रिलायन्स – जस्टडायलचा करार तर झाला, पण यातून कोण फायद्यात आणि कोण तोट्यात?

काल उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आणखी एका कंपनीच अधिग्रहण केलं. रिलायन्स उद्योग समूहातील किरकोळ व्यापार क्षेत्रातील कंपनी असलेल्या ‘रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने काल ‘जस्ट डायल’ या डेटाबेस कंपनीतील मालकी हिस्सा खरेदी केल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स रिटेलने जस्ट डायलमधील ३०.९५ टक्के हिस्सा ३ हजार ४९७ कोटींना खरेदी केला आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून रिलायन्स जस्ट डायलसोबतच्या या करारासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे एक प्रकारे अंबानींसाठी हा ड्रिम करार असल्याचं मानलं जातं.

पण अंबानींसारख्या माणसाला जस्ट डायल सारख्या डाटा बेस कंपनीमध्ये का इंटरेस्ट असेल? त्यांचा फायदा असेल काय? तर भिडू फायदा तर नक्कीच असणारय. कारण उद्योगपती माणूस आणि त्यातही अंबानींसारखा माणून एखाद्या कंपनीत पैसा काय बिन फायद्याचा पैसा का गुंतवेल ना? मग आता जस्ट डायलला तोटा झालाय का? तर याच सगळ्याची उत्तर आपण या लेखात बघणार आहोत.

नेमकं कोण फायद्यात, नेमक कोण तोट्यात?

या प्रश्नाच उत्तर बघण्याआधी जस्ट डायलची काल पर्यंतची परिस्थिती कशी होती हि गोष्ट बघणं गरजेच आहे.

जस्टडायलमध्ये कालपर्यंत मॅनेंजिंग डायरेक्टर व्ही.एस.एस. मणि यांचे जवळपास ३५.५ टक्के शेअर्स होते. याची किंमत तब्बल २ हजार २३८७ करोड इतकी होती. म्हणजेच मणि यांच्याकडे या कंपनीची सर्वाधिक मालकी होती. सोबतचं अमिताभ बच्चन यांच्याकडे देखील या कंपनीचे काही शेअर्स आहेत.

आता काल मुकेश अंबानी यांचाया रिलायन्स रिटेल’ने जस्ट डायलचे २.१२ कोटी शेअर प्रत्येकी १ हजार ०२२.२५ रुपयांनी खरेदी केले आहेत. तसेच व्ही.एस. एस मणी यांच्याकडून १.३१ कोटी शेअर १०२० रुपयांनी खरेदी केले आहेत. त्यामुळे आता जस्ट डायलमध्ये रिलायन्सची जवळपास ३० टक्के मालकी झाली आहे.

मात्र तरीही या व्यवहारानंतर ‘जस्ट डायल’चे व्ही.एस.एस मणि हेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कायम राहतील असं रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.

मग आता कोणाला फायदा आणि तोटा?

पहिल्यांदा जस्ट डायलची गोष्ट बघू.

काल जस्ट डायलचे मॅनेंजिंग डायरेक्टर मणि यांनी स्वतः सांगितले की, रिलायन्सकडून करण्यात आलेली गुंतवणूक हि जस्ट डायलच्या विकास आणि विस्तारामध्ये उपयोगी पडणार आहे. यातुन आता जस्ट डायल आपल्या लोकल व्यवसायीकांच्या लिस्टिंगला आणखी मजबूत करु शकणार आहे.

थोडक्यात काय तर मालकी हक्क कमी झाला असला तरी रिलायन्सकडून करण्यात आलेली भांडवली गुंतवणूक जस्ट डायलच्या भविष्यातील विस्तारासाठी वापरली जाणार आहे.

पण त्यासोबतच आता जस्ट डायल आपल्या प्लॅटफॉर्मवर रिलायन्स रिटेलच्या माध्यमातुन लाखो उत्पादन आणि सेवांच्या विस्तारावर काम करु शकणार आहे, त्यामुळे जस्ट डायलवरील व्यवहारांना चालना मिळत राहिल. सोबतच रिलायन्सच्या मदतीने आपल्या सध्याच्या डाटाबेसमध्ये देखील जस्ट डायलला वाढ करता येणार आहे.

‘जस्ट डायल’कडे देशभरातील तब्बल ३ कोटी व्यावसायिकांचा एकत्रित डेटाबेस आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये जस्ट डायल वर सरासरी १५ कोटी ३३ लाख युनिक युजर्सने भेट दिली

आता रिलायन्सला काय फायदा?

रिलायन्स रिटेल्स व्हेंचर्स या वेळेपर्यंत देशाची एक सर्वात मोठी संघटित रिटेल विक्रेता आहे. तर त्याचवेळी जस्टडायल लोकल सर्च इंजन सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. इथं प्रत्येक महिन्यात जवळपास १५ कोटी नवीन युजर्स मोबाईल, ऍप्स, वेबसाइट आणि त्यांची हॉटलाइन 8888888888 यावरून माहिती मागत असतात.

आता हा करार पूर्ण झाल्यानंतर रिलायन्सला जस्टडायकडील २५ वर्षांपासूनच्या जुन्या डाटाबेसचा चांगला वापर करू शकणार आहे. रिलायन्सने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांच्या सेवांना वाढवण्याची घोषणा केली आहे. अशात पूर्ण भारतात प्रभावित असलेल्या सर्च अँड लिस्टिंग कंपनीच्या डेटाबेसच्या माध्यमातून रिलायन्स आपल्या स्थानिक व्यापार आणि पेमेंट योजनांना प्रत्यक्ष उतरवण्याच्या प्रयत्नात असणार हे नक्की.

दुसऱ्या बाजूला रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपचा व्यवहार सध्या कायदेशीर चौकटीत अडकला आहे. त्यामुळे रिटेल क्षेत्रात पाय पसरण्यासाठी रिलायन्सला काही प्रमाणात अडथळे येत होते. त्यावर मार्ग काढत आता रिलायन्स इंडस्ट्रीजने छोट्या व्यवसायिकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. कोट्यवधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अंबानी यांनी आता रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून ‘जस्ट डायल’ वर ताबा मिळवला आहे.

गुंतवणूकदार देखील फायद्यात… 

मागच्या आठवड्याभरापासून हा करार होणार असल्याच्या चर्चा मार्केटमध्ये दबक्या आवाजत सुरु होत्या. दोन्ही कंपन्यांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा देखील सुरु होती. तेव्हापासूनच जस्‍ट डायलच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उसळी दिसून आली होती. कंपनीचा शेअर्स जवळपास ३ टक्के तेजीसोबत गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत होते. आजच्या घडीला जस्ट डायलच्या शेअर्सची किंमत ११०० च्या पार आहे.

म्हणजे काय तर थोडक्यात जुना मालक, नवीन मालक, आणि गुंतवणूकदार असे सगळेच फायद्यात आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही..

अमिताभ बच्चनची देखील जस्ट डायलमध्ये गुंतवणूक

जस्टडायलने डिसेंबर २०१० मध्ये अभिनेते अमिताभ बच्चनला आपल्या कंपनीचा ब्रँड अँबेसेडर बनवलं होतं. पुढे २०११ मध्ये त्यांना कंपनीचे ६२ हजार ७९४ शेअर्स दिले होते. त्याची किंमत त्यावेळी जवळपास १० रुपयेच्या आसपास होती. मात्र २०१५ उजाडता उजाडता या शेअर्सची किंमत वाढवण्यासोबतच अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक वाढून ७ कोटी २६ लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. म्हणजे त्यांना त्यावेळी १० पट जास्त फायदा मिळाला होता.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.