आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो मैदा, वाचा कारण.

मानवाला जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये अन्न हि एक प्रमुख गरज असते. चांगले अन्न सेवन केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. सकाळी फ्रेश झाल्यानंतर कडकडून भूक लागलेली असते. त्या वेळेस जर आपल्याला आपल्या आवडीचे पदार्थ नाश्त्याला मिळाला कि दिवसच वेगळा जातो.

जगात ७० टक्के लोक सकाळी उठल्यानंतर छोले भटोरे, पुरी, मोमोस, ब्रेड, बर्गर, पिझ्झा या सारख्या अनेक पदार्थांचं सेवन करतात. हे सगळे पदार्थ खाल्यानंतर अनेकांना पोट भरल्याचे समाधान होते. पण हे सगळे पदार्थ मैदा वापरून बनवलेले असतात. नेहमीच्या आहारात मैद्याच सेवन केल्यामुळे अनेक शारीरिक बिघाडांना सामोरे जावे लागते. पीठ आणि मैदा दोन्ही हि गहू पासून बनवले जातात. पण पिठापासून बनवलेली पोळी खाण जेवढं पौष्टीक असत तेवढाच मैदा खाण हानिकारक.

का आहे पिठात आणि मैद्या मध्ये एवढा फरक?

अनेक लोकांना माहित नसेल कि गहू हे एकच असं धान्य आहे ज्याच्या पासून पीठ आणि मैदा बनवला जातो. पण या दोन्हींना बनवण्याची पद्धत मात्र एकदम वेगळी आहे. जेव्हा पीठ दळले जाते तेव्हा ते गव्हाच्या वरच्या आवरण सहित म्हणजे आहे तस दळले जाते. त्यामुळे त्यातली पौष्टीकता आहे तशीच राहते.

पण मैदा बनवताना त्याचे वरचे आवरण काढले जाते. त्यामुळे त्यात कोणती ही पौष्टीकता उरत नाही. वरच्या आवरण मध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. ते कडून टाकल्यामुळे मैद्यात काहीच उरात नाही. 

आपण जर पिठात आणि मैद्यात तुलना करून बघितली तर दोन्ही मधला फरक आपल्याला जाणवतो. मैदा जितका पंधरा असतो तेवढा स्वच्छ हि दिसतो. पण दळलेल्या गव्हाचा वेगळा असा रंग आपल्याला नाही दिसत. मैद्याला पांढर आणि चमकदार ठेवण्यासाठी गहू पिसून घेतल्यानंतर त्यात अनेक केमिकल मिळवून ब्लिच प्रोसेस केली जाते. ब्लिचिंग प्रोसेसच्या वेळी मैद्या मध्ये क्लोरीन, क्लोरीन डाई ऑकसाईड सारख्या ब्लिचिंग प्रॉसेस पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वापरल्या जातात. ज्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात.

मैदा खाल्यामुळे लठ्ठपणा येतो.

मैद्या मध्ये फायबरचं प्रमाण शून्य असते. त्यात स्टार्च च प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येते. हीच स्टार्च जेव्हा पोटात जाते तेव्हा लठ्ठपणा वाढवण्याचे काम करते. जी लोक नियमितपणे मैदा युक्त पदार्थाचं  सेवन अधिक प्रमाणात करतात त्यांचे वजन वाढते. त्याच्या सोबतच त्यांची कोलेस्ट्रॉल लेवल आणि  रक्तामध्ये ट्रायग्लीसराईड च प्रमाणही वाढत जात. त्यामुळे जेवढं होईल तेवढं मैद्याच सेवन कमी करून पिठापासून बनवलेल्या पदार्थचे सेवन करने आरोग्यासाठी चांगले असते.

मैदा आतड्याना चिटकतो. 

मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे तो खूप जड आणि चिकट होतो. त्यामुळे पोट त्याचे सहजपणे पचन करू शकत नाही. त्यामानाने पिठामध्ये काही प्रमाणात का होईना फायबर असते आणि ते हलके हि असते. त्यामुळे पीठाने बनवलेले पदार्थ लवकर पचतात. मैद्याच पचन नीट नाही झालं तर ते आतड्यांमध्ये साचून राहते. त्यामुळे अनेक आजारांना खतपाणी मिळते. मैद्याच्या सेवनामुळे पोट नीट साफ होत नाही आणि अनेक समस्याना सामोरे जावे लागते.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.