अब्दुल सलामांना नोबेल मिळाल्यानंतर ते पाकिस्तानातून भारतात डोकं टेकवण्यासाठी आले.

अनिलेंद्र गांगुली. कलकत्ता शहराच्या छोट्याश्या गल्लीत राहणाऱ्या या माणसांच नाव तेव्हाही कोणाला माहिती नव्हतं आणि आजही कोणाला माहिती असण्याचं विशेष कारण नाही. ही गोष्ट घडली होती १९८० साली. त्यावेळी बऱ्यापैकी प. बंगालमध्ये या घटनेची चर्चा झाली. पण काही काळातच लोकांनी ही गोष्ट विसरली. पण आत्ता पुन्हा जे घडलं ते चर्चेत आलं.

त्याला कारण ठरलं ते म्हणजे नेटफ्लिक्सवरची एक डॉक्युमेंटरी. 

सलाम द फर्स्ट मुस्लीम नोबेल लोरिएट अस त्या डॉक्युमेंटरीच नाव. या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने अब्दुल सलाम यांच नाव पुन्हा चर्चेत आलं आणि तो प्रसंग देखील. 

अब्दुल सलाम कोण होते तर नोबेल विजेत भौतिकशास्त्रज्ञ. भौतिकशास्त्रातला १९७९ सालचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला होता. तरिही पाकिस्तानमध्ये त्यांच गुणगाण होतं नाही. कोणत्याही शासकिय कार्यक्रमांमध्ये त्यांच साध नाव देखील घेतलं जात नाही. त्यांना नोबेल मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या लौकिकात भर पडली अस पाकिस्तानच्या सरकारला देखील वाटत नाही, किंवा तिथल्या नागरिकांना देखील वाटत नाही. 

त्याच मुख्य कारण म्हणजे त्यांचा धर्म. ते अहमदिया संप्रदायाचे होते. हा संप्रदायाला पाकिस्तानने संविधानात दुरूस्ती करुन गैरमुस्लीम ठरवलं आहे. त्यामुळे अहमदिया संप्रदायाच्या लोकांच्या वाट्याला पाकिस्तानमध्ये हेच दुख: येत. अगदी समोरचा व्यक्ती नोबेल पुरस्कार मिळवणारा शास्त्रज्ञ का असेना. 

डॉ. अब्दुल सलाम यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी भारतीय उच्चायुक्ताशी संपर्क साधला. आणि फाळणीपुर्वी लाहौर येथे गणित शिकवणाऱ्या अनिलेंद्र गांगुली यांचा पत्ता मिळवून देण्यास मदत करावी अशी विनंती केली. 

अनिलेंद्र गांगुली हे फाळणीपुर्वी लाहौर येथील सनातन धर्म कॉलेजमध्ये गणित शिकवत असत. भारताची फाळणी झाल्यानंतर गांगुली भारतात आले व ते कोलकत्ता इथे राहू लागले. 

मोठ्या प्रयत्नानंतर भारतामार्फत त्यांचा पत्ता शोधण्यात आला. कलकत्ता शहराच्या दक्षिणेतील एका गल्लीत ते रहात होते. तेव्हा त्याचं वय ९० च्या पार होतं व त्यांना उभा राहणं देखील अशक्य होतं. 

त्यांचा पत्ता मिळाल्यानंतर डॉ. अब्दुल सलाम भारतात आहे. कलकत्ताला ते जेव्हा गांगुली यांच्या घरी गेले  तेव्हा गांगुली झोपूनच होते. 

गेल्यानंतर डॉ. अब्दुल सलाम यांनी त्यांच्या पायावर डोकं टेकवलं. माझा हा पुरस्कार तुमच्यामुळे आहे अस सांगत त्यांनी आपला नोबेल पुरस्कार गांगुली यांच्या गळ्यामध्ये घातला. 

या घटनेनंतर कलकत्ता विद्यापीठाने डॉ. सलाम यांना गोल्ड मेडेल ने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी कोलकत्ता विद्यापीठाने सलाम यांच्यासोबत संपर्क केला तेव्हा सलाम म्हणाले या गोल्ड मेडेलचे खरे हक्कदार तर माझे गुरूवर्य आहेत. विद्यापीठाने देखील आपला निर्णय बदल डॉ. सलाम यांच्याऐवजी अनिलेंद्र गांगुली यांना गोल्ड मेडेलने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर डॉ. अब्दुल सलाम यांच्या उपस्थिती त्यांचा गोल्ड मेडल देवून सत्कार करण्यात आला. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.