“खुदा ए सुखन” अर्थात गालिबचा उस्ताद “मीर तकी मीर”

“रेख्ते के तुम ही उस्ताद नही हो ‘गालिब’ कहते है किसी जमाने मे ‘मीर’ भी था “

उर्दू शायरी ज्याच्यापासून सुरु होते आणि ज्याच्यापाशी संपते असा ‘गालिब’ या शायरीत स्वतः ला अहंकाराचा वारा लागू नये, म्हणून सांगतोय की फक्त स्वतःलाच शायरीचा उस्ताद समजू नकोस तुझ्यापेक्षा भारी एक ‘मीर’ नावाचा शायर होऊन गेलाय.

कोण होता हा मीर तकी मीर?

‘खुदा-ए-सुखन’ अर्थात काव्याचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीरचा जन्म आगऱ्यामधला. साल होतं १७२३. त्याचे वडील एक सुफी संत होते. त्याच्या शायरीवर आपल्या वडिलांच्या शिकवणुकीचाच प्रभाव बघायला मिळतो.

वयाच्या ११व्या वर्षी वडिलांच्या निधनाने पोरका झालेला मीर दिल्लीला आला. त्याकाळात फारसी भाषेत केल्या जाणाऱ्या कवितेला राजाश्रय होता. उर्दू भाषा अजूनही बाळसे धरत होती. अशा वेळी मीरने उर्दू हिंदुस्तानीमध्ये गझल लिहायला सुरवात केली. उर्दू भाषा घडवण्याचं श्रेय त्याला आणि त्या काळातल्या कवींना जातं.

भारतातील मुघल साम्राज्याच्या पडतीचा तो काळ होता. नादीरशहाने दिल्लीला उजाड केलं होतं. दिल्लीमधल्या सततच्या अस्थिर वातावरणात देखील मीरची शायरी फुलतच राहिली. अखेर जेव्हा अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दालीने दिल्लीवर आक्रमण केलं, तेव्हा मात्र मीर ने दिल्ली सोडली. तो लखनौला नवाब असफ उददौलाच्या पदरी आला.

दिल्ली सोडताना त्याला प्रचंड यातना झाल्या. लखनौमध्ये आल्या आल्या त्याची लाडकी मुलगी देवाघरी गेली. त्यापाठोपाठ त्याचा मुलगा आणि बायको सुद्धा ! या सर्व यातनांचा त्याच्या शायरीवर देखील परिणाम झाला. एक अनोखी उदासीनता त्याच्या प्रत्येक कवितेत डोकावते, ती या यातनांमधूनच आली आहे.

मीरने सतराव्या शतकात लिहिलेल्या शायरी आजच्या काळात देखील आपल्या  काळजाला भिडतात. म्हणूनच की काय ‘गालिब’ असो की ‘फैझ’ सगळ्यांनाच  ‘मीर’चं श्रेष्ठत्व मान्य आहे. गालिब तर एका शायरीत म्हणतो की,

“ज्याला मीर कळत नाही त्याला अशिक्षितच म्हटलं पाहिजे.”

मीर तकी मीरच्या स्मृतीदिनी पाहूयात त्याचे काही फेमस शेर…

इब्तीदा इश्क है रोता है क्या.

आगे आगे देखिये होता है क्या

प्रेमाच्या सुरवातीलाच हातपाय गाळणाऱ्या प्रेमवीरांसाठीचा हा शेर. आजकाल प्रेरणादायी भाषणात हमखास वापरली जाणारी शायरी.

अश्क आंखों में कब नहीं आता

लहू आता है जब नहीं आता .

मीर म्हणतो की, “डोळ्यातून अश्रू नेहमीच येतात आणि जेव्हा अश्रू येत नाहीत तेव्हा तिथून फक्त रक्त येतं”

न सोचा,न समझा,न सीखा,न जाना

मुझे आ गया ख़ुदबख़ुद दिल लगाना

तुमची अन आमची सगळ्यांचीच कहाणी

रही नगुफ़्ता मेरे दिल में दास्ताँ मेरी

न इस दयार में समझा कोई ज़बाँ मेरी

अनेकदा आपल्या भावना मनातच राहतात. ते व्यक्त करायला ना आपल्या कडे शब्द असतात ना त्या कोणाला समजू शकतात. तुमच्या बाबतीतही असं घडतच   ना?

दिखाई दिये यूं कि बेख़ुद किया

हमें आप से भी जुदा कर चले

‘दिखाई दिये’ तर प्रचंड फेमस ‘बाजार’ सिनेमात ती गीताच्या स्वरुपात देखील वापरलिये !

बाद मरने के मेरे कब्र पर आया वो मेरी, याद आयी मेरे ईसा को दवा मेरे बाद.. 

हमारे आगे तेरा जब किसी ने नाम लिया
दिल-ए-सितम-ज़दा को हमने थाम-थाम लिया

पत्ता-पत्ता बूटा-बूटा हाल हमारा जाने है
जाने न जाने गुल ही न जाने, बाग़ तो सारा जाने है

क्या कहूँ तुम से मैं के क्या है इश्क़
जान का रोग है, बला है इश्क़
देख तो दिल के जां से उठता है
ये धुआं सा कहां से उठता है

हे ही वाच भिडू – 

 

Leave A Reply

Your email address will not be published.