एकेकाळी रिफ्युजी कॅम्पमध्ये बॅटबॉल खेळणारी मूले आज वर्ल्डकप खेळतायत.

रिफ्युजी कॅम्पमध्ये जीवन जगन हि काही साधी सोपी गोष्ट नाही. पण नाईलाजाने लोकांना आपली घरदार सोडून रिफ्युजी कॅम्प मध्ये रहाव लागत. कॅम्प मध्ये राहताना रोजच्या जगण्याची, रोजीरोटीची, जिवंत राहण्याची धडपड चालली असते. जणू काही उसन घेतल्यासारख आयुष्य लोक जगत असतात. जिवंत राहू कि नाही याचीही शाश्वती नसते.

जिथ दोन वेळेच खायला अन्न नसत, जिवंत राहण्याची काही हमी नसते अशा ठिकाणी क्रिकेट खेळणे तर दूरच खेळण्याची कल्पना हि करवत नाही. आटलेल्या विहीरीला पाझर फुटून जशी ती पुनर्जीवित होते तसे रिफ्युजी कॅम्प मधील क्रिकेटने अफगाणी लोकांच्या जगण्याला आधार दिला.

इतिहासावर नजर टाकली तर इंग्रज सैन्याने १९३९ मध्ये अफगाणिस्तानात क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. पण इंग्रजांनी राज्य केलेल्या इतर देशात क्रिकेट रूजल तसे ते अफगाणिस्तानात रुजले नाही.

आतंकवाद, युद्ध, रक्तपात, उपासमारी, गरिबी या सगळ्यातून वाचल्यावर रीफ्युजी कॅम्पचा आधार घ्यावा लागतो.  पण अफगाणीस्तानने ते सिद्ध करवून दाखवल.

अफगाणिस्तान आशिया खंडाच्या मध्य, पश्चिम आणि दक्षिण यांच्या मध्यस्थानी येतो. त्यामुळे अफगाणिस्तानच्या हालचालींवर शीतयुद्ध खेळणाऱ्या अमेरिका व रशिया या दोन बड्या राष्ट्रांचे लक्ष असायचे. याचदरम्यान १९७९ साली रशियाने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा अफगाणिस्तानने कडवा प्रतिकार केला. हा संघर्ष दहा वर्षे म्हणजे १९८९ पर्यंत चालला. यात रशियाचा विरोधक असलेल्या अमेरिकने अफगाणिस्तानच्या टोळ्यांना मदत केलेली. कोंडी असह्य झाल्यावर रशियाने १९८९ मध्ये अफगाणिस्तान मधून काढता पाय घेतला. याबरोबरच अफगाणिस्तान मधील अमेरिकेचे स्वारस्यही संपले.

त्यानंतर अफगाणिस्तान मध्ये सक्षम सरकार स्थापन होण्याआधीच दोन बड्या राष्ट्रांनी माघार घेतल्याने कट्टरवाद्यांनी देशावर नियंत्रण मिळवल. नव्वदीच्या दशकात अफगाणिस्तानात तालिबानी राजवट उदयास आली.

१९९६ ते २००१ पर्यंत तालीबानने राज्य करून अफगाणिस्तानवर आपल वर्चस्व स्थापित केल. अफगाणिस्तान हा कट्टरवाद्यांचा अड्डा बनला. सप्टेम्बर २०११ मध्ये अमेरिकेतील ट्विन्स टॉवरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे चित्र बदललं. अमेरिका आणि नाटोच्या सैन्यांनी तालिबानचा खात्मा केला. २०१४ च्या अखेरीस अमेरिका सैन्याने अफगाणिस्तान मधून माघार घेतली.

देशात युद्धज्वर असताना तसेच तालिबानी राजवट असताना हजारो अफगाणी नागरिकांनी सिमेपलीकडच्या रीफ्युजी कॅम्प मध्ये आश्रय घेतला आणि तेच त्यांच आयुष्य झाल.

क्रिकेटची सुरुवात

अफगाणिस्तान क्रिकेट संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती रिफ्युजी कॅम्पमध्ये. पाकिस्तान मधील रिफ्युजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या ताज मलिक या मुलाने अफगाण क्रिकेट क्लबची स्थापना केली. तालिबान कडून क्रिकेटला अनुमती मिळाल्यानंतर दाद नूर यांनी १९९५ मध्ये अफगाण क्रिकेट फेडरेशनची स्थापना केली. पण या फेडरेशनला आयसीसी कडून अफिलीएट स्टेट्स मिळण्यासाठी सहा वर्षे लागली.

अॅफिलीएट स्टेटस तिसऱ्या श्रेणीच्या संघांना मिळतं. रिफ्युजी कॅम्पमध्ये क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या ताज मलिक हे संघाचे पहिले प्रशिक्षक बनले. अॅफिलीएट स्तरावर संघर्ष करत अफगाणिस्तान संघ २००८ मध्ये वर्ल्ड क्रिकेट लीगच्या डिव्हिजन ५ साठी पात्र ठरला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच २००९ मध्ये २०११ च्या वर्ल्ड कपसाठी पत्र ठरण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला पण कॅनडा कडून पराभूत झाल्याने त्याचं स्वप्न दुरावल. पण त्यानंतर आयसीसी कडून अफगाणिस्तान संघाला वनडेचा दर्जा मिळाला.

अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भारताची मदत,

उपखंडामध्ये भारत नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे. अफगाणिस्तानची शीतयुद्धाच्या काळात आणि नंतरही जी वाताहत झाली त्यातून परत उभे राहण्यासाठी भारत आणि इथले नागरिक नेहमी प्रयत्नशी राहिले. अफगाणिस्तानची संसद, तिथल्या अनेक सरकारी इमारती, रस्ते धरणे अशी अनेक विकासकामासाठी भारताने सदैव पुढाकार घेतला. आजही अनेक अफगाण विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहेत.

यासगळ्या सोबतच क्रिकेट संघ उभारणीत भारताचा मोलाचा वाटा आहे. २०१५च्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारताचे पूर्व ऑलराउंडर मनोज प्रभाकर यांची अफगाणिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. याव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानला भरपूर आर्थिक मदत केली आहे. अफगाणिस्तान संघाचं घरचं मैदान नसल्यामुळे बऱ्याचदा त्यांची क्रिकेट टीम भारतात सरावासाठी येतात. यावेळच्या विश्वकपची तयारीही अफगाण टीमने बेंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर केली आहे.

रिफ्युजी कॅम्प मधून आलेले खेळाडू

अफगाणिस्तान संघात अनेक असे खेळाडू आहेत जे रीफ्युजी कॅम्पचे जगन जगले आहेत. अफगाणिस्तान संघाकडून सर्वाधिक रन्स करणारा मोहम्मद नबी, सेमुल्लाह शेनवारी, नवरोज मंगल, जावेद अहमदी हे खेळाडू रीफ्युजी कॅम्प मधील खडतर जीवन जगून आणि मोठा संघर्ष करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आले आहेत.

  • विपुल गुलाहे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.