गावीत बहिणींच नाव काढलं तरी आज महाराष्ट्रातला प्रत्येकजण भितीने कापतो…

कोल्हापूरच्या एका थिएटरमध्ये त्या दोघी पिक्चर बघत होत्या. त्या दोघींनी आपल्या पायात एक पिशवी ठेवली होती. त्या पिशवीत काय होतं माहित आहे का? त्या पिशवीत एका लहान मुल होतं. त्या मुलाचे तुकडे करण्यात आले होते. तेही जमिनीवर आपटून… 

लहान मुलाचे तुकडे तुकडे करुन त्याला पिशवीत ठेवून त्या अगदी थंड डोक्याने सिनेमा पहात होत्या.

सिनेमा झाल्यानंतर अगदी कचरा फेकावा तशी त्यांनी ती पिशवी एका कचऱ्यात टाकली. त्यांच्या आयुष्यातली हि पहिली वेळ नव्हती. त्यांनी आजपर्यन्त ४० च्या वर मुलांना असच मारलं होतं. हि गोष्ट क्रुर, निर्दयी असणाऱ्या आई आणि त्या दोन पोरींची. हो त्याच महिला ज्यांना फाशीची शिक्षा झाली. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देखील त्यांना दया न दाखवता फाशीची शिक्षा सुनावली. त्यांना फाशी दिली तर स्वतंत्र भारतातली महिलांना दिली जाणारी हि पहिली फाशी असेल. आजही त्या दोघी आपल्या फाशीची कार्यवाहीची वाट पहात जेलमध्ये शेवटच्या घटका मोजत आहेत.

हि गोष्ट त्याच तिघींची …. 

रेणुका शिंदे आणि सीमा गावित अस त्या दोघींच नाव. त्यांच्या आईच नाव अंजना गावित. त्या तिघींनी अत्यंत थंड डोक्याने तब्बल ४३ लहान मुलांचे खून केले. 

१९९० च्या सुमारास मुंबईच्या चौपाटीदरम्यान एक चोरीची घटना घडते. रेणुका आणि सीमा या दोघी बहिणी ती चोरी करत असतात. चोरी कशाची असते तर एक व्यक्तीच पाकीट मारलेलं असतं. एक बहिण ती चोरी करताना सापडते. लोक दंगा करू लागतात. चोर सापडलेला असतो. पण याच वेळी हा खेळ दूरून पाहणारी दूसरी बहिण उपस्थित असते. तिच्या कडेवर एक तान्हा लेकरू असतं. ती काय करते तर पुर्ण ताकदीने आपल्या कडेवर असणाऱ्या मुलाला खाली फेकून देते. क्षणार्धात त्या मुलाचं डोकं फुटतं. डोक्यातून रक्ताच्या चिंळकांड्या फुटू लागतात. ते लहान तान्ह लेकरू रक्ताच्या थारोळ्यात पडून राहतं. पाकिट मारणाऱ्या त्या चोराला सोडून सर्वजण त्या पडलेल्या मुलाकडे जातात. पण त्या माणसांना विचार न करता दूसरी बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मुलाला घेवून तिथून पसार होते. 

त्या दोघी घरी येतात. त्यांच्या घरी असते त्यांची आई अंजना गावित. अंजना गावित आणि त्या दोघी त्या रक्ताच्या थारोळ्यात असणाऱ्या लहान मुलाला पायाखाली घेवून तुडवू लागलात. त्या मुलाचा मारून त्याचे तुकडे करतात. आणि इथेच त्यांना चोरी करताना आपण कसे सुटू शकतो याचा मार्ग सापडतो. लहान मुलांच अपहरण करायचं, त्यांना चोरीसाठी वापरायचं आणि तो बोलू लागेल तेव्हा त्याचा अमानुष पद्धतीने खून करायचा. 

१९९० पासून १९९६ सालात त्यांनी एकूण ४३ मुलांचे खून केल्याचे सांगितले जातात. पोलिस रेकॉर्डवर मात्र यामधील फक्त १३ खून सिद्ध होवू शकले व याच निर्दयी पद्धतीने केलेल्या खूनांबद्दल कोल्हापूर न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि पुढे राष्ट्रपतींनी देखील त्यांच्या फाशीवर शिकामोर्तब केलं. 

१९९६ साली कोल्हापूरमध्ये एका लहान मुलाचं शव मिळालं होतं. अत्यंत घृणास्पद रितीने या लहान मुलाचा खून करण्यात आला होता. अपहरण करण्यात आल्याची फिर्यात पोलीसांकडे होतीच. पण या मुलांचा खून कसा केला होता तर स्टॅण्ड परिसारातील एका लाईटच्या खांबावर या मुलाला आपटण्यात येवून त्याचे तुकडे करण्यात आले होते. इतका घृणास्पद प्रकार पाहून हि केस CID कडे सोपवण्यात आली होती. CID माग काढतं या दोन महिलांपर्यन्त पोहचली. कबुली जबाबात एकाच मुलाच्या खून नाही तर आजपर्यन्त ४३ मुलांचा खून केल्याची माहिती मिळाली आणि या घटनेनं संपुर्ण महाराष्ट्र हादरून गेला.  

अंजना गावित आणि त्यांच्या दोन मुली रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तिंघी लहान मुलांच अपहरण करुन खून करत होत्या. लहान मुलांचा चोरासाठी वापर करता येवू शकतो हे त्यांना समजलं होतं. त्यानंतर सावज हेरून त्या लहान मुलांना कडेवर घेवून चोरीतून पळून जाण्यासाठी वापर करत. त्या दरम्यान मुलांना जखम झाली तर त्या तशाच लहान मुलांना भिक मागण्यासाठी वापरून घेत असतं.

जेव्हा मुलगा बोलू लागेल तेव्हा लहान मुलांना झोका घेण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या झोपाळ्यावर बसवून त्या भितींवर आपटून त्यांना मारत असत. त्यांच्या अंगावर तिघीजण नाचून मुलांना मारून टाकतं. त्यानंतर अत्यंत क्रुर आणि थंड डोक्याने त्यांना कचऱ्यामध्ये फेकून देत असत. या कामी त्यांच्यासोबत रेणुका शिंदेचा नवरा किरण शिंदे देखील असायचा. किरण शिंदे हा पुण्या मुंबईतून गाड्या चोरायचा. त्या गाड्यांमध्ये बसूनच या तिघी कोल्हापूर, पुणे, अमरावती, मुंबई, नाशिक अशा भागातून मुलं चोरायच्या. त्यानंतर आपल्या स्वार्थासाठी त्यांना वापरून त्यांचा खून करायच्या.  

अत्यंत थंड डोक्याने केलेल्या या हत्याकांडात जेव्हा चौघांची नावं समोर आली तेव्हा किरण शिंदे हा माफिचा साक्षीदार झाला. १३ मुलांच्या खूनांची कबुली देताना त्याने एकूण ४३ मुलांना मारल्याच कबूल केलं. या दरम्यानच पोलीस अटकेत असताना अंजना गावित हिच निधन झालं. पुढे केस चालली. आणि कोल्हापूर कोर्टाने या दोघींना फासीची शिक्षा सुनावली. 

किरण शिंदे माफिचा साक्षीदार होवून फाशीपासून सुटला. त्या दोघींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. अगदी २०१४ पर्यन्त हि शिक्षा राष्ट्रपतींनी देखील कायम ठेवली. याबद्दल अधिक सांगताना बोलभिडूने अॅड. असिम सरोद यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले, त्याच्यावर दया दाखवण्याचा प्रश्नच नव्हता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काही सायको नव्हत्या. अगदी थंड डोक्याने त्या लहान मुलांचे खून करत होत्या. भावनाशुन्य असणाऱ्या क्रुर महिला त्या होत्या. या केसबद्दल त्या येरवडा कारागृहात होत्या तेव्हा त्यातील एकीने जेलमध्ये मांजर पाळलं होतं. त्या मांजराला जवळ घेवून ती फिरायची. त्यांची दादागिरी कारागृहात देखील होती. त्यामुळेच एका बहिणीला येरवडा कारागृहात तर दूसऱ्या बहिणीला नागपुरच्या कारागृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. खैरांजली हत्याकांड वरील लेख वाचायला मिळेल का…?

Leave A Reply

Your email address will not be published.