नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यामुळे ‘ओल्ड मॉन्क’ नाव देण्यात आलं

ओल्ड मॉन्क. दारू पिणाऱ्या लोकांमध्ये ओल्ड मॉन्क माहित नसणारा माणूस दुर्मिळ मानायला हवा. ज्यांना सर्वसाधारण माहित नाही अशा लोकांसाठी सांगतो. दारूमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. देशी दारू, व्हिस्की, रम, बियर, व्होडका हे सर्वसाधारण प्रकार झाले.

आत्ता या प्रकारात देखील जातीयवाद आहे. म्हणजे देशी दारू कष्टकरी गावाकडचे लोक पिणार, व्हिस्की उच्चशिक्षित नोकरदारवर्ग, पैसेवाले लोक पिणार, नुकतेच मिसरुड फुटलेले कार्यकर्ते बियर पिणार, व्होडका पोरी पिणार आणि रम…

जिथे गम तिथे रम. 

दोन वायडी पडलेले, बाहेर शिकायला असणारे, होस्टेलमध्ये राहणारे, पुण्यात जॉब शोधणारे, गुरुदत्तच्या प्यासाचे फॅन असणारे, अनुराग कश्यप ते स्टिव्हन स्पिलबर्गच्या नावाने ग्यान मारणारे, किशोर कुमार ते ए.आर. रहमान ऐकणारे, भाऊ पाध्ये ते नेमाडे वाचणारे हे सगळे रम कॅटेगरीत येतात.

त्यातही ओल्ड मॉन्क रम पिणारे याच कॅटेगरीत येतात. एकतर ही दारू स्वस्त: आहे. म्हणजे ओल्ड मॉन्कची कॉटरच १२० रुपयेला मिळते. त्यामुळं परवडणारी, बसणारी दारू म्हणून या दारूचा स्वतंत्र कल्ट आहे.

पण इथे एक घोळ झाला आहे. मी तुम्हाला ओल्डमॉन्कच्याच दूनियेत घेवून चाललोय. वरती हेडलाईन काय आणि मी सांगतोय काय. असो तर ओल्ड मॉन्क हा कल्ट आहे हे तर तुम्हाला कळलं असेल.

आत्ता या ओल्ड मॉन्क दारूचा किस्सा, 

ओल्ड मॉन्क आणि जानियलवाला बाग हत्याकांडमधला जनरल डायर त्याचबरोबरीने

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा संबध आहे. 

कसा, तर ही गोष्ट सुरू होते १८५४ साली.

स्कॉटीश असणारा एडवर्ड अब्राहम डायर भारतात आला. इंग्रजांची सत्ता भारतभर पसरत होती. ब्रिटीश लोकांना भारतात सर्वात जास्त गरज होती ती बियरची. युरोपसारखी बियर इथे मिळत नव्हती. त्यामुळे इंग्रजांना तत्कालीन टॅंगो पंचवर भागवाय लागायचं. हे ओळखून तो इथं आला हिमाचल प्रदेशातल्या कसौलीत आपला प्लॅन्ट तयार केला.

इथे तो स्वस्त:त उत्तम प्रतिची बियर तयार करु लागला. हे साल होतं १८५५. 

त्यानंतरच्या काळात त्याचा मुलगा मोठ्ठा झाला. पोरगा हाताखाली येईल काहीतरी काम करेल या स्वप्नात असणाऱ्या बापाच्या स्वप्नांचा भंग झाला. कारण पोरगं इग्रजांच्या लष्करी सेवेत भरती झालं.

त्याचं नाव जनरल डायर. जानियलवाला बाग हत्याकांडाचा क्रुरकर्मा म्हणून आपण ज्याला ओळखतो तोच हा डायर. याच्याच वडिलांनी ओल्डमॉन्कचा पाया घातला.

पुढे ही कंपनी वेद रतन मोहन यांच्याकडे गेली. कंपनीच पुर्वीचं नाव बदलून मोहन मकाईन लिमीटेड ठेवण्यात आलं. कालांतराने भारत स्वतंत्र झाला. १९५० नंतर सर्व काही सुरळीत होवू लागलं आणि भारतीयांना दारू विकायची वेळ या कंपनीवर आली.

स्वत: वेद रतन मोहन यांनी ओल्ड मॉन्क नावाची रम तयार केली. साल होतं १९५४ म्हणजे कंपनीच्या स्थापनेनंतर सुमारे शंभर वर्षानंतर. सुरवातीला हॅक्युलस नाव ठेवण्यात आलं. फक्त इंडियन आर्मीला पुरवायची म्हणून ही रम करण्यात आली होती. त्यानंतर ओल्ड मॉन्क तयार करण्यात आली.

आत्ता ओल्ड मॉन्क आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा काय संबध ? 

तर झालं अस की हे जे वेद रतन मोहन होते त्यांना गुमनामी बाबा वर विश्वास होता. अस सांगितल जायचं की त्या अपघातानंतर सुभाषबाबू जिवंत होते. व ते गुमनामी बाबा बनून रहात होते. हा माणूस या थेअरीवर विश्वास ठेवून होता.

गुमनामी बाबा या थेअरीत त्याला गुढ आणि अमरत्व असल्याचं वाटू लागलं. इतका मोठ्ठा माणूस अपघातात जातो पण गुमनामी बाबा या नावाने तो अमरच होतो असा त्याचा सिद्धांत होता. या गुमनामी बाबावर प्रेरीत होवून त्याने आपल्या रमच नाव ओल्ड मॉन्क ठेवलं.

हळुहळु रम खपू लागली. आजही या रमची जाहिरात आपणाला दिसणार नाही. अनेक कंपन्या दारूची जाहिरात करता येत नाही म्हणून सोडा हे बायप्रोडक्ट तयार करुन त्याची जाहिरात करतात पण ओल्ड मॉन्क कधीही जाहिरात न करता रमच्या धंद्यात आजही टॉपलाच आहे.

हे ही वाच भिडू.