रेखा तिच्या या मैत्रिणीमध्ये बच्चनला शोधत असते.

रेखा म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर पण घातक कोडं. तिच्या भोवती इतक्या दंतकथा जोडलेल्या आहेत की त्यावरच एखादा सिनेमा बनावा.

गेली तीस चाळीस वर्षे झाली तरी अमिताभ आणि तिच्या अफेअरच्या चर्चा थांबत नाहीत. एखाद्या समारंभात अवार्ड फंक्शन मध्ये तिची  एंट्री झाली की मिडीयाचे कॅमेरे अमिताभचे एक्स्प्रेशन टिपण्यासाठी वळतात. आणि बच्चन इतक्या वर्षानंतरही तिला बघून अवघडतो.

मुक्कद्दर का सिकंदर पासून दोघांच्यात काही तरी खिचडी पकतेय याची मिडियाला कुनकुन लागली होती. एकेकाळी कुरूप जाडी म्हणून हिणवली गेलेली रेखा तेव्हा प्रयत्नाने स्वतःचं रूपड पलटवून ग्लॅमरस बनली होती. तिच्याकडे पाहताच मादकता म्हणजे काय याचा प्रत्यय येत होता.

सिलसिलामध्ये जेव्हा अमिताभच्या गर्लफ्रेंडचा रोल रेखा आणि बायकोच्या रोल मध्ये जया एकत्र आले तेव्हा गॉसिपने रेकॉर्ड ब्रेक केला. या सिनेमाच्या नंतर काय झालं कुणास ठाऊक पण बच्चनने रेखापासून एक अंतर निर्माण केलं ते कायमचं.

असं म्हणतात याची सुरवात ऋषी कपूरच्या लग्नात झाली. ऋषीच्या लग्ना निम्मित्त राज कपूरने ठेवलेल्या रीस्पेशन पार्टी मध्ये बॉलीवूडचे झाडून सगळे स्टार हजर होते. बच्चन सुद्धा आपल्या कुटुंबासोबत हजर होता. पार्टी सुरु होती आणि अचानक चर्चा सुरु झाली, रेखा आली , रेखा आली. 

त्याकाळात नंबर वन वर असलेली रेखा आल्या आल्या चर्चा होणे सहाजिक होते पण त्यावेळी पहिल्यांदाच रेखा भरजरी कांजीवरम साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि मांग में सिंदूर अशा सौभाग्यवतीच्या वेशात आली होती. रेखाचं लग्न झालं की काय अशा गप्पा पूर्ण समारंभात झाल्या. बिचारे ऋषी कपूर आणि नीतू सिंग, त्यांच्या लग्नाच्या पार्टीत चर्चा अमिताभ आणि रेखाची होती. जया भरलेल्या डोळ्याने हे सगळ पहात होती. त्याच दिवशी तिने मनाशी काही तरी ठरवलं.

असं म्हणतात त्या दिवसानंतर अमिताभ ला जया बच्चनने वठणीवर आणले. परत कधी रेखा कडे फिरकून ही बघण्याची हिंमत त्याची झाली नाही.

रेखाने अमिताभवर जीवापाड प्रेम केले होते. ती त्याला विसरणे अशक्य होते. तरी काही वर्षांनी या सगळ्या गोष्टी मागे टाकून तिने दिल्लीच्या मुकेश अगरवाल या उद्योगपतीशी लग्न करून संसार थाटायचा प्रयत्न केला.

nwlfocsgbm 1473284590
source- scroll.com

पण सहाच महिन्यात बातमी आली, रेखा एका कार्यक्रमासाठी अमेरिकेला गेली असताना मुकेश अगरवालने तिचा दुपट्टा आपल्या गळ्याशी आवळून आत्महत्या केली. त्याने आपल्या शेवटच्या चिठ्ठीत आपल्या मृत्यूला कोणालाच जबाबदार धरु नका असे लिहिले होते.

पण तरी त्याची आई टिपिकल फिल्मी सासूच्या स्टाईलमध्ये ओरडत होती,

“वो डायन मेरे बेटे को खा गयी.”

रेखा अमेरिकेला जाण्यापूर्वी तिने घटस्फोटासाठी अर्ज केलेला. सहाजिकच मुकेश डिप्रेशनमध्ये होता. आणि त्यामध्येचं त्याने आत्महत्या केली होती. पण मिडिया एवढ्या साध्या स्टोरीने शांत होणाऱ्यातली नव्हती. रेखाच्या अफेअर मुळे मुकेशने आत्महत्या केल्याची चर्चा छुप्या आवाजात सुरु झाली.

यावेळी तिच नाव कुठल्या हिरो बरोबर जोडलं नव्हत. तिचं नाव जोडलं गेलं होत तिच्या सेक्रेटरी बरोबर. नाव होत फरजाना . हो ! ही एक मुलगी होती.

फरझाना गेली अनेक वर्षे रेखाची हेअरस्टाईलिस्ट होती. ती रेखाच्या अमिताभ बरोबरच्या ब्रेकअपपासून तिची पर्सनल सेक्रेटरीसुद्धा झाली होती.  रेखा कायम तिला आपली मित्र ,तत्वज्ञ ,सोल सिस्टर असं म्हणते. रेखा कुठे जाईल तिथे ती तिच्यासोबत सावली सारखी असते. रेखाच्या बेडरूममध्ये कधीही जाण्याचा अधिकार फक्त तिला आहे.

1503554536

गेली तीस वर्ष झाली ती आजही तिच्या सोबत आहे.कोणत्याही फंक्शन मध्ये पाहील तर रेखा आजही आपल्या टिपिकल सौभाग्यवतीच्या वेशात कांजीवरम साडी माथ्यावर सिंदूर अशीच येते, तिच्या शेजारी फरजाना असतेच. ही फरजाना मात्र कायम पुरुषी वेशात असते. तिच्या अंगावरचा काळा अथवा पांढरा सूट आणि हेअरस्टाईल पहिली की सत्तरच्या दशकातल्या अमिताभचीच आठवण येते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.