अॅडिज पर्वताच्या १०,००० फूटांवर मी हिंदीत कोरलेलं “इन्कलाब जिंदाबाद” वाचलं आणि…

बहुतेक फेब्रुवारी महिना असावा. बुलेटवरुन आम्ही गोव्याला गेलो होतो. याच गोव्याच्या फिरस्तीत तो वेडा पीर भेटला. चार महिने त्यांन काय केलं होतं ? तर चे गुव्हेरा च्या रस्ताने फिरला त्याचं रस्ताने तो फिरून आलेला. 

रस्ता कुठला? मोटरसायकल डायरीजचा.

मोटरसायकल डायरीज च नाव माहित नसणारा तरुण सापडणं तस दुर्मीळ. तुम्ही डावे असाल किंवा नसाल पण वेड्यासारखं कस असाव हे सांगण्यासाठी मोटारसायकल डायरीज वाचावीच लागते. २००४ साली याच डायरीवर सिनेमा आला. माझ्याप्रमाणे अनेक भटक्यांचा तो जवळचा सिनेमा. या सिनेमा मेडिकल स्टुडंट असणारा एर्नेस्टो अर्थात चे गव्हेरा आपला मित्र अल्बर्ट ग्रॅनडो सोबत मोटारसायकलवरुन द अमेरिकेच्या प्रवासास निघतो. 

मोडकळीस आलेली मोटारसायकल, हातात चार पैसे इतक्यावर हे दोघे धाडस करतात. तसा गुव्हेरा सधन कुटूंबातून आलेला पण हातात असणाऱ्या शुल्लक पैशावरच प्रवास करायचं धाडस तो करतो. या प्रवास एर्नेस्टो त्याच्या प्रेयसीला भेटतो. तीने खर्चासाठी दिलेले पैसे शेवटपर्यन्त संभाळून ठेवतो. याच प्रवासात शेवटी जे राहत ते त्याच्या अंगात असणारी क्रांन्तीची मशाल पेटवण्यासाठी पुरेसं ठरलं. पुढे चे न क्युबा मध्ये सशस्त्र क्रांती घडवून आणली. ती यशस्वी करून तो क्युबाचा मंत्री देखील झाला. शेजारच्या देशातलं दुख पाहून मंत्रीपद सोडून तो त्या देशातल्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढ्यात सहभागी झाल. स्वत:च्या देशाला मुक्त करुन इतरांसाठी पुन्हा जंगलात भटकत राहीला.

आजही या रस्त्यावरून जाण्यासाठी जगभरातले हजारो भटके त्या जागेवर जमतात. त्यानही यात रस्तावरुन प्रवास केला होता. या प्रवासाचा शेवट करतात ते चे गव्हेराला ज्या ठिकाणी मारण्यात आलं त्या ठिकाणावर. चे गुव्हेराला मारलं ते ठिकाण बोलिव्हिया मध्ये अॅंडिज पर्वतात १०,००० फुट उंचीवर आहे. १५-२० घरांची छोटीशी वस्ती. जिथे मारल ती एका शाळेची इमारत. दोन खोल्यांची. आपल्याकडील जिल्हा परिषद शाळेसारखी. जायला धड वाट नाही.

पण अशाही परिस्थितीत जगभरातून लोक तिथे जातात. तेथील इमारतीच्या भिंतीवर जगभरातल्या भाषेत संदेश लिहितात. त्याची आज अफलातून ग्राफिटी वॉल झालीये. 

तो वेडा पीर मला सांगत होता,

“तिथे मी हिंदीत कोरलेल “इनक्लाब जिंदाबाद” वाचलं आणि धन्य झालो” 

कधीतरी मलाही याच रस्त्यावरुन जायचाय. 

  • भिडू प्रसाद प्रकाश झावरे.

हे ही वाच भिडू.