नदीत पैशांच नाणे टाकण्यामागे हे कारण असत, जाणून घ्या हिंदू प्रथांमागे असणारी कारणं.

हिंदुस्तानात पूर्वीपासून अनेक चालीरीती चालत आल्या आहेत. काही चालीरीतीं बद्दल तर हे पण सांगता येत नाही कि त्या किती जुन्या आहेत. काही चालीरीती नुसत्या अंधश्रद्धेतून चालत आल्या आहेत, पण काही चालीरीती अशा आहेत ज्या काहीना काही आधार असल्याचं सांगितलं जातं.

हात जोडणे. 

हात जोडण्याला शास्त्रामध्ये आदर करणे असा उल्लेख केला आहे. आणि विज्ञान म्हणत कि नमस्कार करताना सगळ्या बोटांचे प्रेशर पॉईंट जोडले जतात. हे पॉईंट्स डोळे, कान आणि मेंदूशी जोडलेले असतात. त्यामुळे आपल्याला त्या माणसाला लक्षात ठेवणे जास्त सोपे होते. आणि हात मिळल्याने जीवजंतू  पसरण्याचे प्रमाण जास्त असते. पण हात जोडल्याने असं होत नाही. म्हणून शेकहॅन्ड न करता नमस्कार केला जातो.

स्त्रीया पायात जोडवे घालतात. 

प्रथेनुसार स्त्रिया पायात जोडवे घालतात. आणि विज्ञाना नुसार पायाच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाची नस युट्रेस आणि हृदयाला जोडलेली असते. आणि जोडवे घातल्यामुळे शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होण्यासाठी मदत होते. तसेच चांदी जमिनीकडून ध्रुवीय ऊर्जा घेऊन शरीरात पाठवते.

नदी मध्ये नाणे फेकणे. 

ट्रेन ने,बस ने जाताना किंवा चालत जात असताना रस्त्यात जर नदी दिसली तर त्याच्यात नाणे फेकले पाहिजे, कारण त्यामुळे येणार काळ चांगला येतो अस म्हंटल जात. विज्ञाना नुसार पूर्वीच्या काळी तांबे आणि चांदी ची नाणी बनवली जात असत आणि तांब शरीरासाठी खूप फायद्याचे असते. पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी नदी हि मुख्य स्रोत होती. आणि बहुतेक हेच कारण असेल ज्यामुळे हि प्रथा चालत आली आहे.

कपाळावर टिळा किंवा टिकली लावणे. 

विज्ञाना नुसार असं केल्याने शरीरातील उपयोगी ऊर्जा शरीरातच राहते. कपाळाचा मध्यभागाला शरीराचे केंद्रबिंदू मानले जाते. आणि टिळा किव्हा टिकली लावल्यामुळे लक्षकेंद्रित करण्याच्या क्षमतेत वाढ होते.

मंदिरात घंटा वाजवणे. 

अग्मा शास्त्रात लिहिलं आहे कि घंटी/ घंटेच्या आवाजाने वाईट समजल्या जाणाऱ्या ताकती दूर पाळतात. पण विज्ञान म्हणत यामुळे मेंदूला लक्षकेंद्रित करण्यासाठी मदत होते. घंटीच्या आवाजाने मेंदूचे दोन्ही भाग सोबत कामं करतात. आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि मन शांत व्हायला मदत होते.

कान टोचणे. 

मुलींचे कान टोचणे याला भारतीय सभ्यतेचे लक्षण मानले जाते. डॉक्टरांच म्हणणं आहे कि कान टोचल्याने विचार करण्याच्या क्षमतेत वाढ होते.

कुंकू लावणे. 

कुंकू लावण्याला देखील वैज्ञानिक कारण आहे. आताचे केमिकल वापरून बनवले जाणारे कुंकू सोडले तर आधीचे कुंकू पारा, हळद आणि लिंबूच्या मिश्रणाने बनवला जायचा. या मिश्रणामुळे डोक्याकडे रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत होते. आणि कामोतोज्ज भावना वाढवण्यास हि मदत होते. त्यामुळे विधवांना कुंकू लावले जात नाही. तसेच पारा तणाव कमी करण्यास मदत करतो.

पिंपळाच्या झाडाची पूजा.

पिंपळाच झाड फक्त सावली देण्याचं काम करत. या झाडाची फळ खाल्ली जात नाहीत तसेच या झाडाच्या फांद्या नाजूक असल्यामुळे त्यांचा वापर करून काम केलं जात नाही. पण तरीही पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. वैज्ञानिक म्हणतात पिंपळाच झाड हे एकमेव असं झालं आहे जे रात्री सुद्धा ऑक्सिजन निर्माण करते. म्हणून कदाचित पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे.

हातात बांगड्या घालणे. 

मनगट मानवी शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. याची तुलना ताकद दाखवण्यासाठी ही केली जाते आणि आजार तपासणासाठी सुद्धा पकडले जाते . बांगड्या घालण्याने या ठिकाणी नेहमी घर्षण होत असते. त्यामुळे मनगटात रक्त प्रवाह चांगला होण्यास मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.