रेड बुल पिऊन शक्तिमान होण्यासाठी अनेकांनीं अमेरिकेत छतावरून उड्या हाणल्या होत्या

जाहिराती करून ब्रँड फेमस होतात यात काही नवीन नाहीए. पण एक ब्रँड जो नुसत्या जाहिरातींवरच चाललतोय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि तो ब्रँड आहे रेडबुल. २०१९ मध्ये रेड बुलनं पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसागणिक एक पुरतील एवढे कॅन्स विकले होते. आणि रेड बुलनं करून दाखवलं होतं आपल्या उत्पनाचा जवळपास ८०% पैसा मार्केटिंगवर लावून.

तर रेड बुलची सुरवात झाली होती थायलंडमध्ये.

आता थायलंड म्हटल्यावर तुमच्यापैकी अनेक जणं खुद्कन हासले असणार. पण रुको जरा ?याचाही संबंध आहे ह्या स्टोरीशी. तर चालिओ योविध्या या थाई माणसानं हे एक एनर्जी ड्रिंक काढलं होतं.  चालिओ हा अतिशय गरीब घरातनं येत होता. 

केवढा गरीब तर त्याचं कुटुंब बदकं हाकायचं काम करायचं. 

घरच्यांनी मग चालिओला बँकॉकला काहीतरी पोटापाण्याचं बघायला पाठवलं. त्यानं तिथं मग पाहिलं भावाच्या मेडिकलमध्ये काम केलं आणि त्यांनतर औषधाच्या कंपनीसाठी एमआर म्हणून काम करू लागला. गरीब घरातनं आलेल्या चालिओला आता पुन्हा गरिबीचे दिवस नको होते त्यामुळं मिळेल ते काम तो अगदी मन लावून करत होता. लवकरच त्याचे परिणाम दिसू लागले आणि चालिओनं स्वतःची कंपनी काढली. चालिओ केमिस्ट्री आणि मार्केटिंग या दोन्ही क्षेत्रात निष्णात होता. याचाच फायदा त्याला होत होता.  

असंच दिवसरात्र  काम करत असताना चालिओनं एनर्जी ड्रिंकबद्दल पहिल्यांदा ऐकलं. त्याकाळी जपानमधून एक्स्पोर्ट होणारी एनर्जी ड्रिंक थायलँडच्या श्रीमंत वर्गात तुफान लोकप्रिय होती. श्रीमंत मंडळी आपला स्टॅमिना वाढवायला हे ड्रिंक्स घेतात हे चालिओच्या लक्षात आलं. पण थाईलँड हा त्याकाळी मागास देश होता. मग त्यानं असंच प्रोडक्ट इथल्या शेतमजूर आणि कामगारांसाठी काढण्याचा ठरवलं.

 जपानी एनर्जी ड्रिंक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या टॉरीन या उत्तेजकाचा उपयोग त्यानं करून क्रॅटिन्ग डाईंग (Krating Daeng_) हे एनर्जी ड्रिंक बाजारात आणलं. 

ज्याचा अर्थ ‘लाल गवा’ असा होतो. मार्केटींग डोकॅलिटी वापरून चालिओनं उत्तेजकता दाखवण्यासाठी एकदम करेक्ट सिम्बॉल निवडला होता. 

पण प्रॉब्लेम होता मार्केटचा. थायलँडच्या गरीब जनतेने एनर्जी ड्रिंकबाबाबत याआधी ऐकलंच नव्हतं.

 मग चालिओनं मार्केटच तयार करायचं ठरवलं. 

थायलँडच्या भागात जास्त फेमस असणारा मुआय थाई या बॉक्सिंगसारख्या खेळाला तत्यानं स्पॉन्सर करायला सुरवात केली. बॉक्सर्सच्या शॉर्ट्स वर त्याच्या  क्रॅटिन्ग डाईंग ब्रॅण्डचा लोगो पाहून लोकांना जे समजायचं होतं ते समजलं होतं. ब्रँड तुफान चालला आणि सेल्समन करोडपती झाला होता.

पण जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असणाऱ्या ऑस्ट्रियातला टूथपेस्ट सेल्समन डायट्रिच मॅटशिट्झ याचा मात्र टिपिकल ९ ते ५ आयुष्य चालू होतं. आयुष्यात रोजचीच ती एक्सेल शीट, टार्गेट्स, प्रेझेंटेशन याला कंटाळलेला डायट्रिच मॅटशिट्झ आयुष्यात थोडा ‘गारवा’ मिळवावा म्हणून थायलँडला सुट्यांवर येतो.  मात्र थायलंडला आल्यावर मात्र त्याच्या बत्त्या वेगळ्याच कारणानं गुल झाल्या. जेट लॅग घालवण्यासाठी त्यानं क्रॅटिन्ग डाईंग पिला आणि त्याची त्याला लतंच लागली.  

थाईलँड वरून निघताना ‘हलक्या’ आठवणी घेऊन जाण्याऐवजी मोठी स्वप्नेच घेऊन डायट्रिच मॅटशिट्झ घरी परतला.

 क्रॅटिन्ग डाईंग त्यानं युरोपियन बाजारात लाँच करायचा ठरवलं. सेल्समन असलेल्या डायट्रिच मॅटशिट्झची बिझनेस आयडिया कधीकाळी सेल्समनची नोकरी केलेल्या चालिओ योविध्या याला पटली. मग दोघांनी मिळून ‘क्रॅटिन्ग डाईंग’ युरोपियन बाजरात लाँच करायचं ठरवलं. त्यासाठी मार्केटिंगची जबाबदारी घेतली डायट्रिच मॅटशिट्झचनं. 

क्रॅटिन्ग डाईंग’ची युरोपियन नागरिकांना साजेशी अशी टेस्ट डेव्हलप करून क्रॅटिन्ग डाईंग ज्याचा अर्थ लाल गवा असा होता त्याचं रेड बुल असं ब्रॅण्डिंग करण्यात आलं.

डायट्रिच मॅटशिट्झला पण चालिओसारखाच मार्केटचा प्रॉब्लेम आला. 

त्यानं पण मग मार्केट तयार करायचं ठरवलं  मॅटशिट्झनं मात्र एवढ्या जोरात मार्केटिंग केलं की अख्या जगात मार्केट मारलं. 

रेड बुलची स्वतःची एकही फॅक्टरी नाहीए. ते प्रोडक्ट दुसऱ्या कंपनीकडून बनवून घेतात मात्र मार्केटिंगवर तुफान पैस खर्च करतात. रेड बुलची आजच्या घडीला दोन फॉर्मुला वन टीम, पाच फुटबॉल टीम आणि एक आइस हॉकी टीम चालवतं. अनेक ऍडव्हेन्टचर खेळाला रेड बुल हाच स्पॉन्सर असतो. 

‘रेड बुल गिव्हस यु विंग’ ह्या टॅगलाईनची रेडबुलनं एवढी जाहिरात केली की अमेरिकेत लोकांनी रेड बुल पिऊन बिल्डिंगच्या छतावरून उड्या मारल्या होत्या. आपले हात पाय मोडून घेतलेल्या या लोकांना रेड  बुलनं नुकसानभरपाईपण दिली होती. 

हे ही वाच भिडू :

Web title: Red bull : Red Bull’s marketing strategy which make them more popular.

Leave A Reply

Your email address will not be published.