचंही भूगर्भ तज्ञांकडून सांगण्यात येतं.

पण तरीही हे मंदिर अजूनही उभं आहे आणि हे टॉवर ऑफ पिसाच्या तोडीचंच आहे. बाकी टॉवर ऑफ पिसा आणि मंदिर यांच्या उंचीची तुलना करायला रत्नेश्वरी मंदिराच्या उंचीबद्दल खात्रीशीर माहिती मिळत नाही. 

त्यामुळं आता तुलना राहू द्या साईडला आणि एक भन्नाट हेरिटेज साईट म्ह्णून आपण नक्कीच या साईटला भेट देऊच शकताय.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.