जेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले !

रामनाथ गोएंका.

‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे संस्थापक आणि मालक.

भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासात निर्भीड पत्रकारितेचा विषय जेव्हा कधी निघतो, तेव्हा रामनाथ गोएंका यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. २२ एप्रिल १९०४ रोजी बिहारमधील दरभंगा येथे जन्मलेल्या रामनाथ गोएंका यांची आज पुण्यातिथी.

‘रामनाथ गोएंका: ए लाईफ इन ब्लॅक अँड व्हाईट’ या पुस्तकाच्या लेखिका अनन्या गोएंका आणि रामनाथ गोएंकांच्या सचिव म्हणून काम केलेल्या रेणू शर्मा यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलेले काही किस्से.

इंदिरा गांधींना जेरीस आणणारे गोएंका

इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीचा सगळ्यात प्रखर विरोध करून माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आवाज जर कुणी बुलंद केला असेल तर तो रामनाथ गोएंका यांच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाने.

१९३६ साली रामनाथ गोएंका यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रस्वातंत्र्याची जी लढाई लढली, त्यात एक्स्प्रेसच्या संपादकांचा वाटा तर होताच, पण मालक म्हणून रामनाथ गोएंका जितक्या खंबीरपणे आणि निर्भीडपणे आपल्या पत्रकारांच्या पाठीशी उभे होती त्याला तोड नव्हती.

‘एक्स्प्रेस’च्या आणीबाणी विरोधातील भूमिकेमुळे या वृत्तपत्राच्या जाहिराती बंद करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांच्या सरकारने केला होता. पण अशा कुठल्याही विरोधाला गोएंकांनी भिक घातली नाही आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

हे ही वाचा – 

आणीबाणीच्या काळात गोएंकांनी इंदिरा गांधींनी अक्षरशः जेरीस आणलं होतं. त्याकाळात वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली होती. बातम्या आणि लेख सेन्सॉर होऊनच प्रकाशित व्हायचे.

असाच आणीबाणीच्या विरोधात लिहिण्यात आलेला एक्स्प्रेसचा अग्रलेख देखील सेन्सॉर करण्यात आला होता. त्यावेळी रामनाथ गोएंकांनी दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्राcv IEBEत अग्रलेखाची जागा सोडून कोरी या प्रकाराला असणारा आपला विरोध प्रदर्शित केला होता.

आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी अग्रलेखाची जागाच कोरी ठेवण्याचा भारतीय वृत्तपत्रांच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग होता.

स्वतःविरोधातील बातम्यांना एक्स्प्रेसच्या पहिल्या पानावर जागा दिली

रामनाथ गोएंका लोकसभेचे सदस्य देखील होते. त्यांच्या आणीबाणी विरोधातील भूमिकेमुळे संसदेत काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात येत असे. रामनाथजींना हवं असतं तर आपल्या विरोधातील बातम्या दाबून, ‘एक्स्प्रेस’मधून आपल्या समर्थनातील बातम्या ते सहजपणे छापून आणू शकले असते. त्यांनी मात्र आपल्या संपादकांना आपल्या विरोधातील बातम्यांना पहिल्या पानावर प्रमुखपणे छापण्याचे आदेश दिले होते.

एस. मुळगावकर हे त्यावेळी ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संपादक होते. त्यापूर्वी ‘हिंदुस्तान टाईम्स’चे संपादक राहिलेल्या मुळगावकरांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’मध्ये असताना गोएंका यांच्याविरोधातील बातम्या छापल्या होत्या आणि ‘एक्स्प्रेस’मध्ये देखील ते हे करू शकले, कारण त्यांच्यावर मालक म्हणून गोएंका यांचा कसलाही दबाव नव्हता.

जेव्हा गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन घ्यायला गेले  

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आणि गोएंका यांच्यामधील संबंध अतिशय ताणले गेले होते. असं असताना एका दिवशी दिवशी अचानक पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. फोन रिसीव्ह केलेल्या रेणू शर्मा यांनी रामनाथजींकडे निरोप पोहोचवला,

“दादाजी, तुमच्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय, रात्री स्नेहभोजनासाठी बोलावलंय”

त्यावर रामनाथजी म्हणाले, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. फोन माझ्यासाठी नसेल डंकनवाल्या गोएंकांसाठी असेल.

त्यावर रेणू शर्मा यांनी परत एकदा पंतप्रधान कार्यालयात फोन करून ‘इंडियन एक्स्प्रेस’वाल्या गोएंकांनाच बोलावण्यात आलंय ना याची खात्री करून घेतली आणि त्यांनाच आमंत्रित करण्यात आल्याचं रेणू शर्मा यांनी रामनाथजींना सांगितलं.

“कदाचित परत गर्लफ्रेंड बनायचा प्रयत्न करतेय”

पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या निरोपामुळे खुश झालेल्या रामनाथजींचं रेणू शर्मांना प्रत्युत्तर.

संजय गांधी यांच्या अपघाती मृत्युनंतर आपले सगळे मतभेद विसरून रामनाथजींनी इंदिराजींना पत्र लिहून आपला शोक प्रकट केला होता. आपणही २ महिन्यांपूर्वी आपला मुलगा गमावला असल्याने इंदिराजींचं दुख समजू शकतो, असं त्यांनी पत्रात लिहिलं. शिवाय ‘एक्स्प्रेस’च्या पहिल्या पानावर स्वतः संपादकीय लिहिलं.

रामनाथ गोएंका हे नाव भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात अत्यंत प्रतिष्ठेने घेतलं जातं. त्यांच्या पत्रकारितेचा वारसा जपला जावा, यासाठी दरवर्षी ‘रामनाथ गोएंका एक्सलंस इन जर्नलिझम’ पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला भारतीय पत्रकारितेत अत्यंत मानाचं स्थान आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.