रिलायन्सने प्रत्येक सिक्सवर 6 हजार रुपये बक्षीस ठेवलं होतं. सिद्धू सबसे बडा खिलाडी ठरला…

क्रिकेटमध्ये सिक्सर किंग हे बिरुद फार कमी लोकांना लाभलेलं आहे. यात खेळाडूंच्या नावाची लिस्ट मोठी आहे, वेगवेगळ्या देशांचे स्टार प्लेअर आणि प्रत्येकाची स्टाईल वेगळी. आता जस आयपीएलमध्ये प्रत्येक सुपर कॅचला, लांब जाणारा सिक्स याला पैसे मिळतात सेम अगदी तशीच एक तरतूद रिलायन्सने केली होती त्याबद्दलचा हा किस्सा.

नवज्योत सिंग सिद्धू या माणसाला कोण ओळखत नाही. क्रिकेटमध्ये असलेल्या रिबेल पॅटर्न काय असतो याचं दमदार उदाहरण म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू. आधी स्ट्रोकलेस सिद्धू असलेला हा खेळाडू पुढे सिक्सर सिद्धू म्हणून जगभर ओळखला जाऊ लागला. पण एकदा रिलायन्सने वर्ल्डकपच्या काळात सिक्सरवर पैसे ठेवले होते आणि या रिलायन्सच्या योजनेत सगळ्यात जास्त हात धुवून घेतला तो म्हणजे नवज्योत सिंग सिद्धूने. 

१९८७ चा वर्ल्ड कप आणि षटकारांवर इनाम.

विश्वचषकाच्या तीन स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या होत्या. १९८७ साली क्रिकेट वर्ल्डकप भारत पाकिस्तान मध्ये संयुक्तपणे आयोजित करण्यात आला. या स्पर्धेत एक मोठा बदल करण्यात आला होता तो म्हणजे अगोदर ६० ओव्हर्सच्या असलेल्या मॅचेस आता ५० ओव्हर्सच्या करण्यात आल्या होत्या.

भारतातील त्यावेळची सगळ्यात प्रसिद्ध असलेली रिलायन्स कंपनी या वर्ल्ड कपची प्रायोजक होती. मायदेशातल्या खेळाडूंना काहीतरी खतरनाक करता यावं यावर रिलायन्स विचार करत होतं. भारतीय खेळाडू काहीतरी ब्लास्ट करतील असा खेळ व्हायला हवा अशी अपेक्षा रिलायन्स प्रायोजकांची होती. यावर बराच काळ विचार मंथन सुरु होतं.

शेवटी एक योजना पुढे आली ती म्हणजे भारतीय खेळाडूंमध्ये जोश भरण्यासाठी रिलायन्सने प्रत्येक सिक्सवर ६ हजाराचं बक्षीस ठेवलं. हा इनाम म्हणा किंवा आमिष म्हणा प्रत्येक भारतीय खेळाडूला प्रोत्साहित करणारं होतं. या स्कीमचा सगळ्यात जास्त फायदा उठवला होता तो नवज्योत सिंग सिद्धूने.

१९८७ च्या वर्ल्डकपमध्ये नवज्योत सिंग सिद्धूने सिक्सचा पाऊस पाडला होता. वर्ल्डकपची तिसरी मॅच हि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी खेळवली गेली. ऑस्ट्रेलियाने २७० धावांचं टार्गेट भारताला दिलं होतं. भारताची सुरवात चांगली झाली होती, सुनील गावस्कर आणि के. श्रीकांत ६९ धावांची भागीदारी केली. ३७ रनांवर असतनाला गावस्कर बाद झाले आणि ७० धावांवर श्रीकांत खेळत होता.

त्याच वेळी मैदानात एंट्री झाली नवज्योत सिंग सिद्धूची. ७३ धावांची जी काही सनसनाटी बॅटिंग सिद्धूने त्या दिवशी केली ज्यात ४ चौकार आणि ५ खणखणीत सिक्सर्सचा समावेश होता. सिद्धूने ४ वर्षानंतर संघात पुनरागमन केलं होतं. पहिल्या मॅचमध्ये आल्या आल्या ५ सिक्स मारून सिद्धूने ६ हजारांचं बक्षीस आरामशीर खिशात घातलं. 

एका वेळेला २४६ धावांवर ६ विकेट अशी परिस्थिती भारताची होती आणि भारत आरामात मॅच जिंकू शकत होता पण नंतर झटपट विकेट पडत गेल्या आणि भारताने मॅच गमावली. फक्त १ रनने भारत पराभूत झाला. पण नवज्योत सिंग सिद्धू या मॅचमध्ये ऑस्टेलियन बॉलर्सची पिसं काढली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.